Natepute Express
सर्व बातम्या
महाराष्ट्रNatepute Pratinidhi

दिवाळीसाठी पाहुणे म्हणून आले अन् काळाचा घाला:धरणात बुडून वडिलांसह दोन चिमुकल्या मुलींचा मृत्यू

दिवाळीचा सण म्हणजे आनंद, उत्साह आणि कुटुंबीयांसोबत वेळ घालवण्याचा क्षण. सणानिमित्त नातेवाईक आणि मित्रमंडळी एकमेकांच्या घरी भेटी देत असताना नाशिक जिल्ह्यातून एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. दिवाळीनिमित्त पाहुणे म्हणून आलेल्या एकाच कुटुंबातील तिघांचा धरणाच्या पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. यामध्ये वडिलांसह त्यांच्या दोन चिमुकल्या मुलींचा समावेश आहे. भाऊबीजेच्या दिवशी घडलेल्या या दुर्घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून चव्हाण कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अंजनेरी शिवारात असलेल्या बेझे धरण परिसरात ही दुर्घटना घडली. दिवाळीनिमित्त सुरेश भोर हे आपल्या दोन मुलींसह नातेवाईकांकडे पाहुणे म्हणून आले होते. बेझे धरणालगत राहणाऱ्या उत्तम चव्हाण यांच्या घरी भोर कुटुंबीय आले होते. सणाच्या निमित्ताने नातेवाईक एकत्र आल्याने घरात आनंदाचे वातावरण होते. मात्र, काही वेळातच या आनंदाच्या वातावरणाचे रूपांतर शोकाकुल वातावरणात झाले.

दिवाळीसाठी पाहुणे म्हणून आले अन् काळाचा घाला:धरणात बुडून वडिलांसह दोन चिमुकल्या मुलींचा मृत्यू

दिवाळीचा सण म्हणजे आनंद, उत्साह आणि कुटुंबीयांसोबत वेळ घालवण्याचा क्षण. सणानिमित्त नातेवाईक आणि मित्रमंडळी एकमेकांच्या घरी भेटी देत असताना नाशिक जिल्ह्यातून एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. दिवाळीनिमित्त पाहुणे म्हणून आलेल्या एकाच कुटुंबातील तिघांचा धरणाच्या पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. यामध्ये वडिलांसह त्यांच्या दोन चिमुकल्या मुलींचा समावेश आहे. भाऊबीजेच्या दिवशी घडलेल्या या दुर्घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून चव्हाण कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अंजनेरी शिवारात असलेल्या बेझे धरण परिसरात ही दुर्घटना घडली.

दिवाळीनिमित्त सुरेश भोर हे आपल्या दोन मुलींसह नातेवाईकांकडे पाहुणे म्हणून आले होते. बेझे धरणालगत राहणाऱ्या उत्तम चव्हाण यांच्या घरी भोर कुटुंबीय आले होते. सणाच्या निमित्ताने नातेवाईक एकत्र आल्याने घरात आनंदाचे वातावरण होते. मात्र, काही वेळातच या आनंदाच्या वातावरणाचे रूपांतर शोकाकुल वातावरणात झाले. मिळालेल्या माहितीनुसार, सकाळच्या सुमारास सुरेश भोर हे आपल्या दोन्ही मुलींना घेऊन आंघोळीसाठी धरणाजवळील पाण्याकडे गेले होते. तिघेही धरणाच्या पाण्यात उतरले. मात्र, पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने ते पाण्यात बुडू लागले. या दुर्घटनेत तिघांचाही बुडून मृत्यू झाला.

या घटनेची माहिती समोर येताच परिसरात एकच खळबळ उडाली. सणासुदीच्या काळात घडलेल्या या दुर्घटनेमुळे स्थानिक नागरिकांमधून हळहळ व्यक्त केली जात आहे. या दुर्घटनेत सुरेश नामदेव भोर (वय 42), त्यांच्या मुली ज्योती सुरेश भोर (वय 10) आणि हर्षदा सुरेश भोर (वय 7) यांचा मृत्यू झाला. अवघ्या 7 आणि 10 वर्षांच्या दोन चिमुकल्या मुलींचा वडिलांसह मृत्यू झाल्याने परिसरातील नागरिकांना मोठा धक्का बसला आहे. दिवाळी साजरी करण्यासाठी नातेवाईकांकडे आलेल्या भोर कुटुंबीयांवर काळाने घाला घातल्याने सर्वत्र शोक व्यक्त होत आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर संबंधित यंत्रणांना याबाबत कळविण्यात आले. या प्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. त्र्यंबकेश्वर पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत. सणासुदीच्या काळात जलाशय, धरणे आणि तलावांमध्ये आंघोळीसाठी उतरताना पाण्याच्या खोलीचा अंदाज येत नसल्याने अशा दुर्घटना घडण्याचा धोका असतो. बेझे धरणातील या दुर्घटनेने पुन्हा एकदा जलाशय परिसरात काळजी घेण्याची गरज अधोरेखित केली आहे.

Source: Maharashtra

ही बातमी उपयोगी वाटली?मित्र आणि कुटुंबासोबत WhatsAppवर share करा.
WhatsAppवर Share करा