
नागपूर जिल्ह्यात ॲल्युमिनियम फॉइल बनवणाऱ्या कंपनीत स्फोट:स्फोटानंतर लागलेल्या आगीत 5 जणांचा मृत्यू; उमरेड MIDC मधील घटना
नागपूर जिल्ह्यातील उमरेड एमआयडीसी मध्ये ॲल्युमिनियम फॉइल बनवणाऱ्या कंपनीत आग लागली आहे. या स्फोटात पाच जणांचा मृत्यू झाला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तर जखमींवर नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात उपचार सुरु आहेत. उमरेड येथील ॲल्युमिनियम फॉइल बनवणाऱ्या कारखान्यात झालेल्या या स्फोटात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. दोघांचा उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला. या घटनेत बेपत्ता असलेल्या 3 जणांच्या मृत्यूची पुष्टी झाली आहे. या संदर्भात नागपूर ग्रामीणचे एसपी हर्ष पोद्दार यांनी वृत्तसंस्थेला दिली आहे. यात सुरुवातीला सहा जण जखमी झाले होते. त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर होती. त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. इतर जखमींना नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात हलवण्यात आले आहे. पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून उमरेड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक धनाजी जलक अधिक तपास करत आहेत. आम्ही हे सातत्याने अपडेट करत आहोत...