शनि अमावास्येनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम:नस्तनपूरचे शनी मंदिर 24 तास राहणार खुले

शनि अमावस्येला श्रीक्षेत्र नस्तनपूर येथे शनी महाराजांच्या दर्शनासाठी हजारो भक्त येत असतात, यामुळे भाविकांना दर्शन सुलभ व्हावे, यासाठी दर्शनरांगांची व्यवस्था करण्यात आली आहे. मंदिर दर्शनासाठी २४ तास खुले राहणार आहे. शनिवारी (दि. २९) सकाळी १०:३० ते रविवार सकाळी ११:५१ पर्यंत दर्श अमावास्या आहे. शनिवारी येणाऱ्या अमावास्येला शनिभक्त शनी अमावस्या मानतात. शनी अमावास्येला शनिदेवाची आराधना केल्यास शनीच्या साडेसातीचा प्रभाव कमी होतो. अशी शनिभक्तांची धारणा आहे. शनीची नियमित आराधना करणाऱ्या भक्तांची संख्याही फार मोठी असल्याने शनीच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी पूर्णपीठ असलेल्या नांदगाव तालुक्यातील नस्तनपूर येथे दर्शनासाठी हजारो भाविक येत असतात. पूजा व अभिषेक करण्यासाठी मंदिर परिसरात स्वतंत्र व्यवस्था पूजा व अभिषेक करण्यासाठी मंदिर परिसरात स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. शनिवारी सकाळी मूर्तीची फुलांनी आकर्षक सजावट केली जाईल, त्यानंतर सकाळी ८ वाजता शनिमहाराजांची नियमित पूजा आरती होईल. सकाळी १०:३० नंतर भाविकांना पूजा, अभिषेक करता येईल.

Share

-