पाकिस्तानमध्ये झालेल्या स्फोटात 7 ठार, 23 जखमी:मृतांमध्ये 5 मुले आणि पोलिसांचा समावेश, स्फोट घडवण्यासाठी मोटरसायकलमध्ये IED बॉम्ब पेरला
पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात शुक्रवारी झालेल्या स्फोटात 7 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये 5 मुले आणि एका पोलिसाचा समावेश आहे. याशिवाय 23 जण जखमी झाले आहेत. स्फोट घडवून आणण्यासाठी मोटारसायकलवर रिमोट कंट्रोल्ड आयईडी बॉम्ब पेरण्यात आला होता. मस्तुंग जिल्ह्यातील सिव्हिल हॉस्पिटल चौकातील कन्या माध्यमिक विद्यालयाजवळ हा स्फोट झाला. स्थानिक पोलिस अधीक्षक रहमत उल्लाह यांनी सांगितले की, या हल्ल्याचे लक्ष्य पोलिओ लसीकरण...