Natepute Express
सर्व बातम्या
महाराष्ट्रNatepute Pratinidhi

पेंच अपघात प्रकरणी काँग्रेसची पोस्ट:गाडी भाजप आमदार परिणय फुकेंच्या पुत्राने चालवल्याचा महाराष्ट्र काँग्रेसचा आरोप

नागपूरजवळील मध्य प्रदेश-महाराष्ट्र सीमेवरील पेंच अभयारण्य परिसरात चार दिवसांपूर्वी झालेल्या भीषण कार अपघातावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या अपघातात भाजप आमदार परिणय फुके यांचा मुलगा सहभागी असल्याचा गंभीर आरोप महाराष्ट्र काँग्रेसने सोशल मीडियावरील पोस्टद्वारे केला आहे. महाराष्ट्र काँग्रेसने पोस्टमध्ये म्हटले आहे की, चार दिवसांपूर्वी नागपूरजवळील मध्य प्रदेश-महाराष्ट्र सीमेवरील पेंच अभयारण्य परिसरात झालेल्या भीषण अपघातात झिदान अली या तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य पाच जण गंभीर जखमी झाले. या अपघातात सहभागी असलेली गाडी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय आणि भाजप आमदार परिणय फुके यांच्या नावावर असल्याचे समोर आले आहे. अपघाताच्या वेळी ही गाडी त्यांचा मुलगा यथार्थ परिणय फुके चालवत होता. तसेच, अपघाताच्या वेळी तो आणि गाडीतील इतर तरुण-तरुणी मद्यधुंद अवस्थेत असल्याचीही माहिती समोर येत आहे.

पेंच अपघात प्रकरणी काँग्रेसची पोस्ट:गाडी भाजप आमदार परिणय फुकेंच्या पुत्राने चालवल्याचा महाराष्ट्र काँग्रेसचा आरोप

Pench Accident Controversy; Congress Accuses BJP MLA Parinay Phuke Son नागपूरजवळील मध्य प्रदेश-महाराष्ट्र सीमेवरील पेंच अभयारण्य परिसरात चार दिवसांपूर्वी झालेल्या भीषण कार अपघातावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या अपघातात भाजप आमदार परिणय फुके यांचा मुलगा सहभागी असल्याचा गंभीर आरोप महाराष्ट्र काँग्रेसने महाराष्ट्र काँग्रेसने पोस्टमध्ये म्हटले आहे की, चार दिवसांपूर्वी नागपूरजवळील मध्य प्रदेश-महाराष्ट्र सीमेवरील पेंच अभयारण्य परिसरात झालेल्या भीषण अपघातात झिदान अली या तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य पाच जण गंभीर जखमी झाले. या अपघातात सहभागी असलेली गाडी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय आणि भाजप आमदार परिणय फुके यांच्या नावावर असल्याचे समोर आले आहे. अपघाताच्या वेळी ही गाडी त्यांचा मुलगा यथार्थ परिणय फुके चालवत होता. तसेच, अपघाताच्या वेळी तो आणि गाडीतील इतर तरुण-तरुणी मद्यधुंद अवस्थेत असल्याचीही माहिती समोर येत आहे.

तरी कायद्यापेक्षा कोणीही मोठे नाही या प्रकरणी कायद्याच्या समान अंमलबजावणीची मागणी करत महाराष्ट्र काँग्रेसने पुढे म्हटलंय की, प्रश्न केवळ गाडी भाजप आमदाराच्या मालकीची आहे किंवा अपघाताच्या वेळी त्यांचा मुलगा गाडी चालवत होता, एवढाच मर्यादित नाही; तर हा एका तरुणाच्या मृत्यूचा आणि कायद्याच्या समान अंमलबजावणीचा प्रश्न आहे. या प्रकरणात नेमके काय घडले, अपघाताला कोण जबाबदार आहे आणि मद्यप्राशनासंदर्भातील आरोपांमध्ये किती तथ्य आहे, हे निष्पक्ष तपासातून स्पष्ट झाले पाहिजे. सत्तेचा माज कितीही मोठा असला, तरी कायद्यापेक्षा कोणीही मोठे नाही. महाराष्ट्र काँग्रेसने या पोस्टद्वारे निष्पक्ष चौकशीची मागणी करताना म्हटले आहे की, या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई झालीच पाहिजे. भाजप आमदार परिणय फुके यांच्या मुलाला राजकीय दबावापोटी कोणतीही सूट मिळता कामा नये. पीडितांना न्याय मिळालाच पाहिजे!

Source: Maharashtra

ही बातमी उपयोगी वाटली?मित्र आणि कुटुंबासोबत WhatsAppवर share करा.
WhatsAppवर Share करा