Natepute Express
सर्व बातम्या
महाराष्ट्रNatepute Pratinidhi

राज्यात पावसाचे पुन्हा कमबॅक:मुंबईसह 9 जिल्ह्यांना यलो अलर्ट

राज्यात मागील काही दिवसांपासून दडी मारून बसलेल्या पावसाने पुन्हा एकदा दमदार पुनरागमन केले आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, महाराष्ट्रासह देशातील तब्बल 19 राज्यांमध्ये पावसाचा मोठा इशारा देण्यात आला आहे. रात्रीपासूनच राज्याच्या अनेक भागांत पावसाची संततधार सुरू आहे. कुठे कोणता अलर्ट? (राज्यातील पावसाची स्थिती) हवामान विभागाने राज्यातील विविध जिल्ह्यांसाठी आज सतर्कतेचे इशारे जारी केले आहेत. ऑरेंज अलर्ट: पुणे जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर पावसाचा जोर अधिक राहणार असल्याने येथे 'ऑरेंज अलर्ट' देण्यात आला आहे. यलो अलर्ट: मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या कोकणपट्ट्यासह नाशिक, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांच्या घाटमाथ्यांवर जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून, या 9 जिल्ह्यांना 'यलो अलर्ट' जारी करण्यात आला आहे.

राज्यात पावसाचे पुन्हा कमबॅक:मुंबईसह 9 जिल्ह्यांना यलो अलर्ट

Maharashtra Rain Alert: Mumbai Yellow & Pune Orange Alert Issued राज्यात मागील काही दिवसांपासून दडी मारून बसलेल्या पावसाने पुन्हा एकदा दमदार पुनरागमन केले आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, महाराष्ट्रासह देशातील तब्बल 19 राज्यांमध्ये पावसाचा मोठा इशारा देण्यात आला आहे. रात्रीपासूनच राज्याच्या अनेक भ कुठे कोणता अलर्ट? (राज्यातील पावसाची स्थिती) हवामान विभागाने राज्यातील विविध जिल्ह्यांसाठी आज सतर्कतेचे इशारे जारी केले आहेत. ऑरेंज अलर्ट: पुणे जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर पावसाचा जोर अधिक राहणार असल्याने येथे 'ऑरेंज अलर्ट' देण्यात आला आहे. यलो अलर्ट: मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या कोकणपट्ट्यासह नाशिक, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांच्या घाटमाथ्यांवर जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून, या 9 जिल्ह्यांना 'यलो अलर्ट' जारी करण्यात आला आहे. गारपिटीचा इशारा: राज्याच्या उर्वरित भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज असून, काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यताही हवामान खात्याने वर्तवली आहे. यंदा राज्यात पावसाचे प्रमाण असमान यंदाच्या मान्सून हंगामात संपूर्ण राज्यात पावसाचे प्रमाण अत्यंत असमान राहिलेले पाहायला मिळत आहे.

7 ऑगस्टपर्यंतच्या आकडेवारीनुसार: राज्यातील एकूण 355 तालुक्यांपैकी 190 तालुक्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली आहे. नंदुरबार (4), कोल्हापूर (2) आणि अहिल्यानगर (1) अशा एकूण 8 तालुक्यांमध्ये सरासरीच्या जेमतेम 25 ते 50 टक्केच पाऊस पडला आहे. 54 तालुक्यांमध्ये 50 ते 75 टक्के पाऊस झाला असून, 165 तालुक्यांमध्ये मात्र सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. छत्रपती संभाजीनगर: 4 दिवसांनंतर शहरातील तापमान 30 अंशांखाली शहरात गेल्या आठवड्यामध्ये पाऊस झाल्यानंतर संपूर्ण आठवडा कोरडा गेला, सोबतच कमाल तापमान 31 अंश सेल्सियसपेक्षा जास्त नोंदवले गेले. मंगळवारी (11 आॅगस्ट) शहराच्या काही भागात पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. सकाळपासूनच ढगाळ वातावरण असल्याने 4 दिवसांनंतर कमाल तापमान 30 अंशांपेक्षा कमी म्हणजे 29.8 अंश सेल्सियस होते.

मंगळवारी शहरात सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. मध्यवर्ती सिडको-हडकोसह शहराच्या काही भागात पावसाचा शिडकावा झाला, त्यामुळे रोजच्याप्रमाणे उन्हाची तीव्रता तुलनेत मंगळवारी कमी होती. परिणामी यामुळे शहराच्या कमाल तापमानातही घट झाली. मंगळवारी शहराचे किमान तापमान 22.4 अंश सेल्सियस होते. शहरात शुक्रवारी कमाल तापमान 31 अंश सेल्सियसपर्यंत पोहोचले. त्यात रविवारी 31.8 अंशांपर्यंत वाढ झाली. त्यानंतर सोमवारी 31.2 अंश तापमान होते. त्यानंतर त्यात मंगळवारी घट झाली. दरम्यान, हवामानशास्त्र विभागाच्या अंदाजानुसार दररोज रिमझिम पावसाची शक्यता असली तरी तापमान मात्र 31 अंशांपर्यंत राहणार आहे. भारतीय हवामान विभागाने देशातील 19 राज्यांना पावसाचा अलर्ट दिला आहे. झारखंड आणि ओडिशामध्ये अतिवृष्टीमुळे नद्यांना पूर आला असून जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. तसेच, राजधानी दिल्लीमध्ये आज 30 ते 40 किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहण्याचा आणि जोरदार पावसाचा अंदाज आहे.

याशिवाय, हरियाणा, पंजाब, उत्तर प्रदेश, राजस्थान, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, गुजरात, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या राज्यांमध्येही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. एमपीत पुढील 24 तासांत 4 इंच पावसाचा अंदाज: मुंबईत पावसानंतर दरड कोसळून 2 ठार; यूपीच्या 12 जिल्ह्यांना पूरस्थितीचा इशारा देशाच्या मध्य आणि पूर्व भागात मान्सून सक्रिय आहे. सलग तिसऱ्या दिवशी सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मध्य प्रदेश आणि राजस्थानमधील अनेक भागांत परिस्थिती बिकट झाली आहे. मान्सूनच्या तीन प्रणालींमुळे (सिस्टम्स) ही स्थिती निर्माण झाली असून, त्या अरबी समुद्र आणि बंगालचा उपसागर या दोन्ही ठिकाणांहून मोठ्या प्रमाणात आर्द्रता खेचून घेत आहेत. हवामान खात्यानुसार, इंदूर-उज्जैन विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये - रतलाम, झाबुआ, धार, बडवानी आणि इंदूर - मुसळधार पावसाची शक्यता आहे. पुढील 24 तासांत या भागांत 4 इंचांहून अधिक पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 

Source: Maharashtra

ही बातमी उपयोगी वाटली?मित्र आणि कुटुंबासोबत WhatsAppवर share करा.
WhatsAppवर Share करा