
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा रायगडमध्ये दाखल:शिवरायांच्या हातावरच तुरी देणाऱ्या लोकांचे सरदार म्हणत अंबादास दानवेंची टीका
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा कालच राज्यात दाखल झाले आहेत. ते रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांच्या सुतारवाडी येथील निवासस्थानी भेट देणार असून स्नेहभोजनाचे आयोजनही करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त अमित शहा रायगडावर आदरांजली वाहणार आहेत.