
पॅलेस्टाइन समर्थनाच्या मुद्द्यावरील आंदोलनाला हिंसक वळण:बांगलादेशमध्ये केएफसी, बाटा, पिझ्झा हटची आऊटलेट्स कट्टरवाद्यांच्या निशाण्यावर
बांगलादेशला पुन्हा एकदा अशांतता व तीव्र निदर्शनांची झळ बसली आहे. या वेळी इस्रायल-गाझा युद्धामुळे संतापाची लाट आहे. कथित इस्रायलचे समर्थन केल्यावरून कट्टरवाद्यांनी केएफसी, बाटा, पिझ्झा हट, प्युमासारख्या आंतरराष्ट्रीय ब्रँड्सच्या आऊटलेट्सना लक्ष्य करणे सुरू केले आहे. ढाका, चटगाव, सिलहट, खुलना व कुमिल्लासह डझनभर शहरांत हजारो निदर्शक रस्त्यावर उतरले आहेत. या निदर्शकांनी आंदोलनादरम्यान इस्रायलच्या विरोधात घोषणाबाजी केली आणि आंतरराष्ट्रीय ब्रँड्सच्या दालनांची लुटालूट व जाळपोळ केली. गेल्या वर्षी बांगलादेशमध्ये झालेल्या विद्यार्थी आंदोलनातील हिंसाचारानंतरची ही सर्वात मोठी उपद्रवी घटना मानली जाते. ब्रँड्सवरील हल्ला इस्रायलचे समर्थन केल्याच्या अफवेमुळे झाला असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. बाटा झेक प्रजासत्ताकची कंपनी आहे. त्या कंपनीचे इस्रायलशी काही देणे-घेणे नाही. डॉमिनोझ-केएफसी अमेरिकन कंपनी आहे. बाटा म्हणाले, आमची एक खासगी कंपनी आहे. आमचा इस्रायल व गाझा संघर्षात राजकीय संबंध नाही. मोदी-युनूस भेटीत बांगलादेशात कट्टरवाद, अल्पसंख्याकांवरील हल्ल्याचे मुद्दे : जयशंकर परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर बुधवारी म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युनूस यांची बँकॉकमध्ये भेट घेतली. त्यात त्यांनी कट्टरवाद व अल्पसंख्याकांवरील हल्ल्याबाबत भारताची चिंता व्यक्त केली. वातावरण बिघडेल अशा प्रकारची विधाने करणे टाळले पाहिजे, असा सल्लाही मोदींनी युनूस यांना दिला. आमचे नाते ऐतिहासिक व जनतेच्या पातळीवर आहे. बांगलादेशची भलाई भारताएवढी कुणालाही वाटत नाही. इकडे...पाकच्या अण्वस्त्र कार्यक्रमावर अमेरिकेची कारवाई, १९ कंपन्यांवर निर्बंध सिलहट येथे जमावाने एक डझन फास्टफूड रेस्तराँ, दुकानांची तोडफोड केली. केएफसीचे मोठे नुकसान झाले. अमेरिकेचे वाणिज्य विभागाचे ब्यूरो ऑफ इंडस्ट्री अँड सिक्युरिटीने १९ पाकिस्तानी कंपन्यांवर निर्बंध लावले. त्यापैकी १२ कंपन्या ‘असुरक्षित’ अण्वस्त्र व्यवहारात सामील असल्याचा आरोप आहे. ७ कंपन्यांना पाकिस्तानच्या बॅलेस्टिक क्षेपणास्त्र कार्यक्रमात सहभाग दिल्यावरून तिला काळ्या यादीत समाविष्ट केले. यादीत समाविष्ट कंपन्यांना अमेरिकेची राष्ट्रीय सुरक्षा व परराष्ट्र धोरणासाठी ते धोकादायक असल्याचे म्हटले आहे.अमेरिकेच्या या निर्णयानंतर पाकिस्तानचा तिळपापड झाला आहे. पाकने या निर्णयावर टीका केली. हे केवळ राजकीय संकट नव्हे तर आणीबाणी : अवामी लीग हिंसाचारामुळे देशातील राजकीय वातावरण तापले आहे. माजी पंतप्रधान शेख हसीना यांचा पक्ष अवामी लीगने या निदर्शनांना धोकादायक संकेत असल्याचे म्हटले. किंबहुना हे केवळ राजकीय संकट नव्हे तर राष्ट्रीय आणीबाणी असल्याचे पक्षाने म्हटले आहे. बांगलादेश लवकर सावरला नाही तर त्याची वाटचाल अफगाणिस्तानसारखी सुरू होईल. अवामी लीगने सरकार अपयशी असून मोहंमद युनूस यांच्या राजीनाम्याची मागणी केली. युनूस यांना सत्ता सांभाळता येत नाही. त्यांच्या राज्यात सातत्याने अराजकता वाढू लागली आहे, असे पक्षाने म्हटले आहे.खरे तर बांगलादेशात सध्या जागतिक गुंतवणूक शिखर संमेलनाची तयारी सुरू आहे. परंतु सरकार अशा प्रकारच्या घटनांना रोखण्यात अयशस्वी राहिल्यास या गुंतवणूक संमेलनावर मोठा परिणाम झाल्याचे दिसून येऊ शकते, असे तज्ज्ञांना वाटते. याआधीही बांगलादेशात कट्टरवाद्यांच्या हिंसेमुळे १५० कंपन्यांनी आपले काम मर्यादित ठेवले आहे. पोलिसांनी हिंसाचारात सामील ४९ जणांना अटक केली आहे. इतर संशयितांची आेळख पटवली जात आहे.