युद्ध तीव्र:समुद्रामध्ये हल्ला; युक्रेनकडून रशियाची 20 जहाजे उद्ध्वस्त, पाचव्या दिवशी युक्रेनवर रशियाचे हल्ले सुरू
युद्ध तीव्र:समुद्रामध्ये हल्ला; युक्रेनकडून रशियाची 20 जहाजे उद्ध्वस्त, पाचव्या दिवशी युक्रेनवर रशियाचे हल्ले सुरू
काळ्या समुद्रात रशिया आणि युक्रेनमधील सागरी संघर्ष अधिक तीव्र झाला आहे. १४-१५ जुलैच्या रात्री युक्रेनने क्रिमियाजवळ रशियाच्या ‘शॅडो फ्लीट’मधील २० जहाजांवर ड्रोन हल्ले केले. यामध्ये १७ तेलवाहू जहाजे, दोन गॅस जहाजे आणि एका टगबोटीचा समावेश होता. या हल्ल्यांनंतर रशियाने अझोव्ह समुद्रातील जहाजांच्या हालचालींवर निर्बंध घातले आहेत. रशियाने या हल्ल्याला ‘दहशतवादी कारवाई’ असे संबोधले आहे. दुसरीकडे, युक्रेनवर रशियाचे सलग पाचव्या दिवशीही हल्ले सुरूच आहेत. बुधवारी रशियाने ओडेसा आणि आसपासच्या बंदरांवर मोठ्या प्रमाणावर ड्रोन, क्षेपणास्त्र हल्ले केले. ओडेसातील सात मजली निवासी इमारतीवर क्षेपणास्त्र कोसळल्याने तीन जणांचा मृत्यू झाला. इशारा.....ट्रम्प म्हणाले, करार झाला नाही तर वीज प्रकल्प उद्ध्वस्त करू; इराणी धमकी- प. आशियातील तेल-गॅस निर्यात रोखू होर्मुझ सामुद्रधुनीवरील तणाव पुन्हा युद्धाच्या दिशेने जात असल्याचे चित्र आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला स्पष्ट इशारा देत, चर्चा सुरू झाली नाही तर पुढील आठवड्यात इराणचे वीज प्रकल्प आणि पूल उद्ध्वस्त केले जातील, असे म्हटले आहे. अमेरिकेने होर्मुझ परिसरात इराणची नाकेबंदी करत बुधवारी सात तासांत डझनभर ठिकाणांवर हल्ले केले. त्याला प्रत्युत्तर म्हणून इराणने, पश्चिम आशियातून होणारी तेल आणि गॅस निर्यात “सर्वांसाठी असेल किंवा कोणासाठीही नसेल”, अशी धमकी दिली. तसेच बहारीन, कुवेत आणि जॉर्डनच्या दिशेने डझनभर क्षेपणास्त्रे आणि ड्रोन डागले. जॉर्डनने त्यापैकी तीन क्षेपणास्त्रे पाडल्याचा दावा केला आहे. अमेरिकेच्या हल्ल्यांमध्ये इराणचे सात सैनिक ठार झाले असून २६० जण जखमी झाले आहेत. पेच : रसद, महसूल खंडित करण्यासाठी समुद्र नवे रणांगण