बार्शी कष्टकरी वर्गाला उद्ध्वस्त करण्यासाठी सरकार काम करत आहे. कामगार, शेतकरी, विद्यार्थी, युवक पुढील काळात संयुक्तपणे सरकारविरोधात लढाई अधिक मजबूत करतील, असा विश्वासही त्यांनी या वेळी व्यक्त केला. एआयटीयूसी कामगार केंद्र, अखिल भारतीय किसान सभा, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, संयुक्त किसान मोर्चा यांच्या वतीने सोमवारी देशव्यापी आंदोलनाचा भाग म्हणून तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. या मोर्चात अखिल भारतीय किसान सभा, ग्रामपंचायत कर्मचारी संघटना, जगदाळे मामा हॉस्पिटल संघ, बांधकाम कामगार संघटना, बार्शी नगरपालिका संघटना व आरोग्य स्त्री परिचर संघटना उपस्थित होते. या वेळी कॉमेड ए. बी. कुलकर्णी, लहू आगलावे, लक्ष्मण घाडगे, आनंद गुरव, प्रवीण मस्तूद, अनिरुद्ध नखाते आदी उपस्थित होते. यावेळी मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
श्रम संहिता रद्द करा, 8 तासांचा कामाचा दिवस करा, किमान वेतन 30 हजार रुपये करा, संप करण्याचा अधिकार अबाधित ठेवा, स्वामीनाथन आयोग द्या, बार्शीत दुष्काळ जाहीर करा, 2025 चा पीक विमा द्या, शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी द्या, शिक्षणाचे खासगीकरण थांबवा, 25 हजार शाळा बंद करण्याचा निर्णय मागे घ्या, ग्रामपंचायत कर्मचारी, अर्धवेळ आरोग्य स्त्री परिचर, नगरपालिका कामगार यांना बोनस, पेन्शन प्रॉव्हिडंट फंड, शासकीय सुट्या, रजा, गणवेश, आयकार्ड द्या, यावलकर समितीच्या शिफारसी लागू करा, अशा विविध मागणी करण्यात आल्या.