
हिंदुत्वाच्या नव्या मुल्लांकडून वातावरण खराब:संजय राऊत यांची टीका; धार्मिक मिरुवणुकीत बेरोजगारांच्या हातात शस्त्र देण्याचा आरोप
बेरोजगार तरुणांच्या हाती हत्यार देत रामनवमी आणि हनुमान जयंतीच्या मिरवणुकीत पाठवले जात आहे, हा कसला धर्म आहे. आपला उत्सव आहे तो आपल्या मंदिरासमोर साजरा केला पाहिजे, चर्च, मशिदीसमोर जात वातावरण खराब करण्याचे काही कारण नाही, असे कोणत्याचे देवाने सांगितले नाही, असे ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी म्हटले आहे. संजय राऊत पुढे बोलताना म्हणाले की, हे जे नवे नवे हिंदुत्वाचे मुल्ला तयार झाले आहेत, त्यांनी वातावरण बिघडवण्याचे काम सुरू केले आहे. हनुमान जयंती, रामनवमी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. पण मुंबईत ज्या मिरवणुकी निघाल्या त्या विकृती होत्या असे राऊतांनी म्हटले आहे. येणाऱ्या पिढ्या आम्हाला कशा प्रकारे लक्षात ठेवतील. हे हिंदू धर्मासाठी चांगले नाही संजय राऊत म्हणाले की, "राम नवमी असो किंवा हनुमान जयंती, या आपल्या परंपरा आहेत. वर्षानुवर्षे आपण राम नवमी साजरी करत आहोत, हनुमान जयंती साजरी करत आहोत. हे सण आपल्या श्रद्धेचा भाग आहेत, आपल्या आत्म्याचा भाग आहेत. पण आता काही लोक ज्या पद्धतीने हे सण साजरे करण्याचा प्रयत्न करत आहेत - ते प्रत्यक्षात गोष्टींमध्ये व्यत्यय आणत आहे. हे आपल्या सनातन धर्मासाठी, हिंदू धर्मासाठी चांगले नसल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. दाऊद इब्राहिम, टायगर मेमन, ललित मोदी आणि मेहुल चोक्सीच्या प्रत्यार्पणाची प्रतीक्षा तहव्वुर राणाचे प्रत्यार्पण केले आहे, परंतु त्यांनी (डेव्हिड) हेडलीचे देखील प्रत्यार्पण केले पाहिजे. हे भाजपचे यश नाही आणि गेल्या 16 वर्षांपासून त्याच्या प्रत्यार्पणाची प्रक्रिया सुरू होती. मनमोहन सिंग आणि मोदी सरकारच्या प्रयत्नांमुळेच त्याला अमेरिकेतून प्रत्यार्पण करण्यात आले आहे. आम्हाला अजूनही दाऊद इब्राहिम, टायगर मेमन, ललित मोदी आणि मेहुल चोक्सी यांचे प्रत्यार्पण करण्याची प्रतीक्षा आहे.