News Image

‘प्रोफेशनल डेव्हलपमेंट’ हाच शिक्षकांसाठी मंत्र:सूरज भगत यांचे प्रतिपादन; महात्मा फुले महाविद्यालयात फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम‎


प्रतिनिधी | शेंदुरजनाघाट वरुड येथील महात्मा फुले कला, वाणिज्य आणि सीतारामजी चौधरी विज्ञान महाविद्यालयात बेस्ट इको सोल्यूशन्स आणि टेक्नॉलॉजी प्रा. लि. पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने नुकताच प्रगतीशील भविष्यासाठी शिक्षकांना सक्षम बनवण्याकरिता प्राध्यापक विकास कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाचे उद्दिष्ट प्राध्यापकांचे अध्यापन कौशल्य, ज्ञान आणि कौशल्य वाढवणे होते. कार्यक्रमाची सुरुवात प्राचार्य डॉ. डी. व्ही. हांडे यांच्या उद्घाटन सत्राने झाली. त्यांनी महाविद्यालयात प्राध्यापक विकासाचे महत्त्व अधोरेखित केले. शिक्षकांनी २१ व्या शतकातील शिक्षक बनण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आजचा विद्यार्थी जिज्ञासू आणि नवीन तंत्रज्ञानाचे आकलन असणारा आहे. त्याच्या समोर जाताना शिक्षकांनीही अपडेट असले पाहिजे. बेस्ट इको सोल्यूशन्स अँड टेक्नॉलॉजी प्रा. लि.चे संचालक सूरज भगत यांनी नाविन्यपूर्ण अध्यापनशास्त्र, संशोधन पद्धती आणि तंत्रज्ञान एकात्मता यासारख्या विषयांवर मार्गदर्शन केले. सूरज भगत यांनी मौल्यवान अंतर्दृष्टी आणि दृष्टिकोन प्रदान करणाऱ्या मानसिकता धोरणांवर चर्चा केली. महाविद्यालयात विद्यार्थ्यांचा सहभाग वाढवण्यासाठी नवीन शिक्षण पद्धती आणि तंत्रज्ञानाबद्दल शिक्षकांनी अवगत व्हावे, असे त्यांनी सांगितले. प्राध्यापक विकास कार्यक्रमामुळे प्राध्यापक सदस्यांना मौल्यवान अंतर्दृष्टी कौशल्ये आणि नेटवर्क संधी मिळाल्या. या कार्यक्रमाचा परिणाम शैक्षणिक समुदायात जाणवेल. नवीन तंत्रज्ञानाचे आकलन असणारा आहे. त्याच्या समोर जाताना शिक्षकांनीही अपडेट असले पाहिजे. जो अध्यापनाची गुणवत्ता आणि संशोधन उत्कृष्टता वाढवेल. डॉ. अतुल वंजारी यांनी प्राध्यापक विकास कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून काम पाहिले. महाविद्यालय नियमितपणे विविध विषयांवर आधारित असे कार्यक्रम आयोजित करेल जेणेकरून अधिकाधिक प्राध्यापकांना सहभागी होण्यास प्रोत्साहन मिळेल, असे डॉ. वंजारी म्हणाले. या कार्यक्रमाला प्राध्यापक विकास कार्यक्रमात एकूण ४२ प्राध्यापकांनी भाग घेतला. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळींची या कार्यक्रमाला उपस्थिती लाभली होती. फुले महाविद्यालयात फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राममध्ये उपस्थित मान्यवर.