Natepute Express
सर्व बातम्या
महाराष्ट्रNatepute Pratinidhi

3 विद्यार्थिनींच्या मृत्यूवरून राजकारण तापलं

गडचिरोलीतील आश्रमशाळेत सर्पदंशामुळे तीन विद्यार्थिनींचा झालेला मृत्यू अतिशय दुर्दैवी असून राज्य सरकारने या प्रकरणाची गंभीर दखल घेत चौकशीचे आदेश दिले आहेत. मात्र, या दुर्दैवी घटनेवर संजय राऊत केवळ राजकारण करत आहेत आणि राजकीय पोळी भाजत आहेत. राऊतांनी सरकारला प्रश्न विचारण्यापूर्वी ही आश्रमशाळा नक्की कुणाची आहे, याची माहिती घ्यायला हवी होती. ती आश्रमशाळा काँग्रेसचे माजी खासदार मारोतराव कोवासे यांचीच आहे, असा खळबळजनक खुलासा भारतीय जनता पक्षाचे प्रदेश प्रवक्ते नवनाथ बन यांनी केला आहे. मुंबईत भाजप प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना नवनाथ बन यांनी संजय राऊत आणि महाविकास आघाडीवर (MVA) सडकून टीका केली. आश्रमशाळा काँग्रेस नेत्याची, मग राऊत काँग्रेसला जाब विचारणार का? सर्पदंशाच्या घटनेचा संदर्भ देत बन म्हणाले, "ज्या आश्रमशाळेत हा प्रकार घडला, ती संस्था काँग्रेसचे अनेक वर्षे खासदार राहिलेले आणि स्थानिक नेते मारोतराव कोवासे यांची आहे. राज्य सरकार प्रत्येक विद्यार्थ्यामागे दोन हजार रुपये अनुदान देते, त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची प्राथमिक जबाबदारी ही संस्थाचालकाची असते.

3 विद्यार्थिनींच्या मृत्यूवरून राजकारण तापलं

गडचिरोलीतील आश्रमशाळेत सर्पदंशामुळे तीन विद्यार्थिनींचा झालेला मृत्यू अतिशय दुर्दैवी असून राज्य सरकारने या प्रकरणाची गंभीर दखल घेत चौकशीचे आदेश दिले आहेत. मात्र, या दुर्दैवी घटनेवर संजय राऊत केवळ राजकारण करत आहेत आणि राजकीय पोळी भाजत आहेत. राऊतांनी सरकारला प्रश्न विचारण्यापूर्वी ही आश्रमशाळा नक्की कुणाची आहे, याची माहिती घ्यायला हवी होती. ती आश्रमशाळा काँग्रेसचे माजी खासदार मारोतराव कोवासे यांचीच आहे, असा खळबळजनक खुलासा भारतीय जनता पक्षाचे प्रदेश प्रवक्ते नवनाथ बन यांनी केला आहे. मुंबईत भाजप प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना नवनाथ बन यांनी संजय राऊत आणि महाविकास आघाडीवर (MVA) सडकून टीका केली. आश्रमशाळा काँग्रेस नेत्याची, मग राऊत काँग्रेसला जाब विचारणार का? सर्पदंशाच्या घटनेचा संदर्भ देत बन म्हणाले, "ज्या आश्रमशाळेत हा प्रकार घडला, ती संस्था काँग्रेसचे अनेक वर्षे खासदार राहिलेले आणि स्थानिक नेते मारोतराव कोवासे यांची आहे. राज्य सरकार प्रत्येक विद्यार्थ्यामागे दोन हजार रुपये अनुदान देते, त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची प्राथमिक जबाबदारी ही संस्थाचालकाची असते. आश्रमशाळेच्या खिडकीजवळ लाकडांचे आणि विटांचे ढिगारे होते, जे सापांसाठी पूरक वातावरण निर्माण करतात.

मग संजय राऊत एवढ्या पोटतिडकीने जो जाब सरकारला विचारत आहेत, तो ते काँग्रेस नेत्याला विचारणार आहेत का? मारोतराव कोवासेंची हकालपट्टी करण्याची मागणी ते राहुल गांधींकडे करणार आहेत का?" राऊतांनी मारोतराव कोवासेंच्या घरी साप सोडावेत "संजय राऊतांनी आवाहन केले आहे की मुख्यमंत्र्यांच्या 'वर्षा' निवासस्थानी आणि मंत्र्यांच्या बंगल्यावर साप सोडा. मी त्यांना सांगू इच्छितो की, घटनेला प्राथमिक जबाबदार असणाऱ्या संस्थाचालक मारोतराव कोवासे यांच्या घरी त्यांनी आधी साप सोडावेत. तसेच हर्षवर्धन सपकाळ आणि राहुल गांधींच्या घरी जाऊन साप सोडण्याची हिंमत राऊतांनी दाखवावी. केवळ खासदारकी मिळवण्यासाठी ते काँग्रेसची लाचारी करत आहेत," असा टोला बन यांनी लगावला. संजय राऊत जनतेचे नाही, तर दलालांचे नेते संजय राऊतांच्या 'मी जनतेचा विरोधी पक्षनेता आहे' या विधानावर पलटवार करताना बन म्हणाले, "संजय राऊत हे जनतेचे विरोधी पक्षनेते नसून ते दलालांचे नेते आहेत. काँग्रेसची आणि सोनिया गांधींची दलाली करणे एवढेच त्यांचे काम आहे. विरोधी पक्षनेता कसा असतो, हे अडीच वर्षे देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्राला दाखवून दिले आहे. राऊतांनी पत्राचाळीचा आणि मविआ सरकारच्या काळात रोज वसूल होणाऱ्या 100 कोटींचा हिशेब आधी जनतेला द्यावा.

" गडचिरोलीत नक्षलवाद संपला, त्यामुळे यांना पोटशूळ "देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नांमुळे गडचिरोलीतील नक्षलवाद संपला आहे. तिथे रस्ते, आरोग्य, पाणी आणि शिक्षणाच्या उत्तम सुविधा पोहोचल्या आहेत. स्थानिक आदिवासींना मुख्य प्रवाहात आणले जात आहे, हे संजय राऊत आणि त्यांच्या सहकाऱ्यांना बघवत नाही. आदिवासी खितपत पडावेत, अशी त्यांची सुप्त इच्छा आहे. 1500 आदिवासींचा मृत्यू झाल्याचा राऊतांचा आकडा पूर्णपणे खोटा आणि दिशाभूल करणारा आहे," असा दावा त्यांनी केला. अमित शहांच्या नावाने राहुल गांधींनी पळ काढला अमित शहा संसदेत का येत नाहीत, या राऊतांच्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले, "जेव्हा अमित शहा संसदेत आले, तेव्हा राहुल गांधींनी सभागृहातून पळ काढला. पळपुटेपणा कोण करतंय हे संपूर्ण देशाने पाहिले. 'घरबसे' कोण आहेत हे एकदा संजय राऊतांनी उद्धव ठाकरेंना विचारावे.

" वंदे मातरम आणि तिरंग्याचा अपमान खपवून घेणार नाही लाल किल्ल्यावर गायल्या जाणाऱ्या 'वंदे मातरम'ला आणि तिरंगा रॅलीला संजय राऊतांनी विरोध केल्याचा आरोप करत बन म्हणाले, "लाल किल्ल्यावरून पहिल्यांदाच 'वंदे मातरम' गायले जाणार आहे. पण अबू आझमी आणि समाजवादी पार्टीच्या दबावाखाली राऊत याला विरोध करत आहेत. तिरंगा घेऊन येणाऱ्यांना राऊत 'मनोरुग्ण' म्हणतात. तिरंग्यामुळेच तुम्ही स्वातंत्र्यात जगता आहात, याचा त्यांना विसर पडला आहे. राऊत स्वतः रोज सकाळी चहामधून भांग पिऊन पत्रकार परिषद घेतात, त्यामुळे त्यांना सर्व जग मनोरुग्णच वाटते. तिरंग्याचा आणि वंदे मातरमचा अपमान जनता कदापि खपवून घेणार नाही.

Source: Maharashtra

ही बातमी उपयोगी वाटली?मित्र आणि कुटुंबासोबत WhatsAppवर share करा.
WhatsAppवर Share करा