मराठी
शरद पवार म्हणाले- राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येणार नाहीत:एक दिवसापूर्वीच सुप्रिया सुळेंनी घेतली होती अमित शहांची भेट
✍️ ऑथर / संपादक: नातेपुते एक्सप्रेस
📅 28 July 2026, 08:34 AM
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (NCP) दोन्ही गटांच्या पुन्हा एकत्र येण्याच्या शक्यतेबद्दल मंगळवारी शरद पवार यांना विचारण्यात आले. यावर त्यांनी दोन्ही गट एकत्र येण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे सांगितले. एक दिवसापूर्वी, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) च्या खासदार सुप्रिया सुळे आणि खासदार बजरंग सोनवणे यांनी सोमवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती. ही भेट सुप्रिया सुळे यांच्या मुलीच्या रिसेप्शनचे आमंत्रण देण्यासाठी झाली होती. यानंतर, शरद पवार गट भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएमध्ये सामील होऊ शकतो, अशी चर्चा तीव्र झाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री म्हणाले- आता काहीही सांगता येत नाही राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) प्रमुख शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीवर मंत्री गिरीश महाजन म्हणाले की, शरद पवार आणि पंतप्रधान मोदी यांच्या भेटीत काय चर्चा झाली, हे कोणालाच माहीत नाही. सध्या फक्त अफवा आणि तर्कवितर्क आहेत. यावर सध्या काहीही बोलता येणार नाही. 22 जुलै रोजी सुप्रिया सुळे आणि शरद पवार पंतप्रधानांना भेटले होते गेल्या पाच दिवसांत भाजपच्या नेत्यांसोबत ही सुप्रिया सुळे यांची दुसरी महत्त्वाची भेट होती. यापूर्वी 22 जुलै रोजी त्यांनी शरद पवारांसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. शरद पवारांनी मोदींना एक पत्रही सादर केले होते. ही बैठक सुमारे 20 मिनिटे चालली होती. या बैठकीबाबत शरद पवारांनी सोशल मीडियावर एका पोस्टमध्ये म्हटले- NEET परीक्षेतील पेपरफुटी, त्याविरोधात विद्यार्थ्यांचे आंदोलन, आंदोलनादरम्यान पोलिसांचे गैरवर्तन आणि विद्यार्थ्यांवर दाखल झालेले गुन्हेगारी खटले यासह कृषी क्षेत्राशी संबंधित अनेक मुद्द्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी सविस्तर चर्चा झाली. भेटीचे 4 फोटो… शरद पवार गट आणि सुनेत्रा पवार गट एकत्र येण्यात 5 आव्हाने… राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच मतभेद: पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये सत्तावाटपाबाबत एकमत नाही. राष्ट्रीय अध्यक्षपदाची मागणी: सुनेत्रा यांचे मोठे पुत्र आणि खासदार पार्थ पवार यांची इच्छा आहे की विलीनीकरणानंतर सुनेत्रा पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष व्हाव्यात आणि महाराष्ट्राचे अर्थ खाते त्यांना मिळावे. ज्येष्ठ नेत्यांचा आक्षेप: सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल आणि छगन भुजबळ यांचे म्हणणे आहे की, सत्ता आणि पदांचे वाटप सर्व नेत्यांना विचारात घेऊन व्हायला हवे. अडून राहिल्यास अडचण: जर सुनेत्रा गट राष्ट्रीय अध्यक्षपद, अर्थ मंत्रालय आणि महत्त्वाच्या कॅबिनेट विभागावर अडून राहिला, तर समझोता कठीण होऊ शकतो. शरद गटाच्या सहमतीवर प्रश्नचिन्ह: राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) या सर्व मागण्या मान्य करण्याची शक्यता कमी मानली जात आहे. काँग्रेसमधून बाहेर पडून स्थापन केली होती राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची (NCP) स्थापना 10 जून 1999 रोजी शरद पवार, पी.ए. संगमा आणि तारिक अन्वर यांनी केली होती. या तिन्ही नेत्यांनी सोनिया गांधींच्या परदेशी वंशाचा मुद्दा उपस्थित करत पक्षाच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. काँग्रेसने त्यांना पक्षातून काढून टाकले. त्यानंतर या तिघांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. हेही वाचा… MHT-CET परीक्षेतील पर्सेंटाईल फॅक्टर:पर्सेंटाइल म्हणजे काय? 12वीचे टक्के आणि CET पर्सेंटाईल एकच नसतात; सोप्या भाषेत समजून घ्या 'एमएचटी-सीईटी' (MHT-CET) परीक्षेतील कथित घोटाळ्याच्या आरोपांवर स्पष्टीकरण देताना सीईटी सेलचे आयुक्त दिलीप सरदेसाई यांनी 'टक्केवारी' (Percentage) आणि 'पर्सेंटाईल' (Percentile) यातील गल्लत टाळण्याचे आवाहन केले आहे. अनेक विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या मनात पर्सेंटाईल म्हणजे नेमके काय, हा प्रश्न असतो. हाच 'पर्सेंटाईल फॅक्टर' सोप्या भाषेत खालीलप्रमाणे समजावून सांगितला आहे: सविस्तर वाचा NEET सारखाच घोटाळा MH-CET परीक्षेतही!: बारावीला 35-40 टक्के असणाऱ्यांना CET मध्ये 100 पर्सेंटाईल कसे? सचिन सावंतांचा सवाल नीट सारखाचा गडबड घोटाळा MH – CET परिक्षेतही झाल्याचा आरोप काँग्रसेचे नेते सचिन सावंत यांनी केला आहे. नीट परीक्षेच्या पेपर लिक प्रकरणात महाराष्ट्रासह देशभरात सीबीआयकडून कारवाई केली जात आहे. या पार्श्वभूमीवर सचिन सावंत यांनी पत्रकार परिषद घेत आणखी एक गंभीर गौप्यस्फोट केला आहे. सचिन सावंत म्हणाले, देशभरात नीट पेपरफुटीने विद्यार्थी आणि पालकांची चिंता वाढली आहे. आयुष्याचा महत्त्वाच्या टप्प्यावर जर तरुण पिढीला फसवले जात असेल तर ही देशाची सुद्धा फसवणूक आहे. नीट पेपरफुटीची चौकशी सुरू असली तरी अशा प्रकारच्या चौकशीतून पुढे काहीही निष्पन्न होत नाही, हा आजवरचा अनुभव आहे. तसेच नीट सारखाच गडबड घोटाळा MH-CET परीक्षेतही झाला आहे. दहावी बारावीला जेमतेम 35-40 टक्के पडलेल्या विद्यार्थ्यांना MH-CET परीक्षेत 100 पर्सेंटाईल पडलेले आहेत, हा घोटाळा असून त्याची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा करा, अशी मागणी सावंत यांनी केली आहे. सविस्तर वाचा