
राष्ट्रीय परिषदेच्या सदस्यांवरही एकमत बनवण्याचा प्रयत्न:सहमतीस विलंब, भाजप राष्ट्रीय अध्यक्षपद निवडणूक लांबणीवर
राजकीय कॉरिडॉरमध्ये आणि विशेषत: भाजपमध्ये एक प्रश्न विचारला जात आहे की पक्षाचा नवीन राष्ट्रीय अध्यक्ष कोण असेल आणि तो आपल्याला केव्हा मिळेल…. यावर पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचे उत्तर असते योग्य वेळी. योग्य वेळ कधी? उत्तर असते आम सहमती झाल्यावर. राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून जेपी नड्डांची मुदत जून २०२४ रोजी संपली आहे. त्यांना सध्या मुदतवाढ आहे. नवीन अध्यक्ष निवडण्यासाठी राष्ट्रीय सदस्यता मोहीम पूर्ण झाली आहे. १० राज्यांच्या निवडणुका संघटनात्मक दृष्टिकोनातून घेण्यात आल्या आहेत, २६ अद्याप बाकी आहेत. ही परंपरा अशी आहे की १८ राज्यांच्या निवडणुका पूर्ण झाल्यानंतर राष्ट्रीय अध्यक्षाची निवडणूक घेण्यात येते.. तथापि, ते बंधनकारक नाही. भाजपाच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले की, “जर पक्षाच्या घटनेच्या कलम १९ अंतर्गत राष्ट्रीय परिषद ५ राज्यांमध्ये निवडली गेली असेल तर निवडणूक समिती कोणतेही २० सदस्य संयुक्तपणे राष्ट्रीय अध्यक्षाचे नाव प्रस्तावित करू शकतात.” विरोधी नॅरेटिव्हवर उपाय शोधतेय भाजप भाजपच्या नेत्याने सांगितले की, २०२९ ची लोकसभा निवडणूक नव्या अध्यक्षाच्या नेतृत्वात लढली जाईल. अशा परिस्थितीत, संघटनेत एका वर्गाचे एेकले जात नाही किंवा निर्णय बळजबरीने थोपवला जातो,हा संदेश जाऊ नये हे महत्त्वाचे आहे. गेल्या १० वर्षांत विरोधक सतत नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करत आहेत. नव्या टीममध्ये महिलांना ३३% जागा शक्य भाजपाच्या वरिष्ठ नेत्याने सांगितले की, “नवीन अध्यक्षांच्या घोषणेनंतर राष्ट्रीय परिषद आणि कार्यकारीत महिलांना ३३% पर्यंत जागा देण्याची योजना आहे. संसदीय मंडळ आणि केंद्रीय निवडणूक समितीत महिलांचे प्रतिनिधित्व वाढेल. पक्षाच्या विविध संघटनांमध्ये महिलांचा सहभागही वाढेल. विचारसरणीला समर्पित तरुणांना संधी मिळावी, अशी संघाची इच्छा तामिळनाडू : नयनार होणार अध्यक्ष, एआयएडीएमके पुन्हा एनडीएमध्ये आतापर्यंत १० राज्यांत निवडले अध्यक्ष, २६ राज्यांत बाकी