Natepute Express
सर्व बातम्या
सोलापूर जिल्हाNatepute Pratinidhi

संभाजीनगरमध्ये पिझ्झा हटमध्ये व्हेज-नॉनव्हेजसाठी एकच ओव्हन

‘सेफ फूड सेफ महाराष्ट्र’ मोहिमेअंतर्गत अन्न व औषध प्रशासनाने कारवाई करत वाळूज एमआयडीसीतील प्रसिद्ध पिझ्झा हट (मे. सॅफायर फूड्स इंडिया लि.) आणि खुलताबादेतील शेळके मामा ढाबा रेस्टॉरंटचा अन्न परवाना पुढील आदेशापर्यंत निलंबित केला आहे. सहायक आयुक्त (अन्न) द. वि. पाटील यांनी हे आदेश जारी केले आहेत. अन्न सुरक्षा अधिकारी प्र. कुचेकर यांनी नोटीस देऊनही त्रुटी न सुधारल्याने ही कारवाई झाली. या निलंबन काळात व्यवसाय सुरू ठेवल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा सहआयुक्त श्रीकांत करकळे यांनी दिला असून अधिकाऱ्यांना पाळतीचे आदेश दिले आहेत. सोयाबीन तेलाचा खोटा दावा येथे व्हेज आणि नॉन-व्हेज अन्नपदार्थ तयार करण्यासाठी एकाच ओव्हनचा वापर होत असल्याचे गंभीर प्रकरण समोर आले. “सर्व पदार्थ व्हेजिटेबल सोयाबीन तेलात केले जात होते असे आढळून आले.

संभाजीनगरमध्ये पिझ्झा हटमध्ये व्हेज-नॉनव्हेजसाठी एकच ओव्हन

FDA Action On Pizza Hut & Shelke Mama Dhaba; License Suspended In Waluj ‘सेफ फूड सेफ महाराष्ट्र’ मोहिमेअंतर्गत अन्न व औषध प्रशासनाने कारवाई करत वाळूज एमआयडीसीतील प्रसिद्ध पिझ्झा हट (मे. सॅफायर फूड्स इंडिया लि.) आणि खुलताबादेतील शेळके मामा ढाबा रेस्टॉरंटचा अन्न परवाना पुढील आदेशापर्यंत निलंबित केला आहे. सहायक आयुक्त (अन्न अन्न सुरक्षा अधिकारी प्र. कुचेकर यांनी नोटीस देऊनही त्रुटी न सुधारल्याने ही कारवाई झाली. या निलंबन काळात व्यवसाय सुरू ठेवल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा सहआयुक्त श्रीकांत करकळे यांनी दिला असून अधिकाऱ्यांना पाळतीचे आदेश दिले आहेत.

येथे व्हेज आणि नॉन-व्हेज अन्नपदार्थ तयार करण्यासाठी एकाच ओव्हनचा वापर होत असल्याचे गंभीर प्रकरण समोर आले. “सर्व पदार्थ व्हेजिटेबल सोयाबीन तेलात केले जात होते असे आढळून आले. शेळके मामा ढाब्याच्या स्वयंपाकघरात झुरळ कच्चे, शिजवलेले, शाकाहारी व मांसाहारी अन्नाचे योग्य विलगीकरण नव्हते. स्वयंपाकघरात पाणी साचत होते, खिडक्यांना जाळ्या नसल्याने कीटक-झुरळांचा वावर. कर्मचारी ॲप्रन, हातमोजे व शिरोवस्त्र वापरत नव्हते. कचऱ्याची वेळेत विल्हेवाट लावली जात नव्हती. अन्न पॅकेजिंग मटेरियल ‘फूड ग्रेड’चे असल्याचा पुरावा नव्हता

Source: Maharashtra

ही बातमी उपयोगी वाटली?मित्र आणि कुटुंबासोबत WhatsAppवर share करा.
WhatsAppवर Share करा