
राणाचे क्रेडिट घ्यायचे असेल, तर पुलवामा हल्ल्याचेही घ्या:संजय राऊत यांचा भाजपवर घणाघात; कुलभूष जाधवांची करून दिली आठवण
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी अमेरिकेतून प्रत्यार्पण करण्यात आलेल्या तहव्वूर राणा अटकेवरून भाजपला खडेबोल सुनावलेत. मुंबई हल्ल्यातील प्रमुख आरोपी असणाऱ्या तहव्वूर राणाला भारतात आणल्याप्रकरणी प्रशासन व तपास यंत्रणांचे कौतुक करण्याची गरज आहे. या प्रकरणी भाजपने क्रेडिट घेण्याचा प्रयत्न केला, तर त्यांना पुलवामा हल्ल्याचेही क्रेडिट घ्यावे लागेल, असे ते म्हणाले. संजय राऊत यांनी शुक्रवारी दुपारी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणावरून भाजपवर हल्ला चढवला. ते म्हणाले, तहव्वूर राणाला भारतात आणल्यानंतर एवढे क्रेडिट घेणाऱ्या भाजपवाल्यांना माहिती पाहिजे की, यापूर्वीही अनेकांना भारतात अशाच प्रकारे आणण्यात आले आहे. यापूर्वी अबू सालेमला भारतात आणण्यात आले. राणाला आणण्यासाठी भारत सरकार 2009 पासून सातत्याने प्रयत्न करत आहे. 2009 साली राणा व हेडली विरोधात एनआयएने पहिला एफआयआर दाखल केला. हे तर परराष्ट्र खात्याचे यश एनआयएच्या पथकाने शिकागोला जाऊन राणा व हेडलीची चौकशी केली. 2012 साली तत्कालीन परराष्ट्र मंत्री सलमान खुर्शीद स्वतः अमेरिकेला गेले आणि राणाला भारतात आणण्याच्या मुद्यावर तेथील नेत्यांशी चर्चा केली. पंतप्रधान मोदींना घ्यायला त्या दिवशी ट्रम्प व्हाईट हाऊसच्या बाहेर देखील आले नाहीत. काहीही बोलता का तुम्ही? राणाला कायदेशीर प्रक्रियेद्वारे आणण्यात आले आहे. ही एक प्रक्रिया आहे. कुणालाही भारतात आणण्यासाठी ती पार पाडली जाते. हे आपल्या भारत सरकारचे यश आहे. परराष्ट्र खात्याचे यश आहे. त्याचा कोणत्याही पक्षाशी संबंध नाही. ते पुढे म्हणाले, तहव्वूर राणा हा मुंबईवरील हल्ल्यातील एक प्रमुख आरोपी आहे. त्याचे अमेरिकेहून भारतात प्रत्यार्पण करण्यात आले. या प्रकरणी प्रशासन व तपास यंत्रणांचे कौतुक झाले पाहिजे. यासंबंधी तहव्वूर राणाचा फेस्टिव्हल करण्याची काही गरज नाही. भाजपने या प्रकरणी क्रेडिट घेण्याचा प्रयत्न केला, तर त्याला पुलवामा हल्ल्याचेही क्रेडिट घ्यावे लागेल. कुलभूषण जाधव यांना परत आणावे लागेल. मेहूच चोक्सी व नीरव मोदी यांनाही घेऊन यावे लागेल. राणाला फासावर चढवण्यास आणले की, क्रेडिट घ्यायला संजय राऊत यांनी यावेळी वक्फ दुरुस्ती विधेयकावरूनही भाजपवर निशाणा साधला. भाजप कोणताही निर्णय मुहूर्त पाहून घेते. अमेरिकेने ज्या दिवशी टॅरीफची घोषणा केली, त्या दिवशी त्यांनी वक्फ दुरुस्ती विधेयक आणले. आता बिहार व पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या अगोदर राणाला फासावर चढवतील. त्यानंतर देशात राणा फेस्टिव्हल साजरा करतील. भाजपने हे ठरवले पाहिजे की, राणाला खटला चालवून फासावर लटकवण्यासाठी आणले आहे की, क्रेडिट घ्यायला आणले आहे. अमित शहाहे शिंदे, अजित पवारांचे नेते संजय राऊत यांनी यावेळी अमित शहा यांच्या महाराष्ट्र दौऱ्यावरही टीका केली. ते म्हणाले, राज्यात सुरू असणारी गुन्हेगारी व कायदा व सुव्यवस्थेची मोडकळीस आलेली स्थिती पाहण्यासाठी अमित शहा महाराष्ट्रात येत आहेत. ते रायगडला जाणार आहेत. पण छत्रपती शिवाजी महाराज त्यांना केव्हाच आशीर्वाद देणार नाहीत. यांनी महाराष्ट्र दुबळा केला. महाराष्ट्र व मुंबई तोडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यांच्या पाठिशी शिवरायांचा आशीर्वाद राहणार नाही. अमित शहा हे एकनाथ शिंदे व अजित पवार यांचे नेते आहेत. ते नसते तर शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस फुटली नसती. या दोघांनाही पक्ष व चिन्ह मिळाले नसते.