
भारतीय हवाई दलाची शक्ती वाढवण्यासाठी राफेलचे अस्त्र:भारत-फ्रान्स 1.25 लाख कोटींत 114 राफेल विमान करार शक्य, फ्रेंच संरक्षणमंत्री भारतात येणार
भारतीय हवाई दलाच्या घटत्या स्क्वाड्रनची संख्या वाढवण्यासाठी भारत पुन्हा एकदा ४.५व्या पिढीच्या राफेल लढाऊ विमानावर भर देऊ शकतो. या महिन्याच्या अखेरीस भारत दौऱ्यावर येणाऱ्या फ्रान्सच्या संरक्षण मंत्री सेबेस्टियन लेकॉर्नू यांच्याशी या विषयावर चर्चा होऊन भारत-फ्रान्समध्ये करार होऊ शकतो. लेकॉर्नू यांच्या भेटीत २६ राफेल मरीन फायटरच्या डीलवर स्वाक्षरी होण्याबरोबरच मल्टी रोल फाइटर एअरक्राफ्ट (एमआरएफए) अंतर्गत नवीन करारावर चर्चा होईल. भारत १.२५ लाख कोटी रुपयांच्या खर्चाने ११४ विमान खरेदी करण्याच्या तयारीत आहे. सध्या हवाई दलाकडे ४२.५ स्क्वाड्रनच्या तुलनेत ३० फाइटर जेट स्क्वाड्रन आहेत. यात सुखोई आणि राफेल वगळता बाकीचे३-४ दशक जुनी आहेत. हवाई ताकद वाढवण्यासाठी एमआरएफए प्रोजेक्टअंतर्गत राफेलची गव्हर्नमेंट टू गव्हर्नमेंट थेट डील शक्य आहे. एमआरएफए अंतर्गत फाइटर जेट खरेदीच्या शर्यतीत चार विमान आहेत. मात्र, सध्या भारत थेट दासॉल्ट एव्हिएशनचा राफेल खरेदी करू शकतो. राफेल... अणुहल्ला, जहाजविरोधी हल्ल्यास सक्षम क्रू: २ पायलट रेंज: ३७०० किमी
स्पीड: ताशी २२०० किमीपेक्षा जास्त.
भारतासाठी खास वैशिष्ट्ये : पायलटच्या हेल्मेटवर डिस्प्ले, रडार वॉर्निंग रिसिव्हर, लो बँड जॅमर, १० तासांपर्यंत फ्लाइट डेटा रिकॉर्डिंग, इन्फ्रा रेड सर्च, शत्रूचे विमान शोधण्याची सिस्टिम. ग्राउंड सपोर्ट, इन डेप्थ स्ट्राइक, अँटी शिप स्ट्राइक, अणहल्ल्याच्या क्षमतेने युक्त
१० टन वजनी राफेल ९ टन शस्त्र नेण्यास सक्षम : १४ हार्ड पॉइंट्स, ५ ड्रॉप टँक एक्ट्रा फ्यूलसाठी. करार झाल्यास भारतात राफेलची प्रॉडक्शन लाइनही स्थापणार भारत सरकार आणि फ्रान्स यांच्यात करार झाल्यास त्याचे उत्पादन स्थानिक पातळीवर सुरू होईल. दासॉल्ट एव्हिएशनने यापूर्वीच म्हटले आहे की भारतात एक प्लँट तयार करण्यासाठी १०० विमानांच्या ऑर्डरची आवश्यकता आहे. यासाठी, दासॉल्ट डिफेन्स सेक्टरच्या भारतीय कंपनीबरोबर संयुक्त भागीदारी असेंब्ली लाइन तयार करेल. यामध्ये नौदलासाठी खरेदी केल्या जाणाऱ्या राफेल २६ मरीन आणि ३६ राफेलसाठी मेंटेनन्स सुविधाही तयार होईल.टू गव्हर्नमेंट थेट डील शक्य आहे. एमआरएफए अंतर्गत फाइटर जेट खरेदीच्या शर्यतीत चार विमान आहेत. मात्र, सध्या भारत थेट दासॉल्ट एव्हिएशनचा राफेल खरेदी करू शकतो.