'T 39' Tiger Dies Of Electric Shock In Navegaon, Seven Arrested; Accident Due To Illegal Electric Current? The Reason Will Be Clear After Forensic Examination नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाच्या नागझिरा कोअर क्षेत्रात 4 वर्षांच्या नर वाघाचा (टी-39) संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना बुधवारी उघडकीस आली. थाडेझरी बीटमधील बोडुंदा गावाजवळ शेतालगतच्या जंगलात या वाघाचा मृतदेह आढळला. विजेचा धक्का लागल्याने हा मृत्यू झाल्याचा अंदाज वन विभागाने व्यक्त केला असून, या प्रकरणी तातडीने कारवाई करत 7 संशयितांना अटक करण्यात आली आहे. हा मृत्यू शिकारीच्या हेतूने केलेल्या कटातून झाला की, पीक संरक्षणासाठी शेतात सोडलेल्या बेकायदेशीर विजेच्या प्रवाहामुळे, याचा तपास सुरू आहे.
अटक केलेल्या सात संशयितांची कसून चौकशी सुरू वाघाचे शवविच्छेदन पूर्ण झाले असून, व्हिसेरा व इतर नमुने फॉरेन्सिक तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. अहवाल प्राप्त झाल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल. दरम्यान, अटक करण्यात आलेल्या सात संशयितांची कसून चौकशी सुरू असून, विजेची यंत्रणा कोणी व कोणत्या उद्देशाने उभारली होती, याचा शोध घेतला जात आहे. फॉरेन्सिक अहवालाची प्रतीक्षा वन विभागाने केलेल्या प्राथमिक पाहणीत वाघाच्या शरीरावर आणि घटनास्थळालगतच्या शेतामध्ये विजेच्या प्रवाहामुळे भाजल्याचे स्पष्ट पुरावे आढळले आहेत. ‘टी-39’ हा वाघ पूर्वीच्या नोंदींनुसार कोका परिसरातील मादी वाघिणीच्या लिटरमधील असण्याची शक्यता आहे.