News Image

बांगलादेशात इस्लामी सरकार, शरिया लागू करण्यासाठी कट्टरपंथी एकत्र...:अल्पसंख्याक, महिला कट्टरपंथीयांच्या निशाण्यावर


माजी पंतप्रधान शेख हसीना यांना बांगलादेशात सत्ताच्युत करण्यास मदत करणारे इस्लामी कट्टरपंथी आता आपल्या खऱ्या उद्देशावर परतले आहेत. ८४ वर्षीय नोबेल पुरस्कार विजेते मुहंमद युनूस यांच्या नेतृत्वाखालील देशातील काळजीवाहू सरकारच्या दुर्लक्षादरम्यान हसीना यांनी ज्यांच्यावर निर्बंध घातले होते,असे इस्लामी कट्टरपंथी पुन्हा सक्रिय झाले आहेत. ते बांगलादेशला जास्त कट्टरपंथी दिशेकडे ढकलण्यात गुंतले आहेत. एका शहरात धार्मिक कट्टरपंथीयांनी घोषणा केली की, तरुण महिला आता फुटबॉल खेळू शकणार नाहीत. दुसऱ्या शहरात, सार्वजनिक ठिकाणी एका महिलेने केस न झाकल्यामुळे एका व्यक्तीने त्रास दिला होता. त्याला सोडण्यासाठी दबाव आणला होता. नंतर त्या व्यक्तीचा पुष्पहार घालून सत्कारही केला होता. बांगलादेश आपल्या लोकशाहीची पुनर्स्थापना आणि १७.५ कोटी लोकांसाठी एक नवे भविष्य बनवण्याचा प्रयत्न करत आहे,त्यादरम्यान कट्टरपंथी इस्लामी नेते बांगलादेशात एक इस्लामी सरकार स्थापन करणे आणि शरिया कायदा लागू करण्यासाठी एकत्र येत आहेत. युनूस यांच्या सल्ल्यावर ईशान्येत संताप, मागणी - ‘बांगलादेश तोडा’ बांगलादेशचे मुख्य सल्लागार मुहंमद युनूस यांच्या चीनला भारताच्या ईशान्य राज्यांत आपला प्रभाव वाढवण्यासाठी निमंत्रित करणाऱ्या टिप्पणीवर सर्व पक्षांनी तीव्र प्रतिक्रिया दिली. पीएम मोदींचे आर्थिक सल्लागार परिषदेचे सदस्य संजीव सान्याल म्हणाले, चीनचे बांगलादेशाती गुंतवणुकीत स्वागत आहे. मात्र, ७ भारतीय राज्यांच्या लँडलॉक्ड होण्याचा काय अर्थ? आसामचे सीएम हिमंत बिस्वा सरमा यांनी लिहिले की, काही अंतर्गत तत्त्वांनी ईशान्येला वेगळे करण्याचा धोकादायक सल्ला दिला आहे. त्यामुळे चिकन नेक कॉरिडॉरच्या खाली व अधिक बळकट रेल्वे, रस्त्याचे जाळे विकसित करणे अनिवार्य आहे. त्रिपुरात भाजपचा सहकारी पक्ष टिपरा मोथाचे संस्थापक प्रद्योत किशोर देबबर्मा यांनी पोस्ट केली की, अभियांत्रिकीच्या नव्या आणि आव्हानात्मक विचारांवर अब्जावधी डॉलर खर्च करण्याऐवजी आम्ही बांगलादेश तोडू शकतो आणि समुद्रापर्यंत आपली पोहोच बनवू शकतो. चटगावच्या डोंगरी भागात नेहमी स्वदेशी आदिवासी राहतात, जे १९४७ पासून भारताचा भाग होऊ इच्छितात. देबबर्मा म्हणाले, भारताची सर्वात मोठी चूक १९४७ मध्ये चटगाव बंदर सोडणे होती. त्यांचे पूर्वजांनी(माणिक्य राजवंश) १९४९ मध्ये भारतात विलिनीकरणाआधी त्रिपुरावर राज्य केले होते. आंदोलक विद्यार्थिनींना फसवणूक झाल्याची जाणीव होतेय