Natepute Express
सर्व बातम्या
महाराष्ट्रNatepute Pratinidhi

मे अखेरीस अबुझमाड-भामरागड सुरूंगमुक्त करण्याचे लक्ष्य:नक्षलवाद्यांकडील शस्त्र जप्तीमध्ये 5 वर्षांत जवळपास दुपटीने वाढ; 2026 मध्ये 101 शस्त्रे जप्त

नक्षलवाद्यांचे सशस्त्र जाळे उद्ध्वस्त करण्यासाठी पोलिसांनी आता दुहेरी मोहीम हाती घेतली आहे. एका बाजूला जंगलातील शस्त्रसाठे शोधून जप्त केले जात आहेत, तर दुसरीकडे नक्षलवाद्यांनी पेरलेले भूसुरुंग निकामी करून दुर्गम भाग सुरक्षित केला जात आहे. गडचिरोलीतील अबुझमाड-भामरागड परिसरातील अंदाजे 575 चौ.कि.मी. क्षेत्र मे 2027 पर्यंत सुरूंगमुक्त करण्याचे उद्दिष्ट आहे. सी-60 आणि बीडीडीएस पथकांनी आतापर्यंत 148.60 चौ.कि.मी. क्षेत्र सुरूंगमुक्त केले आहे. दरम्यान, 2026 मध्ये 31 ऑक्टोबरपर्यंत 101 शस्त्रे जप्त झाली. 2021 मधील 57 शस्त्रांच्या तुलनेत ही संख्या जवळपास दुप्पट आहे. शस्त्रजप्तीचा आलेख नक्षलवाद्यांच्या सशस्त्र क्षमतेवर झालेल्या कारवायांची तीव्रता दाखवतो. 2022 मध्ये 12, 2023 मध्ये 13, 2024 मध्ये 23, 2025 मध्ये 80 आणि 2026 मध्ये 101 शस्त्रे जप्त करण्यात आली. यंदाच्या जप्तीत 52 शस्त्रे अटक नक्षलवाद्यांकडून, 42 जमिनीत पुरून ठेवलेल्या ठिकाणांहून, पाच चकमकींतून आणि दोन शरणागतीतून मिळाली.

मे अखेरीस अबुझमाड-भामरागड सुरूंगमुक्त करण्याचे लक्ष्य:नक्षलवाद्यांकडील शस्त्र जप्तीमध्ये 5 वर्षांत जवळपास दुपटीने वाढ; 2026 मध्ये 101 शस्त्रे जप्त

नक्षलवाद्यांचे सशस्त्र जाळे उद्ध्वस्त करण्यासाठी पोलिसांनी आता दुहेरी मोहीम हाती घेतली आहे. एका बाजूला जंगलातील शस्त्रसाठे शोधून जप्त केले जात आहेत, तर दुसरीकडे नक्षलवाद्यांनी पेरलेले भूसुरुंग निकामी करून दुर्गम भाग सुरक्षित केला जात आहे. गडचिरोलीतील अबुझमाड-भामरागड परिसरातील अंदाजे 575 चौ.कि.मी. क्षेत्र मे 2027 पर्यंत सुरूंगमुक्त करण्याचे उद्दिष्ट आहे. सी-60 आणि बीडीडीएस पथकांनी आतापर्यंत 148.60 चौ.कि.मी. क्षेत्र सुरूंगमुक्त केले आहे. दरम्यान, 2026 मध्ये 31 ऑक्टोबरपर्यंत 101 शस्त्रे जप्त झाली. 2021 मधील 57 शस्त्रांच्या तुलनेत ही संख्या जवळपास दुप्पट आहे. शस्त्रजप्तीचा आलेख नक्षलवाद्यांच्या सशस्त्र क्षमतेवर झालेल्या कारवायांची तीव्रता दाखवतो. 2022 मध्ये 12, 2023 मध्ये 13, 2024 मध्ये 23, 2025 मध्ये 80 आणि 2026 मध्ये 101 शस्त्रे जप्त करण्यात आली. यंदाच्या जप्तीत 52 शस्त्रे अटक नक्षलवाद्यांकडून, 42 जमिनीत पुरून ठेवलेल्या ठिकाणांहून, पाच चकमकींतून आणि दोन शरणागतीतून मिळाली. नक्षलवाद्यांकडील शस्त्रांपेक्षा पुरवठा साखळीवर घाव घालणे अधिक महत्त्वाचे नक्षलवाद्यांकडील शस्त्रे जप्त करणे ही तात्कालिक कारवाई आहे; मात्र त्यांचे लपवलेले साठे, शस्त्र पुरवठ्याचे मार्ग आणि स्फोटकांचे जाळे उद्ध्वस्त केल्याशिवाय त्यांची पुनर्संघटनक्षमता संपणार नाही.

त्यामुळे त्यांच्या पुरवठा साखळीवर घाव घालणे आवश्यक आहे. सुरूंगमुक्तीमुळे सुरक्षा दलांसोबतच दुर्गम भागातील नागरिकांचाही जीवित धोका कमी होईल.- एम. रमेश, पोलिस अधीक्षक, गडचिरोली. शस्त्र निर्मितीच्या चार कार्यशाळा उद्ध्वस्त पोलिसांनी ऑगस्ट 2026 पर्यंत बिनागुंडा, कुक्कर, बालतेडा आणि कुमानार येथे नक्षलवाद्यांच्या चार मोठ्या शस्त्र निर्मिती कार्यशाळा उद्ध्वस्त केल्या. या कारवायांत लेथ मशीन, बीजीएल लॉन्चर व त्याच्या निर्मितीचे साहित्य, पाईप, इन्सास/एसएलआर रायफलचे साहित्य तसेच बुलेट आयईडीसह शस्त्र निर्मितीसाठी वापरण्यात येणारी यंत्रसामग्री जप्त करण्यात आली. या शिवाय 2026 मध्ये स्फोटकांच्या पुरवठा आणि साठवणुकीच्या यंत्रणेवरही धडक कारवाई सुरू असून ही मोहीम अधिक गतीमान करण्यात येणार आहे. नक्षलवाद्यांकडून 65.93 लाख जप्त 2025 मध्ये केवळ 219 रुपये जप्त झाले होते. मात्र, 31 ऑक्टोबर 2026 पर्यंत तीन कारवायांतून 65 लाख 93 हजार 350 रुपये हस्तगत झाले. लाहेरीत 58 हजार 250, कुमानार जंगलात 63 लाख 84 हजार आणि नेताळा परिसरात 1 लाख 51 हजार 100 रुपये मिळाले. कोट्यवधींच्या खंडणी वसुलीच्या पार्श्वभूमीवर जप्त रोकडीचा आकडा लक्षवेधी आहे. पोलिसांच्या लुटलेल्या शस्त्रांचाही समावेश नक्षलवाद्यांनी पोलिस पथकांवरील हल्ले, चकमकी आणि भूसुरुंग स्फोटांच्या घटनांमध्ये पोलिसांची शस्त्रे लुटली होती. अशा शस्त्रांचाही जप्त साठ्यात समावेश आहे. त्यांचे अनुक्रमांक तपासून मूळ स्रोत शोधले जात आहेत. इतर नक्षलग्रस्त राज्यांशी समन्वय साधूनही पडताळणी केली जात आहे.

Source: Maharashtra

ही बातमी उपयोगी वाटली?मित्र आणि कुटुंबासोबत WhatsAppवर share करा.
WhatsAppवर Share करा