Natepute Express
सर्व बातम्या
महाराष्ट्रNatepute Pratinidhi

मुंबई-कोकणात उन्हाचा तडाखा:विदर्भात थंडीची चाहूल, पुढील 48 तासांत कसे असेल राज्यातील हवामान?

नोव्हेंबरचा दुसरा आठवडा संपत आला असतानाही राज्यात हवामानाचे संमिश्र चित्र पाहायला मिळत आहे. मुंबई आणि कोकण किनारपट्टीवर उन्हाचा तडाखा कायम असून दिवसा तापमानाचा पारा चढलेलाच आहे. रात्रीच्या तापमानातही अपेक्षित घट न झाल्याने मुंबईकरांना उकाड्याचा सामना करावा लागत आहे. दुसरीकडे, विदर्भातील काही भागांत किमान तापमान घसरू लागल्याने थंडीची चाहूल जाणवू लागली आहे. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, 12 नोव्हेंबर रोजी राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता नसून हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आहे. मुंबईत तापमानाचा पारा 36 अंशांवर मुंबईत नोव्हेंबर महिन्यातही उष्णतेचा प्रभाव कायम आहे. कुलाबा वेधशाळेत 11 नोव्हेंबर रोजी कमाल तापमान 35.4 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले. हे तापमान सरासरीपेक्षा 1.4 अंशांनी अधिक होते. किमान तापमानही 25.5 अंश सेल्सिअस नोंदवले गेले असून ते सरासरीपेक्षा 1.4 अंशांनी जास्त आहे. त्यामुळे दिवसा उन्हाचा चटका आणि रात्री उकाडा, अशी परिस्थिती मुंबईत कायम आहे. सांताक्रूझ वेधशाळेत कमाल तापमान 36.1 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले. हवामान विभागाच्या अहवालानुसार, बुधवारी नोंदवलेले हे स

मुंबई-कोकणात उन्हाचा तडाखा:विदर्भात थंडीची चाहूल, पुढील 48 तासांत कसे असेल राज्यातील हवामान?

नोव्हेंबरचा दुसरा आठवडा संपत आला असतानाही राज्यात हवामानाचे संमिश्र चित्र पाहायला मिळत आहे. मुंबई आणि कोकण किनारपट्टीवर उन्हाचा तडाखा कायम असून दिवसा तापमानाचा पारा चढलेलाच आहे. रात्रीच्या तापमानातही अपेक्षित घट न झाल्याने मुंबईकरांना उकाड्याचा सामना करावा लागत आहे. दुसरीकडे, विदर्भातील काही भागांत किमान तापमान घसरू लागल्याने थंडीची चाहूल जाणवू लागली आहे. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, १२ नोव्हेंबर रोजी राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता नसून हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आहे. मुंबईत तापमानाचा पारा ३६ अंशांवर मुंबईत नोव्हेंबर महिन्यातही उष्णतेचा प्रभाव कायम आहे. कुलाबा वेधशाळेत ११ नोव्हेंबर रोजी कमाल तापमान ३५.४ अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले. हे तापमान सरासरीपेक्षा १.४ अंशांनी अधिक होते. किमान तापमानही २५.५ अंश सेल्सिअस नोंदवले गेले असून ते सरासरीपेक्षा १.४ अंशांनी जास्त आहे. त्यामुळे दिवसा उन्हाचा चटका आणि रात्री उकाडा, अशी परिस्थिती मुंबईत कायम आहे. सांताक्रूझ वेधशाळेत कमाल तापमान ३६.१ अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले. हवामान विभागाच्या अहवालानुसार, बुधवारी नोंदवलेले हे सर्वाधिक तापमान होते. विशेष म्हणजे, या दिवशी मुंबईत पावसाची नोंद झाली नाही. नोव्हेंबर महिना सुरू असतानाही मुंबई आणि कोकणातील उष्णता कमी झालेली नसल्याचे या आकडेवारीवरून दिसते. मुंबईत सकाळी धुरकट वातावरणाची शक्यता मुंबईसाठीच्या स्थानिक हवामान अंदाजानुसार, पुढील २४ तास सकाळच्या वेळी धुरकट वातावरण राहू शकते. त्यानंतर दुपारपासून संध्याकाळपर्यंत आकाश मुख्यतः निरभ्र राहण्याचा अंदाज आहे. या काळात कमाल तापमान ३५ अंश, तर किमान तापमान २१ अंश सेल्सिअसच्या आसपास राहू शकते. पुढील ४८ तासांतही मुंबईचे आकाश प्रामुख्याने निरभ्र राहण्याची शक्यता आहे. कमाल तापमान ३६ अंश, तर किमान तापमान २० अंश सेल्सिअसपर्यंत राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे सकाळी धुरकट वातावरण असले, तरी दुपारच्या वेळी उन्हाचा चटका जाणवू शकतो. कोकणातील सर्व जिल्ह्यांत पावसाची शक्यता नाही हवामान विभागाच्या १२ नोव्हेंबरच्या जिल्हानिहाय अंदाजानुसार, कोकण विभागातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता नाही. या सर्व भागांत हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे कोकणवासीयांना पावसापासून दिलासा मिळणार असला, तरी किनारपट्टीवरील उष्णतेचा प्रभाव कायम राहण्याची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्रातही कोरडे हवामान उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक आणि नाशिक घाट परिसरातही पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली नाही. अहिल्यानगर जिल्ह्यातदेखील हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आहे. ११ ते १५ नोव्हेंबर या पाच दिवसांच्या कालावधीसाठीच्या अंदाजातही या जिल्ह्यांमध्ये कोरडे हवामान कायम राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. विदर्भात थंडीचा प्रभाव वाढण्याची चिन्हे राज्याच्या पश्चिम भागात उन्हाचा चटका जाणवत असताना विदर्भातील काही भागांत रात्रीच्या तापमानात घट होत आहे. त्यामुळे पहाटे आणि रात्रीच्या वेळी थंडीचा अनुभव वाढू लागला आहे. राज्यातील वेगवेगळ्या भागांमध्ये तापमानातील हा विरोधाभास पुढील काही दिवसही कायम राहण्याची शक्यता आहे. ------------- हेही वाचा.. इडा-पिडा जाऊ दे, भाऊ माझा मंत्री होऊ दे: परळीच्या मंचावरून सुषमा अंधारेंच्या धनंजय मुंडेंना शुभेच्छा, राजकीय वर्तुळात चर्चा रंगली

राजकारणात एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करणारे नेते जेव्हा एकाच मंचावर येतात, तेव्हा काहीतरी वेगळेच राजकीय रंग पाहायला मिळतात. असाच एक प्रसंग परळीत पाहायला मिळाला. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) नेते आणि आमदार धनंजय मुंडे एकाच मंचावर आले होते. यावेळी बोलताना सुषमा अंधारे यांनी धनंजय मुंडे यांना थेट मंत्रीपदाच्या आणि 'भावाचं राज्य येऊ दे' अशा अनोख्या शुभेच्छा दिल्या, ज्यामुळे राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे. सविस्तर वाचा

Source: Maharashtra

ही बातमी उपयोगी वाटली?मित्र आणि कुटुंबासोबत WhatsAppवर share करा.
WhatsAppवर Share करा