News Image

महात्मा ज्योतिबा फुलेंची 198 वी जयंती:नाशिकमधील अर्धाकृती ब्राँझ शिल्पाला आकर्षक फुलांची सजावट, अभिवादनासाठी गर्दी


महात्मा ज्योतिबा फुले यांची आज 198 वी जयंती आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त अनेक राजकीय नेत्यांकडून आज फुले वाड्यातील समता भूमीला अभिवादन करण्यात आले. याच्यासोबतच फुले यांचे भारतातील सर्वात मोठे अर्धाकृती ब्राँझ धातूचे शिल्प असलेल्या नाशिकमधील मुंबईनाका परिसरात माजी खासदार समीर भुजबळ यांनी महात्मा ज्योतिबा फुलेंना अभिवादन केले आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला नाशिकमधील त्यांच्या स्मारकावर आकर्षक फुलांची सजावट तसेच विद्युत रोषणाई करण्यात आली. नाशिक येथील सावित्रीबाई फुले चौकात क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे भारतातील सर्वात मोठ्या अर्धाकृती ब्राँझ धातूच्या शिल्प आहे. तिथे समीर भुजबळांकडून पुष्पहार अर्पण करत अभिवादन करण्यात आले. मध्यरात्री अभिवादन महात्मा ज्योतिबा फुले यांच्या निमित्ताने मध्यरात्री बारा वाजता ढोल ताशांच्या गजरात व फटाक्यांची आतिषबाजी करत महात्मा फुले यांच्या पुतळ्यास पुष्हार अर्पण करत अभिवादन करण्यात आले. यावेळी फुले यांचे अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते.महात्मा फुले आज जयंती साजरी होत असून त्यानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे देखिल आयोजन करण्यात आले आहे. अर्धाकृती पुतळा का?
नाशिकमधील फुले स्मारकासाठी संकल्प चित्र तयार करण्यात आल्यानंतर पुतळे उभे किंवा अर्धाकृती करण्यात यावेत, यावर विचार विनिमय करण्यात आला. आजवर विविध ठिकाणी उभे पुतळे निर्माण केले गेले आहेत. ते अतिशय उंच असल्याने त्याची निगा राखणे कठीण होते. त्यामुळे हे पुतळे अतिशय नेटके वाटावे, त्याची व्यवस्थित निगा राखली जावी. यादृष्टीने ब्राँझ धातूचे देशातील सर्वाधिक उंचीचे अर्धाकृती पुतळे उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. स्मारक आहे कसे?
नाशिकमधी मुंबई नाका परिसरात सुमारे 2710 मीटर जागेवर महात्मा फुले यांचे भव्य दिव्य स्मारक उभारण्यात आले आहे. यामध्ये महात्मा फुले यांच्या पुतळ्याची उंची 18 फूट तर सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याची उंची 16.50 फूट इतकी आहे. या पुतळ्याच्या परिसरात विशेष अशी प्रकाश योजना करण्यात आली आहे. तसेच, स्मारकातील विद्युत रोशनाईचा वाहतुकीस कुठलाही अडथळा निर्माण होऊ नये, अशी विशेष प्रकाश योजना याठिकाणी करण्यात आली आहे. या स्मारकात सुसज्ज वाहतून बेट, पाण्याचे कारंजे निर्माण करण्यात येऊन सर्व स्मारक परिसरात गार्डन व सुशोभीकरण करण्यात आले आहे. स्मारकातील शिल्प कसे?