3 Rounds Of Firing Due To Old Dispute Near Beed City; Attempt To Kill Two, One Critical, Two Arrested; 5 Absconding बीड शहरालगतच्या इमामपूर रस्ता परिसरातील एका पेट्रोल पंपाजवळ जुन्या वादाच्या कारणावरून थरारक गोळीबाराची घटना घडली. "तूआमच्याकडे काय बघतोस?'' असा जाब विचारत झालेल्या बाचाबाचीनंतर थेट पिस्तूल काढून तीन राउंड फायर केले. या हल्ल्यात फिर्यादी तरुण फिर्यादी शेख मोहम्मद साद (22, रा.जुना बाजार, हत्तीखाना, बीड) यांनी तक्रार दिली. त्यावरून सफवान खान,सय्यद साद, अखलाख यांच्यासह इतर6 ते 7 अज्ञात आरोपींवर ग्रामीण ठाण्यात गुन्हा दाखल आहे. दरम्यान,तु माझ्याकडे काय बघतोस याकारणावरून हा वाद झाला होता. दोन जणांना बेड्या,कारही केली जप्त तपास अधिकारी सहायकपोलिस निरीक्षक बाळराजे दराडे यांनी घटना घडल्यानंतर तातडीने तपासाची चक्रे फिरवली. पथकाने शोध घेऊन सुरुवातीला या प्रकरणातील एक आरोपी फरदीन शेख याला गजाआड केले.
त्यानंतर काही तासांत पुन्हा दुसरा आरोपी अरबाज नवाबशिकलकर यालाही ताब्यातघेण्यात आले. त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेली कारही जप्त केली गेली असून, बीड ग्रामीण ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच बीड ग्रामीण पोलिस आणि अपर पोलिसअधीक्षक समीर शेख यांनी फॉरेन्सिक टीमसह घटनास्थळी भेटदेऊन पाहणी केली. परिस्थिती नियंत्रणात असल्याची खात्री केली.ग्रामीण पोलिसांना तातडीने तपास करण्याच्या सूचना दिल्या गेल्या. गोळी हुकल्यानंतर लाकडी दांड्याने केली जबर मारहाण गोळी हुकल्यानंतर सय्यद साद यानेलाकडी दांडक्याने फिर्यादीच्या उजव्या कानावर मारहाण करून त्यांना गंभीर जखमी केले. या प्रकारामुळे खळबळ उडाली होती. गोळीबार झाल्याने पोलिसदलही सतर्क झाले होते. घटनास्थळी पोलिस, फॉरेन्सिक टीमने भेट दिली.