
आरोग्य क्षेत्रातील समानतेसाठी महत्त्वपूर्ण पाऊल:सिम्बायोसिस विद्यापीठात 'सिमहेल्थ २०२५' परिषदेचे आयोजन; जागतिक तज्ज्ञांचा सहभाग
सिम्बायाेसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठातर्फे आराेग्य क्षेत्रातील जनजागृती व आधुनिक तंत्रज्ञान याबाबत चर्चा करण्याकरिता ११ व १२ एप्रिल राेजी सिम्बायाेसिस स्कूल ऑफ ऑनलाइन अँड डिजीटल लर्निंग, वैद्यकीय व आराेग्य विज्ञान विद्याशाखा, लवळे,पुणे येथे ‘सिमहेलथ २०२५’ या परिषदेचे आयाेजन करण्यात आले आहे, अशी माहिती विद्यापीठाचे संचालक डाॅ.राजीव येरवडेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. डाॅ. येरवडेकर म्हणाले, या परिषदेची थीम ही ‘अॅडव्हान्सिंग इक्विटी अँड इनक्लुयेजन: ए पाथवे टु अॅचिव्हिंग एसडीजीएस फाॅर हेल्थकेअर फ्युचर जनरेशन’ ही आहे. ज्याचा उद्देश आराेग्यसेवेतील असामनता दूर करणे व संयुक्त राष्ट्रांच्या शाश्वत विकास उद्दिष्टांशी जुळणाऱ्या शाश्वत आराेग्य सेवा उपायांना प्राेत्साहन देणे हा आहे. भारताच्या आराेग्य सेवा क्षेत्रात एक महत्वपूर्ण कार्यक्रम असलेल्या या परिषदेत जागतिक आराेग्य सेवा नेते, धाेरणकर्ते, उद्याेग तज्ञ, संशाेधक व शिक्षणतज्ञ आपला सहभाग नाेंदवणार आहे. परिषदेत समतापूर्ण आणि समावेशक आराेग्य सेवा प्रणालींना पुढे नेण्यासाठी कृतीयाेग्य धाेरणांवर चर्चा करण्यात येणार आहे. आराेग्यसेवा वितरण हे डिजीटल प्लॅटफाॅर्मकडे वाटचाल करत असून आराेग्यसेवातील सामाजिक, आर्थिक, भाैगाेलिक असमानता डिजीटल नवाेपक्रम कसे दूर करु शकतील यावर चर्चा करण्यात येणार आहे. या चर्चेत टेलिमेडिसिन, माेबाईल आराेग्य , इलेक्ट्राॅनिक आराेग्य रेकाॅर्ड, एआय चलित आराेग्यसेवा उपायांची भूमिका, ग्रामीण व वंचित समुदयात समान आराेग्यसेवा प्रवेशातील अडथळयावर मात करणे या गाेष्टीवर भर दिला जाणार आहे. आराेग्यसेवा प्रवेशातील आर्थिक अडथळे कमी करण्यासाठी धाेरणे, वंचित क्षेत्रात वैद्यकीय काैशल्य व सेवांचा विस्तार , सार्वजनिक आराेग्यसेवा खर्चात वाढ, धाेरण सुधारणा व अंमलबजावणीसाठी राेडमॅप यावर चर्चा करण्यात येईल.