Natepute Express
सर्व बातम्या
महाराष्ट्रNatepute Pratinidhi

कर्जतमधील वृक्षतोडीवर सयाजी शिंदेंची टीका:पंकजा मुंडेंचे प्रत्युत्तर, म्हणाल्या, मी बॉटनी ऑनर्स आहे

कर्जतच्या सायडोंगर परिसरातील टोरंट पॉवरच्या जलविद्युत प्रकल्पासाठी सुरू असलेल्या वृक्षतोडीवरून वातावरण तापले आहे. अभिनेते सयाजी शिंदे यांनी पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांच्या ज्ञानावर प्रश्न उपस्थित केल्यानंतर मुंडेंनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली. ‘पर्यावरणाच्या प्रश्नांची मला पूर्ण जाणीव असून, मी बॉटनी ऑनर्स आहे,’ असे त्यांनी स्पष्ट केले. रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील सायडोंगर परिसरात प्रस्तावित जलविद्युत प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड सुरू असल्याचा मुद्दा सध्या चर्चेत आहे. टोरंट पॉवर कंपनीच्या या प्रकल्पासाठी जुन्या आणि मोठ्या झाडांची कत्तल केली जात असल्याचा आरोप पर्यावरणप्रेमींकडून केला जात आहे. या वृक्षतोडीवरून प्रसिद्ध अभिनेते आणि पर्यावरण संवर्धनासाठी काम करणारे सयाजी शिंदे यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली होती. विशेषतः पर्यावरण खात्याची जबाबदारी सांभाळणाऱ्या मंत्री पंकजा मुंडे यांच्या भूमिकेवर त्यांनी प्रश्न उपस्थित केले होते. या टीकेनंतर आता पंकजा मुंडे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

कर्जतमधील वृक्षतोडीवर सयाजी शिंदेंची टीका:पंकजा मुंडेंचे प्रत्युत्तर, म्हणाल्या, मी बॉटनी ऑनर्स आहे

Pankaja Munde Reply To Sayaji Shinde On Karjat Tree Felling Controversy कर्जतच्या सायडोंगर परिसरातील टोरंट पॉवरच्या जलविद्युत प्रकल्पासाठी सुरू असलेल्या वृक्षतोडीवरून वातावरण तापले आहे. अभिनेते सयाजी शिंदे यांनी पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांच्या ज्ञानावर प्रश्न उपस्थित केल्यानंतर मुंडेंनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली. ‘ रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील सायडोंगर परिसरात प्रस्तावित जलविद्युत प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड सुरू असल्याचा मुद्दा सध्या चर्चेत आहे. टोरंट पॉवर कंपनीच्या या प्रकल्पासाठी जुन्या आणि मोठ्या झाडांची कत्तल केली जात असल्याचा आरोप पर्यावरणप्रेमींकडून केला जात आहे. या वृक्षतोडीवरून प्रसिद्ध अभिनेते आणि पर्यावरण संवर्धनासाठी काम करणारे सयाजी शिंदे यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली होती. विशेषतः पर्यावरण खात्याची जबाबदारी सांभाळणाऱ्या मंत्री पंकजा मुंडे यांच्या भूमिकेवर त्यांनी प्रश्न उपस्थित केले होते. या टीकेनंतर आता पंकजा मुंडे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. 'मी पंकजा गोपीनाथ मुंडे, पर्यावरणमंत्री; मी बॉटनी ऑनर्स आहे' सयाजी शिंदे यांनी केलेल्या टीकेबाबत विचारले असता पंकजा मुंडे म्हणाल्या की, मी त्यांचे वक्तव्य पाहिले आहे. मी पंकजा गोपीनाथ मुंडे, पर्यावरणमंत्री आहे. मी बॉटनी ऑनर्स आहे. माझे शिक्षणही चांगले झाले आहे. पर्यावरणाच्या विषयाची मला पूर्ण माहिती असून, या क्षेत्रातील प्रश्नांची मला जाणीव आहे. सयाजी शिंदे यांनी मांडलेल्या काही मतांशी मी सहमत आहे; मात्र या विषयावर वैयक्तिक टीका करून चालणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

पर्यावरणाचे नुकसान माणसांनीच केले आहे, या सयाजी शिंदे यांच्या विधानाशी आपण सहमत असल्याचेही पंकजा मुंडे यांनी सांगितले. विकास आणि पर्यावरण यांच्यात समतोल राखणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. माणसाला झाडेही हवी आहेत आणि विजेची सुविधाही आवश्यक आहे. त्यामुळे या दोन्ही गोष्टींचा समतोल कसा साधता येईल, यासाठी सरकार प्रयत्न करेल. या विषयाकडे आपण स्वतः लक्ष देणार असून, डोळ्यात तेल घालून यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासनही त्यांनी दिले. मोठी झाडे तोडून लहान रोपे लावणे मान्य नाही; सयाजी शिंदेंचा संताप कर्जत तालुक्यातील सायडोंगर परिसरात टोरंट पॉवर कंपनीच्या प्रस्तावित जलविद्युत प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड होत असल्याचा मुद्दा सयाजी शिंदे यांनी उपस्थित केला होता. मोठ्या वृक्षांची तोड करून त्या बदल्यात लहान रोपे लावण्याची भूमिका योग्य नसल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले होते. अनेक वर्षे वाढलेली झाडे तोडून त्यांच्या जागी लहान रोपे लावल्याने पर्यावरणाची झालेली हानी भरून निघू शकत नाही. झाडे मारून विकास साधता येणार नाही, अशी भूमिका त्यांनी मांडली होती. मंत्र्यांना एखादे खाते देताना त्या खात्याशी संबंधित विषयांचे ज्ञान आहे की नाही, हे पाहणे गरजेचे असल्याचे म्हणत त्यांनी पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांच्यावरही टीका केली होती. त्यांच्या या विधानामुळे राजकीय आणि पर्यावरणविषयक वर्तुळात चर्चा सुरू झाली. त्यावर पंकजा मुंडे यांनी आपल्या शैक्षणिक पात्रतेचा उल्लेख करत प्रत्युत्तर दिले आहे.

राज ठाकरेही वृक्षतोडीच्या विरोधात; विरोधकांची प्रकल्पाला विरोधाची भूमिका कर्जत परिसरातील वृक्षतोडीचा मुद्दा आता राजकीय पातळीवरही गाजू लागला आहे. प्रस्तावित प्रकल्पामुळे पर्यावरणाचे मोठे नुकसान होण्याची शक्यता व्यक्त करत विरोधी पक्षांनी सरकारला लक्ष्य केले आहे. कोणत्याही परिस्थितीत हा प्रकल्प होऊ देणार नसल्याची भूमिका विरोधकांकडून मांडण्यात आली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही या प्रकरणात लक्ष घालत वृक्षतोडीच्या मुद्द्यावरून सरकारवर टीका केली आहे. त्यामुळे एका बाजूला वीज निर्मितीसाठी आवश्यक प्रकल्प आणि दुसऱ्या बाजूला पर्यावरणाचे संरक्षण, असा हा वाद निर्माण झाला आहे. प्रकल्पाच्या माध्यमातून विकास साधताना नैसर्गिक संपत्तीचे नुकसान होणार नाही, याची काळजी घेण्याची मागणी पर्यावरणप्रेमींकडून केली जात आहे. ऊसतोड कामगारांच्या तांड्यावर पंकजा मुंडेंनी साजरी केली भाऊबीज दरम्यान, पंकजा मुंडे यांनी पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यात ऊसतोड कामगारांच्या तांड्याला भेट दिली. संत तुकाराम महाराज सहकारी साखर कारखान्याच्या परिसरात वास्तव्यास असलेल्या ऊसतोड कामगारांच्या कुटुंबीयांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी त्यांनी महिला कामगारांसोबत त्यांच्या चुलीवर स्वयंपाकही केला. ऊसतोड कामगार महिलांच्या दैनंदिन जीवनातील अडचणी समजून घेत त्यांच्यासोबत भाऊबीज साजरी केली.

एकीकडे कर्जतमधील वृक्षतोडीवरून सयाजी शिंदे यांनी उपस्थित केलेले प्रश्न आणि दुसरीकडे त्यावर पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांनी दिलेले प्रत्युत्तर यामुळे हा विषय चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. विकासकामे आणि पर्यावरण संवर्धन यांचा समतोल राखण्यासाठी सरकार नेमकी कोणती भूमिका घेते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. सोनिया गांधींच्या आत्मचरित्रावर चंद्रशेखर बावनकुळेंचा घणाघात:म्हणाले- स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करता येत नाही, म्हणून पुस्तकं लिहून कन्फ्युजन तयार करतायत काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या ‘Belonging: A Journey of Love’ या आत्मचरित्रावरून सध्या राजकीय वादळ उठले आहे. या पुस्तकात आणीबाणी आणि बाबरी मशीद पतन यांसारख्या मुद्द्यांवर केलेल्या उल्लेखांवरून भारतीय जनता पक्षाचे (भाजप) नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेसवर आणि सोनिया गांधींवर घणाघाती टीका केली आहे. "जेव्हा स्वतःचे कर्तृत्व सिद्ध करता येत नाही, तेव्हा पुस्तके लिहून जनतेत कन्फ्युजन तयार करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे," असा थेट आरोप बावनकुळे यांनी केला. 

Source: Maharashtra

ही बातमी उपयोगी वाटली?मित्र आणि कुटुंबासोबत WhatsAppवर share करा.
WhatsAppवर Share करा