सोलापूर : पावसाचे पाणी थेट तुळजाभवानी मंदिरात

तुळजापूर वृत्तसेवा : तुळजापूर शहर व परिसरात शनिवारी दुपारी कोसळलेल्या मुसळधार पावसाने सर्वदूर जमा झालेले पावसाचे पाणी थेट श्री तुळजाभवानी मंदिरात घुसले. सध्या मातेच्या चैत्री यात्रेच्यानिमित्ताने देवी दर्शनार्थ राज्यासह परराज्यातून भाविकांची गर्दी उसळली आहे.

Apr 22, 2024 - 16:54
Apr 22, 2024 - 17:16
 0
सोलापूर : पावसाचे पाणी थेट तुळजाभवानी मंदिरात

तुळजापूर वृत्तसेवा : तुळजापूर शहर व परिसरात शनिवारी दुपारी कोसळलेल्या मुसळधार पावसाने सर्वदूर जमा झालेले पावसाचे पाणी थेट श्री तुळजाभवानी मंदिरात घुसले. सध्या मातेच्या चैत्री यात्रेच्यानिमित्ताने देवी दर्शनार्थ राज्यासह परराज्यातून भाविकांची गर्दी उसळली आहे. येत्या सोमवार (दि 23) या यात्रेचा मुख्य सोहळा पार पडणार आहे. त्या निमित्ताने भाविकांची मांदियाळी बघायला मिळत असतानाच अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावली आहे. आज तब्बल दोन ते अडीच तास मुसळधार पावसाने तुळजापूर शहर व परिसराला झोडपून काढले आहे.

तुळजापुरात भुयारी गटारीचा बोजवारा उडाला असल्याने सर्वदूर सांडपाणी रस्त्यावर वाहताना दिसत आहे. त्यात पुन्हा या पावसाची भर पडल्याने शहरातील सगळीकडील पाणी मंदिराकडे उतार असल्याने थेट मंदिरात घुसले त्यामुळे मातेच्या मंदिरात पाणीच पाणी पहावयास मिळाले. परिणामी दर्शनासाठी आलेल्या भाविकांना पावसाच्या पाण्याचा त्रास झाला. अबाल, वृध्द, महिला सर्वांचेच हाल झाले.पाण्याबरोबर कचराही मंदिरात वाहून गेल्याचे चित्र पहावयास मिळाले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow