
कृषिमंत्री कोकाटे यांच्या घरासमोर ‘प्रहार’चे मशाल आंदोलन:माणिकराव कोकाटे मिसिंग मंत्री, त्यांच्याबद्दल पोलिसांना माहिती नाही- बच्चू कडू
राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी करत सातबारा कोरा करावा, या मागणीसाठी प्रहार संघटनेच्यावतीने राज्याचे कृषीमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांच्या निवासस्थानासमोर शुक्रवारी रात्री तासभर मशाल आंदोलन करण्यात आले. यावेळी पोलिसांना कृषीमंत्री कुठे हे माहिती नाही, महाराष्ट्रात असे कधी होत नाही, मिसिंग मंत्री झाले आहेत, असा टोला बच्चू कडू यांनी लगावला आहे. बच्चू कडू म्हणाले की, आमचे आंदोलन थांबले असताना पोलिसांकडून चक्का जाम करण्यात येत आहे. हा गुन्हा पोलिसांवर दाखल झाला पाहिजे. आम्ही पुढे जाऊ नये म्हणून पोलिसांनी दोन ट्रक लावत महामार्ग अडवला. निवडणूक काळात महायुतीच्या प्रमुख नेत्यांनी कर्जमाफीचे आश्वासने दिले होते. सत्ता मिळाल्यानंतर संबंधितांना त्याचा विसर पडला. विविध कारणांनी अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्याला कर्जमाफीची आवश्यकता असल्याकडे लक्ष वेधण्यात आले. कोकाटेंनी 17 तारखेला बैठक बोलावली बच्चू कडू म्हणाले की, माणिकराव कोकाटे यांनी आम्हाला बोलावले होते पण आम्ही त्यांची भेट घेऊ नये असे पोलिसांचे म्हणणे आहे. आम्ही निवडव कार्यकर्ते घेऊन कोकाटे यांना भेटायला जात असताना पोलिसांनी आम्हाला अडवण्याची भूमिका का घेतली माहिती नाही. कृषीमंत्री म्हणाले की17 तारखेला एक वाजता बैठक घेतो, आणि बैठक झाल्यावर भूमिका स्पष्ट झाली नाही, खास करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर बोलले पाहिजे. कारण कर्जमाफीची घोषणा ही त्यांची होती. सरकारला सोडणार नाही
बच्चू कडू म्हणाले की, कृषीमंत्र्यांनी जर आमचे बाजू सरकारकडे मांडली नाही तर आम्हाला त्यांच्याकडे पुन्हा यावे लागेल. पोलिसवालेसांगत आहे की मंत्री कोकाटे हे नाशिकमध्ये आहे, तर माणिकराव स्वत: सांगतात की मी सिन्नरमध्ये आहे. पोलिसांना मंत्री कुठे आहेत याची माहिती नाही. महाराष्ट्रात असे कधी होत नाही, मिसिंग मंत्री झाले आहेत. आम्ही सरकारला कर्जमाफी झाल्याशिवाय सोडणार नाही, ही तर केवळ आंदोलनाची सुरवात आहे.