VIDEO: ऋषभ पंतला पाकिस्तानविरुद्ध का घेतले नाही? जडेजाने स्पष्टच उत्तर दिले

 

दुबई: भारतीय क्रिकेट संघाने आशिया कप २०२२ मध्ये पहिल्या सामन्यात पाकिस्तानचा ५ विकेटनी पराभव केला. भारतीय संघाच्या या विजयाने सर्व चाहते आनंदी असले तरी सोशल मीडियावर चाहत्यांनी एक मोठा प्रश्न उपस्थित केला होता. पाकिस्तान विरुद्धच्या महत्त्वाच्या सामन्यात शानदार फॉर्ममध्ये असलेल्या ऋषभ पंतला संघात का घेतले नाही? पाकिस्तानविरुद्ध पंतच्या जागी दिनेश कार्तिकला संघात घेण्यात आले होते. अनेकांना वाटले पंत संघात असेल पण रोहित शर्मा टॉसला आला तेव्हा पंत अंतिम ११ मध्ये नसल्याचे कळाले.

एका बाजूला भारत पाकिस्तान मॅच सुरू होती आणि दुसऱ्या बाजूला सोशल मीडियावर ऋषभ पंत ट्रेंडमध्ये आला होता. आता हाँगकाँगविरुद्ध होणाऱ्या लढती आधी पत्रकार परिषदेत रविंद्र जडेजाला एका पत्रकाराने प्रश्न विचारला.

पाकिस्तानविरुद्ध भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका पार पाडणाऱ्या जडेजाने पंतला संघात का घेतले नाही असा प्रश्न विचारल्यावर मजेशी उत्तर दिले. थोडा अचडणीत टाकणाऱ्या या प्रश्नावर जडेजा म्हणाला, हा प्रश्न माझ्या अभ्यासक्रमाच्या बाहेरचा आहे. जडेजाच्या उत्तराने पत्रकार परिषदेत उपस्थित सर्वजण हसू लागले. स्वत: जडेजाला हसू आवरता आले नाही.

आशिया कपमध्ये आज ३१ ऑगस्ट रोजी भारताची लढत हाँगकाँगविरुद्ध होणार आहे. या लढतीत विजय मिळवल्यास टीम इंडिया सुपर ४ मध्ये पोहोचेल.

Leave a Comment

Your email address will not be published.