News Image

तणाव:अमेरिका-इराणमधील युद्धबंदी, पण वैयक्तिक हल्ले तीव्र, खामेनींना मृत्यूपासून वाचवले


इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव पुन्हा एकदा एका नवीन शिखरावर पोहोचला. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानामुळे राजकीय वादळ निर्माण झाले आहे. मी इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांना ‘अत्यंत वाईट आणि अपमानास्पद मृत्यू’पासून वाचवल्याचे विधान ट्रम्प यांनी केले. त्यावर इराणने तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. अमेरिकेला ‘आपला सूर दुरुस्त’ करण्याचा इशारा देत म्हटले की अमेरिकेला इराणशी अणुकरार हवा असल्यास सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा आदर करावा लागेल. अमेरिकेला आपला सूर बदलावा लागेल.वास्तविक अमेरिकेने इराण आणि इस्रायलमधील सुरू असलेल्या युद्धात हस्तक्षेप केला आणि इराणच्या तीन अणु तळांवर बॉम्बहल्ला केला. युद्धबंदीनंतर खामेनींनी अध्यक्ष ट्रम्पवर टीका केली होती आणि म्हटले होते की इराणचा विजय हा अमेरिकेच्या ‘चेहऱ्यावर थापड’ आहे. दुसरीकडे, ट्रम्प यांनी खामेनी यांचे विधान ‘खोटे आणि चिथावणीखोर’ म्हटले होते. १२ दिवसांचे युद्ध... अमेरिकेचे थाड क्षेपणास्त्र प्रणालीवर ६,८०० कोटी खर्च इराण आणि इस्रायलमधील १२ दिवसांच्या युद्धादरम्यान अमेरिकेने त्यांच्या प्रगत क्षेपणास्त्रविरोधी संरक्षण प्रणाली थाड (टर्मिनल हाय अल्टिट्यूड एरिया डिफेन्स) द्वारे इस्रायलला इराणी क्षेपणास्त्र हल्ल्यांपासून संरक्षण करण्यात मोठी भूमिका बजावली. अहवालांनुसार या काळात अमेरिकेने सुमारे १५ ते २० टक्के साठा वापरून टाकला. ६०-८० क्षेपणास्त्र इंटरसेप्टर तैनात करण्यात आले. प्रत्येक थाड इंटरसेप्टरची किंमत सुमारे १००-१२५ कोटी रुपये आहे. म्हणून, अमेरिकेने या इंटरसेप्टरवर सुमारे ६,८०० कोटी रुपये खर्च केले. हे इराणने डागलेल्या क्षेपणास्त्रांच्या किमतीपेक्षा खूपच जास्त आहे. संरक्षण आणि हल्ल्याच्या खर्चात तफावत अधोरेखित करते. इराणने इस्रायलवर गदर, इमाद, खेबर शेकान आणि फताह-१ सारख्या धोकादायक क्षेपणास्त्रांचा वर्षाव केला होता, त्यात काहींचा वेग मॅक १५ पर्यंत (ध्वनीच्या वेगापेक्षा १५ पट) होता. इराणी परराष्ट्रमंत्री अराघची म्हणाले : धमक्या, अपमान हलक्यात घेत नाही अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या विधानावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करताना इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची म्हणाले की ट्रम्प करारात रस घेत असल्यास त्यांना ‘अपमानजनक आणि अस्वीकार्य वृत्ती’ सोडून द्यावी. महान आणि शक्तिशाली इराणी धमक्या आणि अपमान हलक्यात घेत नाहीत. ट्रम्प यांचा दावा : खामेनी कुठे होते ठाऊक; वाचवले, आभार मानले नाहीत ट्रम्प यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्रुथ सोशलवर म्हटले आहे- ‘मी खामेनींना अतिशय भयंकर आणि अपमानास्पद मृत्यूपासून वाचवले. ते कुठे लपले आहेत हे मला नेमके माहित होते आणि मी अमेरिका किंवा इस्रायलला त्यांचे जीवन संपवण्यापासून रोखले. तरीही माझे आभारही मानले नाहीत. इस्रायलने ‘डॅडी’कडे धाव घेतली अंतिम हल्ल्यापूर्वी विमानांना बोलावले १२ दिवसांच्या युद्धात मारल्या गेलेल्या ६० कमांडर, संशोधकांना निरोप देण्यासाठी इराणमध्ये जनसागर हे छायाचित्र इराणची राजधानी तेहरानचे आहे. जिथे शनिवारी इराण आणि इस्रायलमधील १२ दिवसांच्या युद्धात मृत्युमुखी पडलेल्या सुमारे ६० प्रमुख लष्करी कमांडर आणि अणुशास्त्रज्ञांसाठी शासकीय अंत्यसंस्कार करण्यात आले. या कार्यक्रमाला हजारो शोकाकुल नागरिक उपस्थित होते. युद्धादरम्यान एकूण ६०० हून अधिक इराणी मारले गेले. त्यात ९० लष्करी कर्मचारी होते. अंत्यसंस्कारात सहभागी झालेल्या ६० पैकी किमान ११ जण प्रख्यात अणुशास्त्रज्ञ आणि अनेक उच्चपदस्थ लष्करी अधिकारी होते. तेहरानच्या दोन प्रमुख चौकांमध्ये अंत्ययात्रा काढण्यात आली. ट्रकवर शवपेट्या ठेवण्यात आल्या होत्या. अनेक शवपेट्यांवर फुलांचा वर्षाव करण्यात आला.