शिखर शिंगणापूर यात्रा; हर हर महादेव जयघोषात मुंगी घाट दुमदुमला

नातेपुते: शिखर शिंगणापूर शिव शंभू यात्रेतील शेकडो वर्षांपासून चालत आलेली परंपरा प्रथा जपत कावड वारीचा केंद्रबिंदू असलेला मानाच्या कावडी सासवड जिल्हा पुणे येथील शिवभक्त तेली भुतोजी महाराज यांच्या मानाच्या कावडी चे ने दु.३ वा सोलापूर जिल्ह्यात आगमन झाले.

Apr 21, 2024 - 16:54
Apr 22, 2024 - 17:24
 0
शिखर शिंगणापूर यात्रा; हर हर महादेव जयघोषात मुंगी घाट दुमदुमला

नातेपुते : शिखर शिंगणापूर शिव शंभू यात्रेतील शेकडो वर्षांपासून चालत आलेली परंपरा प्रथा जपत कावड वारीचा केंद्रबिंदू असलेला मानाच्या कावडी सासवड जिल्हा पुणे येथील शिवभक्त तेली भुतोजी महाराज यांच्या मानाच्या कावडी चे ने दु.३ वा सोलापूर जिल्ह्यात आगमन झाले. सोलापूर जिल्हा प्रशासनाच्यावतीने माळशिरस पंचायत समिती गटविकास अधिकारी विनायक गुळवे, कोंथळे गावचे सरपंच अमोल माने,, तहसीलदार सुरेंद्र शेजुळ, ग्रामसेवक आबासाहेब काळे,तसेच ग्रामसेवक पथकं ग्रामस्थांनी यांनी स्वागत केले. स्वागतानंतर कोथळे गावच्या ओढ्यात सोलापूर व सातारा जिल्ह्याच्या सरहद्दीवर कावडी भेटीच्या पारंपारिक सोहळा मोठ्या भक्तीमय वातावरणात पार पडला. कोल्हापूर संस्थाच्या कावडीने संत तेली भुतोजी महाराज कावडीला तीन प्रदक्षिणा घालून उराउरी भेट घेतली . खानोटा (ता दौंड) येथून ही कावड येत असते.

कोल्हापूर संस्थानच्या गादीची मानाची कावड असून सन १३१० सालापासून या कावडीची परंपरा असल्याचे सांगण्यात येते.हा भेट सोहळा पाहण्यासाठी लाखो भाविक रणरणत्या उन्हात कोथळे गावच्या ओढ्यात थांबलेले होते. त्यानंतर अनेक लहान-मोठ्या कावडी ना त्यांचा मान देऊन व भेट घेवून संत तेली भुतोजी महाराज यांची कावड सायंकाळी ५ .30 वा मुंगी घाटाच्या पायथ्याशी आली. प्रथम आरती करून नंतर फटाक्याची आतिशबाजी करण्यात आली .त्यानंतर मानवी साखळी तयार करून कावडीने अवघड मुंगी घाटावर चढाई सुरु केली.

सोलापूर- सातारा जिल्ह्याच्या सरहद्दीवरील जमीनसपाटी पासुन १०५० मी. खडा उंच मुंगी डोंगर घाट सर करण्यास ५.३० वा सुरुवात झाली घाट पायथ्याशी महाआरती करत असताना शिव हर हर महादेवाचा जयघोष पर्वत रांगेत गर्जत होता.

मानाची भुतोजी तेली महाराज कावडीने शिवपार्वती लग्नाची वरात म्हणून मानाच्या कावडी शंभू महादेवाच्या पिंडीवर जलाभिषेक करतात. या कावडी मुंगीघाटातून वर चढविण्याची शेकडो वर्षांपासूनची परंपरा आहे. सोलापूर जिल्ह्यातील कोथळे गावापासून सर्व कावडी मुंगीघाट हद्दीत प्रवेश करतात. कोथळे गावापासून निघाल्यानंतर सर्व कावडी मुंगीघाटातून चार टप्यात डोंगरावर येतात. कावडी वर चढविण्याचा सोहळा भक्ती व शक्तीचा संगम मानला जातो.

“ज्ञान वैराग्य कावडी खांदी| शांती जीवन तयामधी॥ शिवनाम तुम्ही घ्या रे। शिवस्मरणी तुम्ही रहा रे॥ हरिहर कावड घेतली खांदी। भोवती गर्जती संतमांदी॥ एका जनार्दनी कावड बरी। भक्ती फरारा तयावरी॥”

सासवड, खळद, शिवरी, एखतपूर, बेलसर, कुंभारवळण, खानवडी, बारामती, इंदापूर, गुणवरे, माळशिरस येथील मानाच्या कावडीचा समावेश असतो.

हरहर महादेव अशा जयघोषात विविध वाद्यांच्या गजरात व फटाक्यांच्या आतिषबाजीत मानवी साखळी द्वारा शिखर शिंगणापूरच्या अवघड मुंगी घाटातून कावडी चढवण्याच्या पारंपारिक सोहळा धार्मिक वातावरणात पार पडला भक्ती व शक्तीचा अगाध महिमा पाहण्यासाठी लाखो शिव भक्तांनी डोंगर माथ्यावर एकच गर्दी केली.

या कावडीला घाटात वाट दाखवण्यासाठी गुणवरे (ता.फलटण) येथील आढाव यांच्या कावडीला मान आहे .भक्तीचा शक्तीच्या संगमाच्या जोरावर हर हर महादेवच्या जयघोषात घाटातील तिन्ही अवघड टप्पे लीलया पार करून सायंकाळी ७.३० .वा शिखर-शिंगणापूर येथे पोहोचली . मुंगी घाटातून कावड वर येताच सातारा जिल्हा प्रशासनाच्यावतीने तोफेची सलामी देऊन कावडीचे स्वागत केले.

कावडी निर्विघ्नपणे पार पडताच सोलापूर जिल्हा प्रशासनाने सुटकेचा श्वास सोडला. अकलूज उप-विभागीय पोलीस अधीक्षक नारायण शिरगावकर ,नातेपुते पोलीस स्टेशनचे पोसई महारूद्र परजणे, विक्रांत दिघे यांनी चोख बंदोबस्त ठेवल्यामुळे कुठेही वाहतुकीचा त्रास भाविकांना झाला नाही.यासाठी पोलिस उपअधीक्षक शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली ६ पोलिस अधिकारी १०० कर्मचारी व १ जिल्हा स्तरीय दंगा काबु पथक तैनात करण्यात आले होते.

यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्र मांडवे व मोरोची,मांडकी,पिलीव, नातेपुते ग्रामीण रुग्णालया यांनी कोथळे गावात व मुंगी घाटाच्या पायथ्याशी १० रुग्णवाहिकेसह आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिली होती. प्रभारी तालुका वैद्यकीय अधिकारी अमोल आव्हाड, डॉ शिवानी लाड यांच्यासह हे सुमारे ६३आरोग्य कर्मचाऱ्यासह आरोग्य सेवा देत होते .माळशिरस पंचायत समिती ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या वतीने मुंगी घाट व भवानी घाटात पाण्याचे टॅंकर ठेवण्यात आले होते.

शंभू महादेवाच्या पिंडीवर जलाभिषेक केल्यानंतर यात्रा उत्सवाची सांगता होते.यावर्षी कावड वारीला एक लाखाहून अधिक शिवभक्तांनी अवघड मुंगी घाट सर केला असल्याचे पोलिसांनी सांगितली

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow