स्वस्त किंमतीत Xiaomi ने आणले ३ जबरदस्त 4K Smart TV, डॉल्बी साउंडने घरात मिळणार थिएटरची मजा

 

नवी दिल्लीःXiaomi 4K Smart TV : देशातील स्मार्ट टीव्ही ब्रँड शाओमीने आज भारतात Xiaomi Smart TV X सीरीज लाँच केली आहे. जबरदस्त पिक्चर क्वॉलिटी आणि जबरदस्त साउंड एक्सपीरियन्स देण्यासाठी कंपनीने या टीव्हीला लाँच केले आहे .Xiaomi स्मार्ट टीव्ही एक्स सीरीजचे टीव्ही 4K सिनेमेटिक एक्सपीरियंस देतील. Smart TV X सीरीजला तीन स्क्रीन साइज मध्ये ४३ इंच, ५० इंच आणि ५५ इंचात लाँच केले आहे. स्मार्ट टीव्ही एक्स सीरीज मध्ये डॉल्बी व्हीजन, एचडीआर १०, अँड्रॉयड टीव्हीसाठी पेचवॉल यूआय स्कीनसह खूप साऱ्या फीचर्सचा समावेश आहे. स्मार्ट टीव्ही एक्स सीरीज संबंधी सविस्तर जाणून घ्या.

Xiaomi Smart TV X Series ची किंमत
Xiaomi च्या स्मार्ट टीव्ही X सीरीज भारतात तीन साइज मध्ये उपलब्ध करण्यात आली आहे. या तीन पैकी ४३ इंचाच्या स्मार्ट टीव्हीची किंमत २८ हजार ९९९ रुपये, ५० इंचाच्या स्मार्ट टीव्हीची किंमत ३४ हजार ९९९ रुपये, आणि ५५ इंचाच्या स्मार्ट टीव्हीची किंमत ३९ हजार ९९९ रुपये ठेवली आहे. Xiaomi च्या नवीन टीव्ही सीरीज फ्लिपकार्ट आणि शाओमी इंडियाच्या अधिकृत वेबसाइट सोबत सर्व मी होम्स आणि रिटेल स्टोर्स वरून खरेदी करू शकता.

Xiaomi Smart TV X Series चे स्पेसिफिकेशन
स्मार्ट टीव्ही X सीरीज 4K रिझॉल्यूशन सपोर्ट सोबत आणले आहेत. या टीव्हीत डॉल्बी व्हीजन, एचडीआर १० आणि एचएलजला सपोर्ट करते. शाओमी स्मार्ट टीव्ही एक्स सीरीज मध्ये विविड पिक्चर इंजिन (VPE) दिले आहे. जे एक इन हाउस इमेज प्रोसेसिंग अल्गोरिदम आहे. यात ९४ टक्के डीसीआय पी३ वाइड कलर गेमयूट आहे. यूजर्सना यात १.०७ बिलियन कलर्सचा एक्सपीरियन्स मिळेल. या टीव्हीत ऑडियोसाठी डॉल्बी ऑडिओ दिले आहे. यात शक्तिशाली 30W स्पीकर दिले आहे. या टीव्हीत 2GB RAM + 8GB इंटरनल स्टोरेज दिले आहे. हे स्मार्ट टीव्ही ड्युअल बँड वाय फाय आणि ब्लूटूथ ५.० ला सपोर्ट करते. टीव्हीत ईयरफोन पोर्ट सोबत ३ एचडीएमआय पोर्ट आणि २ यूएसबी पोर्ट दिले आहे

Leave a Comment

Your email address will not be published.