Natepute Express
सर्व बातम्या
सोलापूर जिल्हाNatepute Pratinidhi

शाळा, कॉलेजातील 300 विद्यार्थिनींनी सादर केली पारंपरिक नागपंचमीची गाणी

लाट्या बाई लाट्या.. चंदनी लाट्या, फू-बाई फू फुगडी फू..., काटवट कणा.., खिस बाई खिस... दोडका खिस, पिंगा गं पोरी पिंगा..., पावसाचं पाणी कवलात, पाटलाची लेक मी डौलात.., नाच गं घुमा कशी मी नाचू... अशा पारंपरिक गाण्यांवर विद्यार्थिनींच्या पावलांनी ठेका धरला. त्यानंतर उखाण्यांच्या जुगलबंदीने रत्नाई पारंपरिक नृत्य स्पर्धेत रंग भरले. अकलूज येथे संपन्न झालेल्या रत्नाई पारंपरिक नागपंचमी शालेय समूह नृत्य स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत महर्षी प्रशालेने एक लाखाचे पहिले बक्षीस पटकावले. सदाशिवराव माने विद्यालय व लक्ष्मीबाई कन्या प्रशाला आणि जिजामाता कन्या प्रशाला यांना विभागून द्वितीय क्रमांक पटकावला. तर उर्वरित तीन विद्यालयांना प्रत्येकी प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात आले. ज्येष्ठ नेते जयसिंह मोहिते पाटील यांच्या संकल्पनेतून आयोजन केले. शिक्षण प्रसारक मंडळ व प्रताप क्रीडा मंडळाच्या वतीने आयोजन केले होते. अकलूजमधील चार प्रशाला व तीन महाविद्यालयांतील सुमारे 300 विद्यार्थिनींनी पारंपरिक गाणी सादर केली. उद्घाटन सुलक्षणादेवी मोहिते पाटील यांच्या हस्ते केले.

या वेळी ऋतुजादेवी मोहिते-पाटील, स्वरूपाराणी मोहिते पाटील, सुनयना जगताप, सयाजीराजे मोहिते-पाटील आदी उपस्थित होते. प्रथम क्रमांक (1 लाख) : महर्षी शंकरराव मोहिते-पाटील प्रशाला शंकरनगर. द्वितीय क्रमांक-विभागून (71 हजार प्रत्येकी) : जिजामाता कन्या प्रशाला अकलूज, सदाशिवराव माने विद्यालय अकलूज, आणि लक्ष्मीबाई कन्या प्रशाला शंकरनगर. उत्तेजनार्थ (50 हजार प्रत्येकी) : सहकारमहर्षी शंकरराव मोहिते-पाटील इंजिनिअरिंग कॉलेज, श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते-पाटील गृहविज्ञान महाविद्यालय आणि शंकरराव मोहिते महाविद्यालय. पारंपरिक नागपंचमी सणाच्या संदर्भातील गाण्यांनी स्त्री शक्तीचा जागर सर्वांनी आनंदाने अनुभवला. पुढील वर्षी अशा प्रकारचा कार्यक्रम सर्व स्तरातील महिलांसाठी ठेवणार असल्याची घोषणा जयसिंह मोहिते पाटील यांनी केली.

सांस्कृतिक परंपरा पिढीत परावर्तित करण्याचे प्रयत्न आपली महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा पुढील पिढीमध्ये परावर्तित करण्यासाठी जयसिंह यांचे मोठे योगदान लाभत आहे. नागपंचमी सणानिमित्त असा हा महाराष्ट्रातील पहिलाच यशस्वी प्रयोग असावा. आपली आई रत्नप्रभादेवी यांच्या जयंतीनिमित्त आयोजित ही स्पर्धा आईंना समर्पित केल्याचे स्वरूपाराणी म्हणाल्या.

Source: Maharashtra

ही बातमी उपयोगी वाटली?मित्र आणि कुटुंबासोबत WhatsAppवर share करा.
WhatsAppवर Share करा