
चीनपेक्षा निम्मा कर:टेरिफ फार्मा-इलेक्ट्राॅनिकमध्ये भारताला 2 लाख काेटींचा लाभ, भारत-अमेरिका 43 लाख कोटींच्या करारातून तोडगा
ट्रम्प यांचा आयात कर भारतासाठी संकटातही संधी ठरू शकतो. भारतावर २७ टक्के, चीनवर ३४ टक्के कर लावला आहे. चीनवर दोन आठवड्यांपासून २० टक्के आयात कर लागू आहे. म्हणजे चीनवर एकूण ५४ टक्के कर आहे. हा भारताच्या दुप्पट आहे. भारताच्या औषधी कंपन्यांना त्यामुळे दिलासा मिळाला आहे. चीनवरील जास्त कराचा लाभ भारताच्या इलेक्ट्रॉनिक क्षेत्राला मिळू शकतो. दोन्ही क्षेत्रांतून अमेरिकेला होणारी भारतीय निर्यातीत सुमारे २४ अब्ज डॉलर्स (२ लाख कोटी रुपये) भागीदारी आहे. ही भारतासाठी सरळ-सरळ लाभाची स्थिती म्हणावी लागेल. हा कर भारतासाठी ‘झटका’ नाही. उलट ‘मिक्सबॅग’ आहे. भारत-अमेरिकेतील सुमारे ५०० अब्ज डॉलर्स (४२.७५ लाख कोटीं रुपये) व्यापार करार आयात करावरील उतारा ठरू शकतो. त्यावर बैठकांच्या दोन फेऱ्या झाल्या. सप्टेंबरपर्यंत ते अंतिम होईल. भारताच्या फार्मासह या उत्पादनांवरअमेरिकेकडून नव्या यादीत कर नाही फार्मास्युटिकल्स *एकूण निर्यात : १२ अब्ज डॉलर यंत्रे : *एकूण निर्यात : ६ अब्ज डॉलर्स ऑर्गेनिक केमिकल *एकूण निर्यात : ३ अब्ज डॉलर इमारतीचे दगड *एकूण निर्यात: १ अब्ज डॉलर. वस्त्रोद्योगातील प्रतिस्पर्धी व्हिएतनाम, बांगलादेशवर जास्त कराने भारताला अनेक संधी मिळणे शक्य वस्त्रोद्योग क्षेत्रात काय स्थिती?
गारमेंट-टेक्स्टाइल क्षेत्रात प्रतिस्पर्धी बांगलादेशवर ३७ टक्के, व्हिएतनामवर ४६ टक्के कर लावला. ३ अब्ज डॉलर निर्यातदार भारतीय वस्त्रोद्योग क्षेत्राला अमेरिकेत नवीन पुरवठा ऑर्डरचा फायदा मिळू शकतो. भारतात गारमेंट पायाभूत व्यवस्था या देशांपेक्षा उत्कृष्ट आहे.
कराचा कोणत्या क्षेत्रास फटका?
दागिने क्षेत्राला आयात कराचा सर्वाधिक फटका बसण्याची शक्यता आहे. सध्या सुट्या हिऱ्यांवर शून्य व अलंकारांवर ७ टक्के कर आहे. तो आता २७ टक्के होईल. अमेरिकेतील गरजेच्या सुमारे ३० टक्के आयात भारतातून होतो. भारतात दरवर्षी सुमारे ११ अब्ज डॉलर्सची निर्यात होते.
भारताला करयुद्धाचा लाभ कसा ?
कराचा दबाव भारताला मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रास बळकट करणे आणि नवीन निर्यात बाजार शोधण्यासाठी प्रेरित करू शकतो. भारताला मेक इन इंडियास प्रोत्साहन देण्याची संधी मिळू शकते. भारताला प्रतिस्पर्धी देशांच्या तुलनेत अमेरिकेकडून कमी कर लावला आहे.
ट्रम्प करावर पुनर्विचार करतील?
ट्रम्प यांनी पहिल्या यादीत भारतासह ६० देशांवर कराची घोषणा केली. परंतु त्यावर चर्चेची दारे नेहमी खुली आहेत, असे त्यांनी स्पष्ट केलेले आहे. हे भारतासाठी सकारात्मक संकेत आहेत. चीनचा सामना करण्यासाठी अमेरिकेला भारताची साथ हवी आहे. व्यापारातील संतुलन ही अमेरिकेची अंतर्गत बाब आहे. सेन्सेक्सवर नव्हे, जागतिक परिणाम ट्रम्प करामुळे सेन्सेक्स केवळ ३२२ अंकांनी कोसळला. निफ्टीत ८२ अंकांची घसरण झाली. त्या तुलनेत ग्लोबल मार्केटमध्ये मोठी घसरण झाली आहे. लंडनच्या एफटीएसई, जर्मनीच्या डाक्स, फ्रान्सच्या सीएसीमध्ये ५ टक्के घसरण झाली. जपानच्या निक्केई व हाँगकाँगच्या हँगसेंगमध्येही ४ टक्के बाजार कोसळला. कॅनडाचा २५% कर, फ्रान्सने गुंतवणूक रोखली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आयात कराच्या घोषणेनंतर व्यापार युद्ध पेटले. कॅनडाने गुरुवारी अमेरिकेच्या कारवर २५ टक्के कर जाहीर केला. फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी अमेरिकेतील सर्व गुंतवणूक रोखली.मॅक्रॉन म्हणाले, ट्रम्प यांना ईयूवरील २० टक्के कर मागे घ्यावा लागेल. ट्रम्प यांनी भारतावर २७ टक्के कर लावला. तो ९ एप्रिलपासून लागू होईल. व्हाइट हाऊसच्या प्रवक्त्यानुसार ५ एप्रिलपासून ८ एप्रिलपर्यंत भारतातील उत्पादनांवर १० टक्के बेसलाइन टेरिफ लावेल. थायलंड-३७% तर जपान-२४% तर सौदी अरेबिया, इजिप्त, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंडवर १०% कराची घोषणा केली आहे. गुरुवारपासूनच अमेरिकेने आयात कार, सुट्या भागांवर २५% करवसुली सुरू केली.