News Image

अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरण:तेजस्वी घोसाळकर यांना जीवे मारण्याची धमकी, पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल


अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नी तेजस्वी घोसाळकर यांच्या पत्नी तेजस्वी घोसाळकर यांना जीवे मारण्याची धमकी आल्याची माहिती समोर आली आहे. तेजस्वी घोसाळकर यांना एका व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ही धमकी देण्यात आल्याचे समजते. या प्रकरणी बोरिवली एमएचबी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जीवे मारण्याच्या धमकी प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आला आहे. शिवसेना नेते अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणाची चौकशी सध्या सीबीआयकडे सुरू आहे. ही चौकशी सुरू असताना त्यांच्या पत्नी तेजस्वी घोसाळकर यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली असल्याने खळबळ उडाली आहे. तेजस्वी घोसाळकर यांना जीवे मारण्याची धमकी आली आहे, त्याच सोबत अभिषेक घोसळकर हत्या प्रकरणातील प्रमुख साक्षीदार असलेले लालचंद पाल यांना देखील जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. अधिकची माहिती अशी की, एका व्हॉट्सअप ग्रुपमध्ये अभिषेक घोसळकर यांच्या पत्नी तेजस्वी घोसाळकर तसेच अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणातील प्रमुख साक्षीदार लालचंद पाल यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. एका व्हॉट्सअप ग्रुपमध्ये दिवंगत अभिषेक घोसाळकर यांचा फोटो टाकून त्याखाली हिंदीमधून एक मजकूर लिहिण्यात आला होता. यात लालचंद या फोटोला बघ आणि सुधर. याच्या पत्नीचा खून होऊ देऊ नको, अशा प्रकारची धमकी देण्यात आली होती. या प्रकरणी आता बोरिवली एमएचबी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. तेजस्वी घोसाळकर तसेच अभिषेक घोसाळकर यांच्या हत्या प्रकरणातील प्रमुख साक्षीदार लालचंद पाल यांना जीवे मारण्याची धमकी नेमकी कोणी दिली याचा तपास पोलिस करत आहेत. विशेष म्हणजे अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येचा तपास सीबीआय करत असून हा तपास सुरू असतानाच अशा प्रकारची धमकी येणे हे खळबळजनक असल्याचे बोलले जात आहे. पोलिस या व्हॉट्सअप ग्रुपवरच्या माध्यमातून धमकी देणाऱ्यांचा तपास सध्या करत आहेत. दरम्यान, अभिषेक घोसाळकर हे शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक होते. त्यांची हत्या फेसबुक लाईव्ह करत करण्यात आली होती. व्यावसायिक मॉरिस नोरोन्हा उर्फ मॉरिस भाई याने अभिषेक घोसाळकर यांच्या बोरिवली येथील कार्यालयात जाऊन फेसबुक लाईव्ह सुरू असताना अभिषेक घोसाळकर यांची गोळ्या झाडून हत्या केली होती. त्यानंतर मॉरिसने स्वतःवर देखील गोळी झाडून घेतली होती.