पीएम मोदींच्या विरोधातील याचिका दिल्ली हायकोर्टाने फेटाळली

लोकसभा निवडणुकीसाठी देव आणि मंदिरांच्या नावावर भाजपसाठी मते मागितल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अपात्र ठरवण्यासाठी निवडणूक आयोगाला (ECI) निर्देश देण्याची मागणी करणारी याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. (Lok Sabha elections PM Narendra Modi) दिल्ली उच्च न्यायालयाने याचिका फेटाळताना म्हटले की याचिका पूर्णपणे चुकीची आहे आणि न्यायालय कोणत्याही तक्रारीवर विशिष्ट …

Apr 29, 2024 - 15:22
Apr 29, 2024 - 15:24
 0
पीएम मोदींच्या विरोधातील याचिका दिल्ली हायकोर्टाने फेटाळली

लोकसभा निवडणुकीसाठी देव आणि मंदिरांच्या नावावर भाजपसाठी मते मागितल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अपात्र ठरवण्यासाठी निवडणूक आयोगाला (ECI) निर्देश देण्याची मागणी करणारी याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. (Lok Sabha elections PM Narendra Modi)

दिल्ली उच्च न्यायालयाने याचिका फेटाळताना म्हटले की याचिका पूर्णपणे चुकीची आहे आणि न्यायालय कोणत्याही तक्रारीवर विशिष्ट भूमिका घेण्याचे निर्देश निवडणूक आयोगाला देऊ शकत नाही.

पीएम मोदी यांनी उत्तर प्रदेशातील पिलीभीत येथे केलेल्या भाषणात, मतदारांना हिंदू देवता आणि हिंदू मंदिरे तसेच शिखांच्या प्रार्थना स्थळांच्या नावाने भाजपला मतदान करण्याचे आवाहन करून मते मागितली होती, असा दावा याचिकाकर्त्याने केला होता. दरम्यान, निवडणूक आयोगाची बाजू मांडणारे वकील सिद्धांत कुमार यांनी या याचिकेला विरोध केला. अशा अर्जांवर कायद्यानुसार कारवाई होईल. या प्रकरणी निवेदन दाखल केले असून आम्ही त्यावर कार्यवाही करू. निवडणूक आयोग ही घटनात्मक संस्था आहे, असे त्यांनी म्हटले.

निवडणूक आचारसंहितेचे (एमसीसी) उल्लंघन केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवडणूक लढवण्यास अपात्र ठरवण्याची मागणी याचिकेतून करण्यात आली होती. पण ही याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने सोमवारी फेटाळून लावली. आनंद एस. जोंधळे यांनी ही याचिका दाखल केली होती. या याचिकेत पीएम मोदींना सहा वर्षांसाठी निवडणूक लढवण्यास अपात्र ठरवण्याची मागणी करण्यात आली होती.

त्यांनी याचिकेत म्हटले होते की, पीएम मोदींनी ६ एप्रिल रोजी उत्तर प्रदेशातील पिलीभीत येथे निवडणूक प्रचार सभेत भाजपसाठी मते मागताना हिंदू आणि शीख देवतांचा उल्लेख केला होता.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow