पाकिस्तान- तोशाखान्याच्या दुसऱ्या प्रकरणात इम्रान खान यांना जामीन मिळाला:सुटकेबाबत परिस्थिती स्पष्ट नाही; माजी पंतप्रधान 474 दिवसांपासून तुरुंगात आहेत

तुरुंगात बंद पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना तोशाखाना (तोशाखाना केस-2) संबंधित दुसऱ्या प्रकरणात जामीन मिळाला आहे. इस्लामाबाद उच्च न्यायालयाने जामीन म्हणून 10 लाख पाकिस्तानी रुपयांचे बाँड जमा करण्याचे आदेश दिले आहेत. इम्रान खान गेल्या वर्षी 5 ऑगस्टपासून तुरुंगात आहेत. मात्र, जामीन मिळाल्यानंतर इम्रान यांची सुटका होणार की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. आधीच तुरुंगात असलेल्या इम्रान खान आणि...

PM मोदी आणि गयानाचे राष्ट्राध्यक्ष यांच्यात द्विपक्षीय चर्चा:मोदी म्हणाले- 24 वर्षांनी गयानाला आलो; कॅरेबियन देशात जन औषधी केंद्र उघडणार भारत

पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या गयाना दौऱ्यावर आहेत. बुधवारी संध्याकाळी (भारतीय वेळेनुसार) पंतप्रधान मोदी आणि गयानाचे अध्यक्ष मोहम्मद इरफान यांच्यात द्विपक्षीय चर्चा झाली. या काळात दोन्ही देशांमध्ये अनेक करार झाले आहेत. चर्चेनंतर पंतप्रधान मोदी आणि अध्यक्ष इरफान यांनीही लोकांना संबोधित केले. आपल्या भाषणादरम्यान पंतप्रधान मोदींनी अध्यक्ष इरफान यांचे गयानामध्ये स्वागत केल्याबद्दल त्यांचे आभार मानले. अध्यक्ष इरफान यांच्याबद्दल बोलताना पीएम मोदी...

हिंगोली जिल्हयात मतदानाचा टक्का वाढल्याने भावी आमदारांची धाकधूक वाढली:सर्वात जास्त कळमनुरीत 73 टक्के मतदान, हिंगोलीत 68 टक्के

हिंगोली जिल्हयात मागील निवडणुकीच्या तुलनेत यावेळी वसमत विधानसभा मतदार संघ वगळता इतर दोन ठिकाणी मतदानाची टक्केवारी वाढल्याने भावी आमदारांचीही धाकधूक वाढली आहे. जिल्हयात तीन मतदार संघात सरासरी ७१.०५ टक्के मतदान झाले असून सर्वात जास्त कळमनुरी तालुक्यात ७३ टक्के मतदान झाले आहे. हिंगोली जिल्हयातील हिंगोली, वसमत, कळमनुरी विधानसभा मतदार संघात ५३ उमेदवार निवडणुक रिंगणात होते. यामध्ये हिंगोली विधानसभा मतदार संघात २३,...

मोनिका राजळे यांची शाळेच्या खोलीतून सुटका:राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या जमावाने हुल्लडबाजी केल्याचा दावा

अहिल्यानगर जिल्ह्यातील भाजपच्या आमदार व पाथर्डी उमेदवार मोनिका राजळे यांनी स्वतःला एका शाळेच्या खोलीत बंद करून घेतले होते. पोलिसांनी त्यांना सुरक्षितपणे बाहेर काढले आहे. बूथ कॅप्चरिंगची माहिती मिळाल्यानंतर आपण शिरसाठवाडी या ठिकाणी गेलो असता राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या जमावाने हुल्लडबाजी सुरू केल्याचा आरोप त्यांनी केला. या हुल्लडबाजीमुळेच स्वतःला खोलीत बंद केले असल्याचे त्यांनी सांगितले आहेत. शिरसाठवाडी येथे झालेल्या या घटनेमुळे...

विधानसभा निवडणुकीला गालबोट:साताऱ्याच्या भोसे गावात दोन गटात मारहाण

सातारा जिल्ह्यात निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडत असताना सातारा व कोरेगाव येथे शेवटच्या एका तासांमध्ये दोन विविध घटनांमध्ये मारामारीच्या घटना घडल्या आहेत. सातार्‍यात किरकोळ कारणावरून राजे समर्थकांमध्ये मारामारी झाल्याने माजी नगरसेवक वसंत लेवे यांच्यासह चौघेजण जखमी झाले. कोरेगाव मतदार संघात भोसे येथे बीप का वाजत नाही, अशी विचारणा करण्याच्या मुद्द्यावरून दोन गटांमध्ये मारामारी झाल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सातारा...

‘मुफासा: द लायन किंग’चा हिंदी ट्रेलर रिलीज:शाहरुख खान बनला मुफासाचा आवाज, आर्यन-अबरामनेही केले चित्रपटात डबिंग; 20 डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार

हॉलिवूडचा लोकप्रिय ॲनिमेटेड चित्रपट ‘मुफासा: द लायन किंग’चा ट्रेलर रिलीज झाला आहे. या ॲनिमेटेड चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनमध्ये शाहरुख खानसोबत त्याची दोन मुले अबराम खान आणि आर्यन खान यांनी आवाज दिला आहे. हा चित्रपट 20 डिसेंबर 2024 रोजी इंग्रजी, हिंदी, तमिळ आणि तेलगू भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. काय आहे चित्रपटाची कथा? ‘मुफासा: द लायन किंग’ यामध्ये रफिकीला प्राइड लँड्सच्या राजाची कथा...

भारताने महिला आशियाई हॉकी चॅम्पियनशिपची फायनल जिंकली:चीनचा 1-0 असा पराभव, दीपिकाचा गोल ठरला निर्णायक; तिसऱ्यांदा जिंकली ट्रॉफी

बिहारमधील राजगीर येथे झालेल्या महिला आशियाई हॉकी चॅम्पियनशिप ट्रॉफीवर भारताने कब्जा केला आहे. टीम इंडियाने चीनचा 1-0 असा पराभव केला आहे. तिसऱ्या क्वार्टरच्या पहिल्या सामन्याच्या 31व्या मिनिटाला दीपिकाने टीम इंडियासाठी पहिला गोल केला, ज्यामुळे भारताला विजय मिळवून दिला. पहिल्या आणि दुसऱ्या क्वार्टरमध्ये एकूण 30 मिनिटांच्या खेळात दोन्ही संघांना एकही गोल करता आला नाही. भारत आणि चीनचे संघ 0-0 असे बरोबरीत...

हिंगोलीतील सखी मतदान केंद्र गुलाबी रंगाने सजले:महिला कर्मचाऱ्यांचे ड्रेसकोडही गुलाबी रंगाचे, मतदारांनी मतदानानंतर घेतली सेल्फी

हिंगोली शहरातील सीटीक्लबच्या मैदानावरील सखी मतदान केंद्रावर बुधवारी ता. २० अल्हाददायक चित्र होते. मतदान केंद्र गुलाबी रंगाच्या फुग्यांनी सजविले होते तर केंद्रामध्ये गुलाबी पुष्पगुच्छ ठेवण्यात आले होते. तर या केंद्रावर नियुक्त केलेल्या महिला कर्मचाऱ्यांचे ड्रेसकोड देखील गुलाबी रंगाचे होते. मतदान केंद्रावर येणाऱ्या मतदारांचे स्वागत केले जात असल्याचे चित्र होते. या मतदान केंद्रावर अल्हाददायक चित्र पहावयास मिळाले. हिंगोली जिल्हयात यावर्षी प्रशासनाने...

विधानसभा निवडणुकीत बीड सर्वात जास्त चर्चेत:बोगस मतदान तर कुठे थेट हाणामारी, जिल्ह्यात कुठे कुठे काय झाले?

बीड जिल्ह्यामध्ये सहा विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदान प्रक्रिया पार पडत आहे. अनेक मतदार संघामध्ये सुरळीतपणे मतदान प्रक्रिया दुपारपर्यंत पार पडली. मात्र दुपारनंतर परळी व आष्टी येथील मतदान केंद्रांवर घोळ सुरू असल्याचे उघडकीस आले आहे. याचे व्हिडिओ देखील व्हायरल होत आहेत. परळी येथील मतदान केंद्राच्या बाहेरच बोटाला शाई लाऊन परत पाठवत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तर आष्टी येथे भाजप व राष्ट्रवादी...

पाकिस्तानात लष्कराच्या चौकीवर आत्मघाती हल्ला:12 जवान शहीद, कारमध्ये ठेवलेल्या स्फोटकांचा स्फोट; 6 दहशतवादीही मारले गेले

पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतातील बन्नू जिल्ह्यातील लष्कराच्या चौकीवर मंगळवारी रात्री आत्मघाती हल्ला झाला. या हल्ल्यात 12 पाकिस्तानी सैनिकांचा मृत्यू झाला आहे. यात सहा दहशतवादीही ठार झाले आहेत. हे दहशतवादी एका वाहनातून चेक पोस्टवर हल्ला करण्यासाठी आले होते. पाकिस्तानी लष्कराच्या मीडिया शाखेने माहिती देताना सांगितले की, दहशतवादी हल्ला हाणून पाडण्यात आला. मात्र, दहशतवाद्यांनी चेकपोस्टच्या भिंतीवर वाहन घुसवून त्यात ठेवलेल्या स्फोटकांचा स्फोट...

-