सोलापूर : भाजपाने शेतकर्‍यांचा संसार उघड्यावर आणला : प्रणिती शिंदे

सोलापूर भाजपकडून चारशे पारच्या घोषणा होत असल्‍या तरी लोकसभा निवडणुकीत भाजपा दिडशेचा आकडाही गाठणार नाही. भाजपकडून सुडाचे राजकारण करुन विरोधकांना संपविण्याचे षडयंत्र सुरू आहे. त्यामुळे लोकशाही धोक्यात आली आहे. भाजपा सरकारने सुडातून सिध्देश्वर कारखाना चिमणी पाडून शेतकर्‍यांचा संसार उघडयावर आणला आहे.

Apr 29, 2024 - 15:15
Apr 29, 2024 - 15:20
 0
सोलापूर : भाजपाने शेतकर्‍यांचा संसार उघड्यावर आणला : प्रणिती शिंदे

सोलापूर: भाजपकडून चारशे पारच्या घोषणा होत असल्‍या तरी लोकसभा निवडणुकीत भाजपा दिडशेचा आकडाही गाठणार नाही. भाजपकडून सुडाचे राजकारण करुन विरोधकांना संपविण्याचे षडयंत्र सुरू आहे. त्यामुळे लोकशाही धोक्यात आली आहे. भाजपा सरकारने सुडातून सिध्देश्वर कारखाना चिमणी पाडून शेतकर्‍यांचा संसार उघडयावर आणला आहे. शेतकरीविरोधी सरकारला अद्दल घडविण्यासाठी काँग्रेसला विजयी करावे, असे आवाहन काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी केले. मंद्रुप येथील प्रचारसभेत त्या बोलत होत्या. यावेळी माजी आमदार दिलीप माने, काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश हसापूरे, बाळासाहेब शेळके, अमर पाटील, अशोक देवकते, विदयुलता कोरे, शिवानंद झळके, हरीष पाटील, रूग्णसेवक बाबा मिस्री, रमेश नवले, महेश जोकारे, मोतिलाल राठोड, अलाउदीन शेख, मोतीराम चव्हाण, राधाकृष्ण पाटील, अमृता चव्हाण, महमद शेख, रेवणसिध्द मेंडगुदले, अनंत म्हेत्रे, वाघेश म्हेत्रे, दत्तात्रय देशमुख आदि उपस्थित होते.

यावेळी शिंदे पुढे म्हणाल्या कि, भाजपाने खोटी आश्वासने देऊन दहा वर्षे सत्ता मिळविली. दहा वर्षात विकास करण्याऐवजी काँग्रेसच्या विकासकामांना स्थगिती देण्याचे काम केली आहे. दोन कोटी रोजगाराची आश्वासन दिले मात्र प्रत्यक्षात दोन युवकांनाही रोजगार मिळालेला नाही. भाजपा खोटी आश्वासन देणारा पक्ष आहे. राज्यात आमदार, खासदार खरेदी विक्री करून पन्नास खोक्यांचा सौदा केला. या पन्नास खोक्यातुन मोठया प्रमाणात विकासकामे झाली असती. या पूर्वीच्या निष्‍क्रीय खासदारांमुळे सत्ताधार्‍यांना उमेदवार बदलण्याची वेळ आली. भाजप धर्मा-धर्मामध्ये तेढ निर्माण करीत आहेत. भाजपने विकासावर बोलावे. मतदारांसाठी महाविकास आघाडीची निर्मिती झाली असून सेवक म्हणून मतदारांचे प्रश्न सोडविण्यास सदैव कटिबध्द आहे. यापूर्वीच्या दोन्ही खासदारांनी सत्तेची मजा घेतल्याने सोलापूरचा विकास खुंटला असल्याचे प्रणिती शिंदे म्हणाल्या.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow