आपला विजय नक्की, पण गाफील राहू नका:समोरचा शत्रू हार मानणारा नाही, तो साम – दाम – दंड – भेद सर्वकाही वापरेल; उद्धव ठाकरेंचा सल्ला

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी पुन्हा एकदा आपल्या सहकाऱ्यांना विधानसभा निवडणुकीत गाफील न राहण्याचा सल्ला दिला. आपला विजय नक्की झाला आहे. पण कुणीही गाफील राहू नका. कारण समोरचा शत्रू हार मानणारा नाही. तो साम, दाम, दंड, भेद करेल. सगळ्या उचापत्या करून जिंकण्याचा प्रयत्न करेल. त्यामुळे आपण मशालीसारखे कायम धगधगत राहिलो, तर हा शत्रू आपल्या आसपासही फिरकणार नाही, असे ते म्हणालेत. भाजपचे रत्नागिरी विधानसभेचे माजी आमदार बाळ माने, कोल्हापूरच्या राधानगरी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार के पी पाटील व श्रींगोदा विधानसभेतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या नगर जिल्हाध्यक्षा अनुराधा नागवडे आणि राजेंद्र नागवडे यांनी बुधवारी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी गत काही दिवसांपासून मातोश्री येथे जोरात इनकमिंग सुरू असल्याचे स्पष्ट केले. शिवसेना संकटानंतर कित्येक पटीने उभी उद्धव ठाकरे म्हणाले, गत काही दिवसांपासून मातोश्रीत जोरात इनकमिंग सुरू आहे. माझ्यावर नेहमीच घरी बसून काम करत असल्याची टीका होते. जर अवघे जग माझ्या घरी येत असेल तर माझ्याहून मोठा भाग्यवान कोण असेल? माझे आजोबा संकटाच्या छाताडावर चालून जाण्याचा सल्ला देत असत. ज्या लोकांनी आपला पक्ष चोरला, चिन्ह चोरले, आपल्या मार्गात संकटे उभी केली. पण संकटापूर्वी जेवढी शिवसेना होती, आता संकटानंतर कित्येक पटीने ती उभी राहिली आहे. आपला विजय नक्की झाला आम्ही नवनवीन सहकारी येतात व भेटतात. हे सर्वजण लढवय्ये आहेत. आपला विजय नक्की झाला आहे. पण कुणीही बेसावध किंवा गाफील राहायचे नाही. समोरचा शत्रू हार मानणारा नाही. आपला शत्रू साम, दाम, दंड, भेद करेल. सगळ्या उचापत्या करून जिंकण्याचा प्रयत्न करेल. पण तुम्ही जागे राहिलात, मशालीसारखे धगधगत राहिलात तर हा शत्रू आपल्या आसपासही फिरकणार नाही. त्यामुळे जागे राहा आणि आपली धगधगती मशाल घरोघरी न्या. हीच मशाल घेऊन आपल्याला भ्रष्टाचार जाळून टाकायचा आहे. आपल्याला आपले शिवशाहीचे सरकार परत आणायचे आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले. हे ही वाचा… अमित ठाकरेंसाठी निवडणूक फार अवघड:माहीम मतदारसंघात ठाकरे गटाचे महेश सावंत अन् शिवसेनेच्या सरवणकरांशी होणार तगडी फाईट मुंबई – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे माहीम विधानसभा मतदारसंघातून विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत. शिवसेनेने या ठिकाणी सदा सरवणकर या आपल्या अनुभवी नेत्याला पुन्हा एकदा मैदानात उतरवले आहे. तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते महेश सावंत यांनी ठाकरेंनी आपल्याला उमेदवारी दिल्याचा दावा केला आहे. त्यामुळे येथील तिरंगी लढत पाहता अमित ठाकरे यांचे विधानसभेवर जाण्याचा मार्ग फार खडतर असल्याचे स्पष्ट झाले आहे. वाचा सविस्तर

Share

-