माझा एपस्टीनशी काहीही संबंध नव्हता- मेलानिया:पीडितांना काँग्रेसमध्ये बोलू द्या
Category: International |
11 Apr 2026
अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पत्नी मेलानिया यांनी जेफ्री एपस्टीन प्रकरणात अमेरिकी संसद काँग्रेसकडे हस्तक्षेपाची मागणी करताना म्हटले आहे की, पीडित महिलांना सार्वजनिकरीत्या शपथेवर साक्ष देण्याची संधी मिळायला हवी, जेणेकरून सत्य समोर येऊ शकेल. त्यांनी सांगितले की अधिकृत रेकॉर्डमध्ये पीडितांच्या विधानांचा समावेश केला जावा. मेलानिया म्हणाल्या की एपस्टीन किंवा त्याची सहकारी गिजलेन मॅक्सवेल यांच्याशी माझा कोणताही संबंध नव्हता आणि त्या कधीही त्याच्या खाजगी विमानाने गेल्या नाहीत. सर्व दावे दुर्भावनापूर्ण आहेत आणि त्यांच्या नावाचा उल्लेख कोणत्याही न्यायालयीन दस्तऐवजात, एफबीआय मुलाखतीत आलेला नाही. मेलानिया म्हणाल्या की मी एपस्टीनची पीडित नाही आणि एपस्टीनने माझी ट्रम्प यांच्याशी भेट करून दिली नव्हती. मी माझ्या पतीला १९९८ मध्ये न्यूयॉर्कमधील एका पार्टीत भेटले होते. एपस्टीनच्या ईमेलमध्ये मेलानियाचा उल्लेख अचानक का आले विधान प्रथम महिला मेलानिया यांचे हे पहिले विधान आहे. अचानक आलेल्या या विधानामुळे संपूर्ण जग थक्क झाले आहे. खरं तर, इराण युद्धापासून हा मुद्दा प्रसारमाध्यमातून पूर्णपणे गायब आहे. तज्ज्ञांच्या मते, ट्रम्प यांनी एपस्टीन मुद्द्यावरून लक्ष हटवण्यासाठी इराण युद्ध छेडले. परंतु, अपेक्षित निकाल न मिळाल्याने लोकप्रियता घटत आहे. युद्धाच्या नुकसानीवरही प्रश्न उपस्थित होत आहेत. आता एपस्टीन प्रकरणावर लक्ष परतवणे ट्रम्प यांच्या टीमला अधिक चांगले वाटते.