Natepute Express
सर्व बातम्या
महाराष्ट्रNatepute Pratinidhi

सरकार ओबीसीविरोधी भूमिका घेतंय:विजय वडेट्टीवारांची मुख्यमंत्र्यांवर टीका

मराठा आरक्षणाच्या मागणीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील ओबीसी आरक्षणाचा मुद्दा पुन्हा तापला आहे. मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाबाबत चर्चा सुरू असतानाच काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी ओबीसींच्या प्रश्नावरून राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. “ओबीसीला संपवण्याचा विळा सरकारने उचलला आहे. सरकारची भूमिका ओबीसीविरोधी असल्याचे आता स्पष्ट झाले आहे,” असा गंभीर आरोप वडेट्टीवार यांनी केला. नागपूर येथे पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी जातनिहाय जनगणना, ओबीसींच्या प्रमाणपत्रांचा मुद्दा आणि सरकारच्या ओबीसी उपसमितीच्या बैठकांवरून सरकारला लक्ष्य केले. जात लिहिल्याने अर्धी लढाई जिंकली कशी? जातनिहाय जनगणनेच्या संदर्भात बोलताना वडेट्टीवार यांनी काही नेत्यांकडून करण्यात आलेल्या दाव्यावर प्रश्न उपस्थित केला.

सरकार ओबीसीविरोधी भूमिका घेतंय:विजय वडेट्टीवारांची मुख्यमंत्र्यांवर टीका

मराठा आरक्षणाच्या मागणीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील ओबीसी आरक्षणाचा मुद्दा पुन्हा तापला आहे. मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाबाबत चर्चा सुरू असतानाच काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी ओबीसींच्या प्रश्नावरून राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. “ओबीसीला संपवण्याचा विळा सरकारने उचलला आहे. सरकारची भूमिका ओबीसीविरोधी असल्याचे आता स्पष्ट झाले आहे,” असा गंभीर आरोप वडेट्टीवार यांनी केला. नागपूर येथे पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी जातनिहाय जनगणना, ओबीसींच्या प्रमाणपत्रांचा मुद्दा आणि सरकारच्या ओबीसी उपसमितीच्या बैठकांवरून सरकारला लक्ष्य केले. जात लिहिल्याने अर्धी लढाई जिंकली कशी? जातनिहाय जनगणनेच्या संदर्भात बोलताना वडेट्टीवार यांनी काही नेत्यांकडून करण्यात आलेल्या दाव्यावर प्रश्न उपस्थित केला. केवळ जनगणनेत जात लिहिली गेल्याने अर्धी लढाई जिंकली असे म्हणता येणार नाही, असे ते म्हणाले.

“जात लिहिल्याबरोबर अर्धी लढाई कशी जिंकली? हे मला कळलं नाही. जर त्यामध्ये ओबीसीचा स्वतंत्र कॉलम असता, तर त्यातून 100 टक्के यश मिळालं असतं,” असे वडेट्टीवार यांनी म्हटले. जात लिहिण्याबरोबरच त्यातील विविध पोटजाती आणि वेगवेगळ्या राज्यांमध्ये जातींची नोंद कशा पद्धतीने केली जाते, याचाही विचार करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. सरकारवर दबाव टाका, ओबीसीचा स्वतंत्र कॉलम घ्या ओबीसींच्या प्रश्नासाठी आंदोलन करणाऱ्यांनी सरकारवर दबाव आणून जातनिहाय नोंदीमध्ये ओबीसींचा स्वतंत्र कॉलम समाविष्ट करण्याची मागणी करावी, असे आवाहन वडेट्टीवार यांनी केले. “सरकारवर दबाव टाका आणि ओबीसीचा कॉलम सरकारला घालायला लावा. तर तुमच्या लढाईला काही महत्त्व आहे,” असे ते म्हणाले. त्यामुळे केवळ जात नमूद करण्यापेक्षा ओबीसींची स्वतंत्र आणि स्पष्ट आकडेवारी समोर येणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जरांगे काय करतात, सरकार पाहील मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाबाबत विचारलेल्या प्रश्नावर वडेट्टीवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. जरांगे पाटील कोणाला बोलावतात, कोणासोबत बैठक घेतात किंवा पुढील आंदोलनाची दिशा काय ठरवतात, याच्याशी आपला संबंध नसल्याचे त्यांनी सांगितले. “जरांगे पाटील काय करतात, कोणाला बोलवतात, काय बैठक घेतात, ते सरकार बघेल आणि जरांगे बघतील. आम्हाला त्यात कशाला पडायचं?” असा सवाल त्यांनी केला.

मात्र, ओबीसी समाजावर अन्याय होत असल्याचा आरोप करत त्यांनी सरकारच्या धोरणांवर टीका कायम ठेवली. ओबीसीला संपवण्याचा विळा उचलला ओबीसी समाजाच्या वाट्याला काहीच मिळत नसल्याचा आरोप करत वडेट्टीवार यांनी सरकारच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले. “आमच्यावर अन्याय करण्याचा विळा उचललाच आहे. ओबीसीला संपवण्याचा विळा उचलला आहे. ओबीसीच्या वाट्याला काही मिळत नाही,” असे ते म्हणाले. ओबीसी समाजाच्या प्रश्नांवर सरकारकडून गांभीर्याने विचार होत नसल्याचा आरोपही त्यांनी केला. ओबीसी उपसमितीच्या बैठका नियमित घ्या ओबीसींच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी सरकारने स्थापन केलेल्या ओबीसी उपसमितीच्या बैठकांचा मुद्दाही वडेट्टीवार यांनी उपस्थित केला. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे या उपसमितीचे अध्यक्ष असल्याचा संदर्भ देत, आतापर्यंत केवळ दोन बैठका झाल्याचे त्यांनी सांगितले. या बैठका नियमितपणे घेण्याची मागणी आपण केली असल्याचे वडेट्टीवार म्हणाले. “दर महिन्याला एक बैठक घ्या आणि ओबीसी नेत्यांनाही बोलवा. त्यांच्या काही समस्या असतील, सूचना असतील तर त्या बैठकीत मांडण्याची संधी द्या,” अशी मागणी त्यांनी केली. मात्र, सरकारकडून

त्याची अंमलबजावणी होत नसल्याचा आरोप त्यांनी केला. सरकारची भूमिका ओबीसीविरोधी असल्याचं स्पष्ट ओबीसी उपसमितीच्या बैठका नियमित होत नसल्याचा आरोप करत वडेट्टीवार यांनी सरकारच्या हेतूवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “याचा अर्थ असा आहे की सरकार ओबीसीच्या प्रश्नासंबंधी अनुकूल नाही. या सरकारची भूमिका ओबीसीविरोधी आहे, हे आता स्पष्ट झालं आहे,” असा आरोप त्यांनी केला. त्यामुळे मराठा आरक्षणाच्या मागणीसोबतच ओबीसी आरक्षण आणि जातनिहाय आकडेवारीचा मुद्दाही आगामी काळात अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. मराठवाड्यातील ओबीसी प्रमाणपत्रांवरही प्रश्न ओबीसी प्रमाणपत्रांच्या मुद्द्यावर बोलताना वडेट्टीवार यांनी मराठवाड्यात मोठ्या प्रमाणावर नवीन प्रमाणपत्रे दिली जात असल्याचा दावा केला. “मराठवाड्यामध्ये 85 टक्के नवीन प्रमाणपत्र घेणारे...” असे म्हणत त्यांनी या विषयावर अधिक जागरूक राहण्याचे आवाहन केले. ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावर सरकारच्या निर्णयांकडे बारकाईने लक्ष ठेवण्याची गरज असल्याचे सांगत त्यांनी समाजाला जागरूक राहण्याचा संदेश दिला.

दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या हालचाली आणि ओबीसी नेत्यांकडून आरक्षणाच्या संरक्षणासाठी घेतली जाणारी भूमिका यामुळे राज्यातील आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा राजकीय संघर्षाच्या केंद्रस्थानी आला आहे. विजय वडेट्टीवार यांच्या ताज्या वक्तव्यामुळे या संघर्षाला आणखी धार येण्याची शक्यता आहे. 

Source: Maharashtra

ही बातमी उपयोगी वाटली?मित्र आणि कुटुंबासोबत WhatsAppवर share करा.
WhatsAppवर Share करा