सोलापुरातील भाजीपाला विक्रेत्याच्या मुलीचे युपीएससी परीक्षेत घवघवीत यश

सोलापूर वृत्तसेवा : सोलापुरातील भाजीपाला विक्रेत्याच्या मुलीने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत 492 रँक मिळवून यश संपादित केले. स्वाती मोहन राठोड असे या तरुणीचे नाव आहे. पाचव्या प्रयत्नात स्वातीला यश मिळाले आहे. विजापूर रोड आदित्य नगर परिसरातील सिटीजन पार्क येथे राठोड कुटूंबीय राहायला आहेत.

Apr 22, 2024 - 16:54
Apr 22, 2024 - 17:35
 0
सोलापुरातील भाजीपाला विक्रेत्याच्या मुलीचे युपीएससी परीक्षेत घवघवीत यश

सोलापूर वृत्तसेवा : सोलापुरातील भाजीपाला विक्रेत्याच्या मुलीने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत 492 रँक मिळवून यश संपादित केले. स्वाती मोहन राठोड असे या तरुणीचे नाव आहे. पाचव्या प्रयत्नात स्वातीला यश मिळाले आहे. विजापूर रोड आदित्य नगर परिसरातील सिटीजन पार्क येथे राठोड कुटूंबीय राहायला आहेत. स्वातीचे आई-वडील विजापूर रोड परिसरात भाजीपाला विकतात. गरीब परिस्थितीतून पुढे आलेल्या स्वातीने लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळवल्याने राठोड कुटूंबात आनंदाची लाट पसरली आहे.

स्वातीने दहावीपर्यंतचे शिक्षण मुंबईत पुर्ण केले. अकरावी आणि बारावीचे शिक्षण तिने सोलापुरातील भारती विद्यापीठात घेतले. त्यानंतर जुळे सोलापुरातील वसुंधरा महाविद्यालयात बीए तर वालचंद महाविद्यालयात भुगोल विषयात एमए केले आहे. स्वातीने यापूर्वी चार वेळा युपीएससी परीक्षा दिली आहे. पाचव्या प्रयत्नात तिला हे यश मिळाले आहे. मंगळवारी सायंकाळी युपीएससी परीक्षेचा निकाल जाहीर झाला. स्वातीचे वडील मोहन राठोड आणि आई भाजीपाला विक्रेते आहेत. स्वातीला दोन बहिणी आणि एक भाऊ आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow