INDIA vs PAKISTAN सामना पुन्हा खरंच होणार का? जाणून घ्या काय आहेत Asia cupचे नियम…

 

दुबई : भारत आणि पाकिस्तान यांच्यांमध्ये एक सामना रविवारी खेळवण्यात आला. हा सामना भारताने जिंकला. पण आता पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना होऊ शकतो, असे म्हटले जात आहे. पण खरंच भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होऊ शकतो का, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. पण त्यासाठी आता या स्पर्धेचे नियम पाहणे गरजेचे आहे.

Asia cup 2022चे नियम काय आहेत…
यावर्षी आशिया चषक स्पर्धेत महत्वाचे बदल करण्यात आले आहे. आशिया चषक स्पर्धेसाठी दोन गट बनवण्यात आले आहे. या दोन्ही गटांमध्ये प्रत्येकी तीन संघांचा समावेश करण्यात आला आहे. या तिन्ही संघांचे प्रत्येकी दोन सामने साखळी फेरीत खेळवण्यात येणार आहेत. त्यामुळे प्रत्येक संघाला एकमेकांबरोबर खेळण्याची संधी मिळेल. या साखळी फेरीनंतर सुपर-४ ही फेरी खेळवण्यात येणार आहे. साखळी फेरीत जे दोन संघ जास्त विजय मिळवतील किंवा तिन्ही संघांनी जर प्रत्येकी एक विजय मिळवला तर रनरेटनुसार हा निर्णय घेण्यात येईल.

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना पुन्हा कसा होऊ शकतो, जाणून घ्या…
भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ ‘अ’ गटात आहेत. त्यामुळे या गटातील दोन संघ पुन्हा सुपर -४ या फेरीत खेळू शकतील. या गटातील पहिला सामना हा भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये झाला होता. हा सामना भारताने जिंकला. त्यामुळे सुपर-४ या फेरीसाठी भारताने आपली दावेदारी सिद्ध केली आहे. आता भारताचा दुसरा सामना हा हाँगकाँगबरोबर ३१ ऑगस्टला होणार आहे. हा सामना भारताने जिंकला तर ते सुपर – ४ या फेरीत पोहोचतील. त्यानंतर पाकिस्तान आणि हाँगकाँग यांच्यातील सामन्यामध्ये जो विजयी ठरेल त्याला सुपर – ४ या फेरीत पोहोचता येणार आहे. या सामन्यात पाकिस्तानचा संघ बाजी मारेल, असे म्हटले जात आहे. कारण हाँगकाँगचा संघ हा अनुभवी नाही. त्यामुळे पाकिस्तान हा सामना जिंकून सुपर – ४ या फेरीत पोहोचू शकतो. पण जर हाँगकाँगने पाकिस्तानला धक्का दिला तर मात्र पाकिस्तानचा संघ या स्पर्धेतून बाहेर होऊ शकतो. त्यामुळे आता सर्व समीकरण हे पाकिस्तानच्या सामन्यावर अवलंबून असेल. त्यामुळे आता या सामन्यात काय घडतं, हे सर्वात महत्वाचं असेल आणि त्याची सर्वांना उत्सुकता असेल. त्यामुळे या सर्व सामन्यांवर चाहत्यांचे लक्ष असेल.

 

Leave a Comment

Your email address will not be published.