मराठी
'माधुरी' हत्तीच्या घरवापसीसाठी राजू शेट्टींचे एकदिवसीय लाक्षणिक उपोषण:निर्णय होऊनही परतीस विलंब झाल्याचा आरोप
✍️ ऑथर / संपादक: नातेपुते एक्सप्रेस
📅 28 July 2026, 07:21 AM
नांदणी मठातील 'माधुरी' हत्तीला वनतारा येथे हलवून एक वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी तिच्या घरवापसीसाठी एकदिवसीय उपवास आंदोलन सुरू केले आहे. सर्वोच्च न्यायालय, हाय पॉवर कमिटी आणि वनतारा प्रशासनाने माधुरीला नांदणी मठात परत पाठवण्याबाबत निर्णय झाल्याचा दावा करत, प्रत्यक्षात मात्र अद्याप हत्ती परत न आल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. माधुरी हत्तीच्या घरवापसीसाठी जनसंकल्प राजू शेट्टी यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, वनताराच्या सहकार्याने नांदणी येथे माधुरी हत्तीसाठी आवश्यक त्या सर्व अद्ययावत सुविधा उभारण्यात आल्या आहेत. तरीही तिच्या परतीस विलंब होत असल्याने नांदणी येथील निशिधिका परिसरात माता चक्रेश्वरी देवीची महाआरती करून 'माधुरी हत्तीच्या घरवापसीसाठी जनसंकल्प' करण्यात आला. तसेच सकाळी ७ ते सायंकाळी ७ या वेळेत एकदिवसीय उपवासाचे आयोजन करण्यात आले असून या आंदोलनात माजी मंत्री महादेव जानकर आणि माधुरीवर प्रेम करणारे अनेक कार्यकर्ते सहभागी झाल्याचे त्यांनी सांगितले. राजू शेट्टी यांनी केलेली पोस्ट.. १३ सप्टेंबरचा ऐतिहासिक महोत्सव येत्या १३ सप्टेंबर रोजी नांदणी येथे प्रथमाचार्य शांतिसागर महाराजांच्या १०० व्या चातुर्मासानिमित्त ७१ वी ऐतिहासिक पुण्यतिथी मोठ्या प्रमाणावर साजरी होणार आहे. या कार्यक्रमासाठी सांगली, कोल्हापूर आणि उत्तर कर्नाटकातून सुमारे तीन लाख भाविक उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे. नांदणी मठाच्या सुमारे १३०० वर्षांच्या इतिहासात गजराजाला असलेला ४०० वर्षांचा मान यंदा माधुरी हत्तीच्या उपस्थितीतच पार पडावा, अशी भावना व्यक्त करत तिची लवकरात लवकर घरवापसी व्हावी, अशी मागणी राजू शेट्टी यांनी केली आहे. सविस्तर वाचा.. 'नीट'नंतर राज्यात MHT-CET मध्येही घोटाळा?: शिक्षकाचा व्हिडिओतून दावा, विरोधकांच्या संतप्त प्रतिक्रिया; आरोपांचे CET सेलकडून खंडण देशभरात गाजलेल्या 'नीट' पेपरफुटीच्या वादात 'कॉक्रोच जनता पार्टी'च्या आक्रमक आंदोलनामुळे थेट केंद्रीय शिक्षणमंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला. दिल्लीतील ही धग शांत होण्यापूर्वीच, आता महाराष्ट्रात 'एमएचटी-सीईटी' (MHT-CET 2026) परीक्षेत 'नीट'पेक्षाही मोठा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप विरोधकांनी केला आहे. काँग्रेस नेते सचिन सावंत, आमदार रोहित पवार यांच्यानंतर आता राष्ट्रवादीचे नेते महादेव बालगुडे यांनी एका शिक्षकाचा व्हिडिओ समोर आणत परीक्षा यंत्रणेच्या विश्वासार्हतेवरच मोठे प्रश्नचिन्ह उभे केले आहे. बारावीत केवळ 35 ते 40 टक्के गुण मिळालेल्या काही विद्यार्थ्यांना MHT-CET मध्ये 90 ते 99 पर्सेंटाईल कसे मिळाले, असा प्रश्न उपस्थित केला. या दाव्याची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली. सविस्तर वाचा