News Image

दिव्य मराठी अपडेट्स:मंगेशकर रुग्णालयातील महिला मृत्यू प्रकरण: अजित पवारांनी दिले चौकशीचे आदेश, नागरिकांना संयम बाळगण्याचे आवाहन


महाराष्ट्रातील सर्व ताज्या घडामोडी वाचा एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह राज्यातील महत्त्वाची शहरे आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे अपडेट्स... अजित पवार अ‍ॅक्शन मोडवर पुणे येथील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात तातडीने उपचार न मिळाल्याने तनिषा भिसे या महिलेचा मृत्यू झाला. या घटनेची गंभीर दखल शासनाने घतली आहे. मी स्वत: जिल्हाधिकाऱ्यांना ही चौकशी तातडीने, पारदर्शक आणि निष्पक्षपणे पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत, अशी महिती अजित पवार यांनी ट्विट करुन दिली आहे. कळंबमधील मनिषा बिडवे हत्या प्रकरण अपडेट कळंबमध्ये झालेल्या मनिषा बिडवे या महिलेच्या हत्या प्रकरणी नवी माहिती समोर आली आहे. तिचा मोबाइल घटनास्थळी आढळून आला नव्हता, त्यामुळे पोलिस प्रशासन मोबाइलचा शोध घेत होते. अखेर पोलिसांना आरोपी रामेश्वर भोसलेच्या घरी मोबाइल सापडला आहे. त्यामुळे आता बऱ्याच गोष्टी उलघडा होण्याची शक्यता आहे. दीनानाथ मंगेशकर रुग्णालय वाद: अशा चुकीला माफी नाही- बावनकुळे दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात गुरुवारी घडलेल्या घटनेवर आता राजकीय पडसाद उमटण्यास सुरुवात झाली असल्याचे दिसत आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांनीही प्रतिक्रिया दिली असून ही अतिशय मोठी चूक आहे आणि अशा चुकीला माफी नसते, असे म्हटले आहे. सविस्तर वाचा शहाजी बापू पाटलांनी भाषण करताना भर सभेत स्वतःच्याच तोंडात मारले शिवसेना शिंदे गटाचे नेते शहाजी बापू पाटील हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. शहाजी बापू पाटील यांनी एका कार्यक्रमात बोलत असताना भरसभेत स्वतःच्याच तोंडात मारून घेतल्याचे पाहायला मिळाले आहे. सविस्तर वाचा माजी गृहमंञी डॉ.पद्मसिंह पाटील यांना ब्रीचकँडी रुग्णालयात माजी गृहमंञी डॉ.पद्मसिंह पाटील यांना ब्रीचकँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तब्येत स्थिर असल्याची आमदार राणाजगजित सिंह पाटील यांनी माहिती दिली आहे. त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. दीनानाथ रुग्णालयाबाहेर आंदोलकांनी डॉक्टरांवर फेकली चिल्लर दीनानाथ रुग्णालयाबाहेर शिवसैनिकांनी आंदोलन केले आहे. कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. महिला मृत्यूप्रकरणी कार्यकर्ते आक्रमक झाले. दोषींना तात्काळ अटक करण्याची मागणी करत संतप्त आंदोलकांनी डॉक्टरांच्या अंगावर चिल्लर फेकली. फसवणुकीच्या प्रकारानंतर सागर कारंडेची प्रतिक्रिया, म्हणाला- तो मी नव्हेच! अभिनेता सागर कारंडे या ऑनलाईन फ्रॉडमध्ये अडकला आणि लाखोंची रक्कम गमावली. ही बातमी शुक्रवार सकाळपासून व्हायरल होत आहे. मात्र आता स्वत: सागर कारंडेने स्पष्टिकरण दिले आहे. तो म्हणाला की, हे फेक आहे तो मी नव्हेच. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाची होणार चौकशी पुण्यातील नामांकित दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे तसेच पैशांच्या मागणीवर अडून बसल्याने एका गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना गुरुवारी घडली होती. या घटनेने पुण्यात एकच खळबळ उडाली असून रुग्णालय प्राशासनावर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे. यावर आता राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी रुग्णालयावर चौकशी करून कारवाईचे आदेश दिले आहेत. सविस्तर वाचा विजय वडेट्टीवार-आशिष शेलार भेट काँग्रेस विधिमंडळ गटनेते विजय वडेट्टीवार आणि भाजपचे मंत्री आशिष शेलार यांची यांचे भेट झाली. या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. सोमवारी आशिष शेलार हे चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. नागपूर नागभीडकडून चंद्रपूरला येत असताना वडेट्टीवार आणि शेलार यांची भेट झाली. नांदेडमध्ये महिला मजुरांना ट्रॅक्टर विहिरीत कोसळला, 8 जणांचा मृत्यू नांदेडमध्ये महिला मजुरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर विहिरीत कोसळला आहे. ट्रॅक्टर कोसळून आठ जणांचा मृत्यू झाला आहे. नांदेडच्या आलेगाव शिवारात हा अपघात झाला आहे. आज सकाळी हा प्रकार घडला आहे. या महिला हळद काढणीच्या कामासाठी जात होत्या. सविस्तर वाचा बीडच्या केतुरा येथे पती-पत्नीची आत्महत्या महिनाभरापूर्वी विवाह झालेल्या‎पत्नीने पुण्याला राहण्यास‎जाण्याच्या कारणावरून बुधवारी‎ राहत्या घरी दोरीने गळफास घेऊन‎आत्महत्या केल्याचा प्रकार समोर ‎येताच गुरुवारी सासरच्या लोकांच्या‎भीतीने पतीने शेतातील लिंबाच्या ‎झाडाला दोरीने गळफास घेऊन‎आत्महत्या केल्याची घटना बीड‎तालुक्यातील केतुरा गावात घडली.‎ सविस्तर वाचा अभिनेते-दिग्दर्शक मनोज कुमार यांचे वयाच्या 87व्या वर्षी निधन अभिनेता मनोज कुमार यांचे शुक्रवारी सकाळी मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात निधन झाले. ते 87 वर्षांचे होते. ते विशेषतः त्यांच्या देशभक्तिपर चित्रपटांसाठी ओळखले जात. त्यांना भारत कुमार म्हणूनही ओळखले जात असे. उपकार, पूरब-पश्चिम, क्रांती, रोटी-कपडा और मकान हे त्यांचे यशस्वी चित्रपट होते. सविस्तर वाचा नागपूरमध्ये भरचौकात गोळी झाडून तरुणाची हत्या नागपूरमध्ये भरचौकात गोळीबार आणि चॉपरने हल्ला करत तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. किरकोळ वादातून ही हत्या झाल्याचे पुढे आले असून या प्रकरणी पोलिसांकडून चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वाचा 12 तासांच्या चर्चेनंतर राज्यसभेत वक्फ विधेयक मंजूर 12 तासांहून अधिक काळ चाललेल्या चर्चेनंतर गुरुवारी रात्री उशिरा राज्यसभेत वक्फ दुरुस्ती विधेयकही मंजूर करण्यात आले. विधेयकाच्या बाजूने 128 तर विरोधात 95 मते पडली. सविस्तर वाचा