Natepute Express
सर्व बातम्या
सोलापूर जिल्हाNatepute Pratinidhi

खड्ड्यामुळे दुचाकीस्वाराने अचानक ब्रेक दाबला अन् ट्रकखाली चिरडून मृत्यू:पाथर्डी फाटा ते वडनेर दुमाला रस्त्यावर घटना; शहरात गेल्या तीन महिन्यांत 12 वा बळी

पाथर्डी फाटा ते वडनेर दुमाला रस्त्यावर खड्डा वाचवण्याच्या प्रयत्नात एका 38 वर्षीय दुचाकीस्वाराने ब्रेक दाबला आणि पाठीमागून आलेल्या भरधाव ट्रक खाली सापडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. सुनील केशव पगारे (रा. पाथर्डी गाव) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. शहरातील खड्ड्यांमुळे गेल्या तीन महिन्यांत गेलेला हा 12 वा बळी असून, प्रशासनाच्या निष्काळजीपणावर नागरिकांमध्ये संताप वाढला आहे. शुक्रवारी सायंकाळी सुनील हे आपले काम आटोपून दुचाकीने घराकडे परतत होते. यश मेडिकलजवळ रस्त्यावरील खड्ड्यामुळे त्यांनी दुचाकीचा वेग कमी केला. नेमक्या याच वेळी पाठीमागून भरधाव आलेल्या ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.

खड्ड्यामुळे दुचाकीस्वाराने अचानक ब्रेक दाबला अन् ट्रकखाली चिरडून मृत्यू:पाथर्डी फाटा ते वडनेर दुमाला रस्त्यावर घटना; शहरात गेल्या तीन महिन्यांत 12 वा बळी

A Biker Suddenly Pressed The Brakes Due To A Pothole And Was Crushed Under A Truck To Death, Incident On The Pathardi Phata To Vadner Dumala Road; 12th Victim In The City In The Last Three Months पाथर्डी फाटा ते वडनेर दुमाला रस्त्यावर खड्डा वाचवण्याच्या प्रयत्नात एका 38 वर्षीय दुचाकीस्वाराने ब्रेक दाबला आणि पाठीमागून आलेल्या भरधाव ट्रक खाली सापडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. सुनील केशव पगारे (रा. पाथर्डी गाव) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. शहर शुक्रवारी सायंकाळी सुनील हे आपले काम आटोपून दुचाकीने घराकडे परतत होते. यश मेडिकलजवळ रस्त्यावरील खड्ड्यामुळे त्यांनी दुचाकीचा वेग कमी केला. नेमक्या याच वेळी पाठीमागून भरधाव आलेल्या ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.

या भीषण अपघातात गंभीर मार लागल्याने सुनील यांचा जागीच मृत्यू झाला. सध्या पाथर्डी फाटा ते वडनेर दुमाला या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम सुरू असल्याने रस्ता आधीच अरुंद झाला आहे. त्यात अनेक ठिकाणी खड्डे पडल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. असे असताना, पालिका प्रशासनाने या खोदकामांच्या ठिकाणी कुठल्याही सुरक्षिततेच्या उपाययोजना केल्या नसल्याने हा रस्ता आता वाहनचालकांसाठी ‘मृत्यूचा सापळा’ बनला आहे. कर्ता पुरुषच गेल्याने संपूर्ण कुटुंब वाऱ्यावर सुनील पगारे हे एका हॉटेलमध्ये काम करून संसाराचा गाडा हाकत होते. घरातील ते एकमेव कर्ते पुरुष होते. त्यांच्या पश्चात वृद्ध आई-वडील, पत्नी, 17 वर्षांची मुलगी आणि 13 वर्षांचा मुलगा असा परिवार आहे. रस्त्यावरील एका खड्ड्याने क्षणात या कुटुंबाचा एकमेव आधार हिरावल्याने हे गरीब कुटुंब उघड्यावर आले आहे. त्यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने प्रशासनाने कुटुंबियांना तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी नगरसेवक भगवान दोंदे यांनी केली आहे.

Source: Maharashtra

ही बातमी उपयोगी वाटली?मित्र आणि कुटुंबासोबत WhatsAppवर share करा.
WhatsAppवर Share करा