
दिव्य मराठी अपडेट्स:नाशिकच्या मालेगावात ईडीची एकाच वेळी 9 ठिकाणी छापेमारी, दिवसभरातील घडामोडी एका क्लिकवर
महाराष्ट्रातील सर्व ताज्या घडामोडी वाचा एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह राज्यातील महत्त्वाची शहरे आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे अपडेट्स... ठाकरे, पवार एकत्र येण्याची सध्या परिस्थिती नाही- फडणवीस राज्यात शरद पवार व अजित पवार यांच्या भेटीगाठी वाढल्यात. त्यातच राज ठाकरे व उद्धव ठाकरे यांच्या संभाव्य युतीची चर्चाही महाराष्ट्राच्या राजकारणात चांगलीच रंगली आहे. या प्रकरणी राजकीय वर्तुळात वेगवेगळे दावे-प्रतिदावे केले जात असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र ठाकरे व पवार एकत्र येण्याची सध्या कोणतीही परिस्थिती नसल्याचा दावा केला आहे. सविस्तर वाचा उद्धव ठाकरेंच्या पक्षाच्या वतीने संभाजीनगरात 'ढोल बजाव आंदोलन' शहरातील जय विश्वभारती कॉलनी पाण्याची टाकीजवळ शिवसेना - उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने २५ एप्रिल रोजी ढोल बजाव आंदोलन करण्यात आले. "लबाडांनो पाणी द्या" जनतेची एकच हाक..लबाडांनो पाणी द्या.. अशा पद्धतीने जोरदार घोषणाबाजी करत शिवसैनिकांनी परिसर दणाणून सोडला. सविस्तर वाचा नाशिकच्या मालेगावात ईडीची मोठी कारवाई नाशिकमधील मालेगावात ईडीने मोठी कारवाई केली आहे. अंमलबजावणी संचालनालय म्हणजे ईडीने मालेगावात एकाच वेळी 9 वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकले आहे. अवैध बांगलादेशी प्रकरणी ही कारवाई केली आहे. बीडमध्ये दोन गटात दगडफेक, झेंडा लावण्याच्या कारणामुळे वाद बीड जिल्ह्यातील आष्टी या गावात दोन गट आपसात भिडल्या मुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या दरम्यान गावातील सुमारे 200 ते 300 तरुणांनी रस्त्यावर एकमेकांच्या दिशेने जोरदार दगडफेक केली. तर काहींनी हातात लाकडी दांडे आणि शस्त्र घेऊन दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. या सर्व घटनांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या दगडफेकीत काहीजण जखमी झाले असल्याची माहिती देखील मिळत आहे. सविस्तर वाचा
मुंबईत बिल्डराची आत्महत्या नवी मुंबईतील बांधकाम व्यावसायिक तथा मोस्ट वाँटेड ड्रग सिंडिकेटचे प्रमुख नवीन चिचकरचे वडील गुरू चिचकर यांनी आज आपल्या राहत्या घरी आत्महत्या केली. त्यांनी स्वतःच्या डोक्यात गोळी घालून स्वतःची जीवनयात्रा संपवली. सविस्तर वाचा महाराष्ट्रात ओलाचे 121 शोरूम बंद होणार महाराष्ट्रातील इलेक्ट्रिक दुचाकी उत्पादक कंपनी ओलाचे 121 स्टोअर्स बंद होणार आहेत. महाराष्ट्राच्या वाहतूक विभागाने स्थानिक आरटीओला ते बंद करण्याचे निर्देश दिले आहेत. वाहतूक विभागाने 146 ओला स्टोअर्सची तपासणी केली होती, त्यापैकी 121 शोरूम ट्रेड सर्टिफिकेटशिवाय सुरू असून, ती तत्काळ बंद करण्याच्या सूचना आरटीओने केल्या आहेत. सविस्तर वाचा सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना अटक ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना 2000 सालच्या एका मानहानीच्या प्रकरणात दिल्ली पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. त्यांच्यावर दिल्लीचे विद्यमान नायब राज्यपाल व्ही के सक्सेना यांचा अवमान केल्याचा आरोप आहे. सविस्तर वाचा शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकरांसह मुलाला धमकी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर आणि त्यांचे पुत्र अभिमन्यू खोतकर यांना सोशल मीडिया वरून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या संदर्भात अभिमन्यू खोतकर यांनी केलेल्या तक्रारीवरून जालना तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे. सविस्तर वाचा नाशिकच्या सिटी सेंटर मॉल चौकातील सिग्नलवर रिक्षा-बसचा अपघात नाशिकच्या सिटी सेंटर मॉल चौकात सिग्नलवर रिक्षा आणि बसचा अपघात भीषण अपघात झाला आहे. हा सर्व अपघाताचा थरार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला. रिक्षातील 2 जण जखमी झाल्याची माहिती आहे. सिग्नल बंद असल्याने अपघात घडला असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. बुलढाणा: मुलाला चांगले गुण देऊ म्हणत विद्यार्थ्याच्या आईवर अत्याचार बुलढाण्यातील मलकापूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. विद्यार्थ्याच्या आईवर दोन शिक्षकांनी वारंवार अत्याचार केल्याचे समोर आले आहे. मुलाला चांगले गुण देण्याचे आमिष दाखवत हे कृत्य करणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. सविस्तर वाचा कुणाल कामराला हायकोर्टाचा मोठा दिलासा मुंबई उच्च न्यायालयाने स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराला मोठा दिलासा आहे. न्यायालयाने कुणाल कामराने त्याच्यावरील गुन्हा रद्द करण्यासंबंधी दाखल केलेली याचिका सुनावणीसाठी दाखल करून घेतली आहे. तसेच ही याचिका प्रलंबित असेपर्यंत त्याला अटक न करण्याचेही आदेश दिलेत. कोर्टाच्या या आदेशामुळे कुणाल कामराला अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मुद्यावर मोठा दिलासा मिळाला आहे. सविस्तर वाचा दहशतवाद्यांनी धर्म विचारल्याच्या वृत्ताची पुष्टी नाही- देशमुख राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अनिल देशमुख यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर एक विधान केले आहे. ते म्हणाले की, 'पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील दहशतवाद्यांनी बळींना गोळ्या घालण्यापूर्वी त्यांचा धर्म विचारला होता की नाही याची कोणतीही ठोस माहिती नाही.' ते म्हणाले की, हे सत्य केवळ तपासातूनच उघड होऊ शकते. ही एक अतिशय दुर्दैवी घटना आहे. दहशतवाद्यांनी केलेल्या नरसंहाराविरुद्ध सरकार कठोर कारवाई करत आहे. सिंधू करार रद्द करण्यात आला आहे. सरकारने खूप चांगले पाऊल उचलले आहे. सविस्तर वाचा पहलगाम हल्ल्यापूर्वीच अतिरेक्यांशी वाद? काही दिवसांपूर्वी जम्मू काश्मीरमध्ये फिरायला गेलो होतो तेव्हा खेचर चालकाने तुम्ही कुराण वाचता का? कोणत्या धर्माला जास्त मानतात असे आम्हाला विचारले. पोलिसांनी जे रेखाचित्र जारी केले ते आणि आमचा वाद झालेल्या खेचर चालकामध्ये साम्य असल्याचा दावा मॉडेल एकता तिवारीहिने केला आहे. एकता तिवारी पुढे बोलताना म्हणाल्या की, 13 एप्रिलला काश्मीरमध्ये आमचा ग्रुप फिरायला गेला होता. आम्ही काश्मीरमध्ये वेगवेगळ्या भागात फिरत होतो. 20 एप्रिलला आम्ही पहलगामला पोहोचलो. माझ्या भावाच्या गळ्यात असलेली रुद्राक्षाची माळ पाहून त्याने वाद घातला. सविस्तर वाचा शरद पवारांच्या पक्षांमध्ये पुन्हा भाकरी फिरणार का? राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षांमध्ये पुन्हा एकदा भाकरी फिरणार का? अशी शक्यता वर्तवली जात आहे. पक्षाच्या वतीने सर्व प्रवक्ता या पदावरील नियुक्त्या रद्द करण्यात आल्या आहेत. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी या संदर्भातले आदेश दिले आहेत. मात्र, अचानकपणे सर्व प्रवक्त्याच्या नियुक्त्या रद्द करण्यात आल्यामुळे याविषयी अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. सविस्तर वाचा सर्व पक्षीय बैठकीला ठाकरे गटाची दांडी का?- सावंत जम्मू-काश्मीरमधील पहलगाम मध्ये झालेला दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकारच्या वतीने नवी दिल्ली येथे देशातील सर्व पक्षीय बैठक आयोजन करण्यात आली होती. या बैठकीला विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांच्या सह देशभरातील सर्व पक्षाचे प्रमुख नेते उपस्थित होते. मात्र, उद्धव ठाकरे गटाचा एकही नेता या बैठकीला उपस्थित राहिला नाही. यामुळे अनेक तर्क वितर्क लावले जात होते. मात्र या बैठकीला का उपस्थित राहिलो नाही? याबाबत उद्धव ठाकरे गटाचे नेते खासदार अरविंद सावंत यांनी स्पष्टीकरण दिले आहे. सविस्तर वाचा आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकरांकडून अजित पवारांच्या कामाचे कौतुक उपमुख्यमंत्री अजित पवार हे त्यांच्या वक्तशीरपणा आणि सकाळीच कामाला सुरुवात करण्याच्या सवयीमुळे ओळखले जातात. त्याचप्रमाणे अजित पवार यांनी आज आरोग्य विभागाच्या कार्यक्रमाला सकाळी आठ वाजताच हजेरी लावली. यावर अजित पवार हे आमच्या परीक्षा घेतात आणि आमची अडचण होते, असे म्हणत आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दादांच्या कामाचे कौतुक केले आहे.सविस्तर वाचा सेन्सेक्स 300 अंकांनी वाढून 80,100 वर आठवड्याचा शेवटचा ट्रेडिंग दिवस, शेअर बाजार आज तेजीत आहे. सेन्सेक्स सुमारे ३०० अंकांनी वाढून ८०,१०० च्या पातळीवर व्यवहार करत आहे. निफ्टी देखील १०० अंकांनी वर आहे, तो २४,३५० च्या पातळीवर व्यवहार करत आहे. सेन्सेक्सच्या ३० पैकी १८ शेअर्समध्ये वाढ झाली आहे. टीसीएस, इन्फोसिस आणि एचसीएल टेकचे शेअर्स १% ने वाढले. अॅक्सिस बँकेचे शेअर्स ३% घसरले. नेस्ले इंडियाचा शेअरही १.३% घसरला. सविस्तर वाचा