Natepute Express
सर्व बातम्या
महाराष्ट्रNatepute Pratinidhi

'आपले, संदिग्ध अन् विरोधी'; भाजपकडून मतदारांची गुपचूप वर्गवारी:रोहित पवार

मतदार याद्यांमधील कथित गडबडी आणि निवडणूक आयोगाच्या 'SIR' मोहिमेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी भारतीय जनता पक्षावर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. पश्चिम बंगालमध्ये SIR मोहिमेच्या माध्यमातून विरोधी विचारांच्या मतदारांची नावे वगळणे किंवा ती भलत्याच ठिकाणी दाखवण्याचे भयानक प्रकार संपूर्ण देशाने पाहिले आहेत. आता त्यातच भाजपने आपल्या 'BLA' मार्फत समांतर यंत्रणा उभी केली असून मतदारांची 'आपले', 'संदिग्ध' आणि 'विरोधी' अशी वर्गवारी केली जात आहे, असा दावा रोहित पवार यांनी केला आहे.

'आपले, संदिग्ध अन् विरोधी'; भाजपकडून मतदारांची गुपचूप वर्गवारी:रोहित पवार

मतदार याद्यांमधील कथित गडबडी आणि निवडणूक आयोगाच्या 'SIR' मोहिमेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी भारतीय जनता पक्षावर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. पश्चिम बंगालमध्ये SIR मोहिमेच्या माध्यमातून विरोधी विचारांच्या मतदारांची नावे वगळणे किंवा ती भलत्याच ठिकाणी दाखवण्याचे भयानक प्रकार संपूर्ण देशाने पाहिले आहेत. आता त्यातच भाजपने आपल्या 'BLA' मार्फत समांतर यंत्रणा उभी केली असून मतदारांची 'आपले', 'संदिग्ध' आणि 'विरोधी' अशी वर्गवारी केली जात आहे, असा दावा रोहित पवार यांनी केला आहे. शासकीय यंत्रणा कार्यरत असताना भाजपकडून ही समांतर मोहिम कोणत्या अधिकारात चालवली जात आहे, असा सवाल उपस्थित करत रोहित पवार यांनी निवडणूक आयोगाने या प्रकाराची तातडीने व गंभीर दखल घेण्याची मागणी केली आहे. आता 'डिलिमिटेशन बिल' मंजूर होणार नाही- रोहित पवार बिहारमधील बांकीपूर पोटनिवडणुकीतील भाजपचा पराभव आणि निवडणूक आयोगाच्या 'SIR' मोहिमेवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी भाजप सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.

भाजपच्या बालेकिल्ल्यात घुसून प्रशांत किशोर यांनी मिळवलेला विजय हा 'अपना टाईम आ गया' असे सांगणारा असून, भाजपची 'डेडलाईन' आता जवळ आल्याचे या निकालाने सिद्ध केले आहे, असा टोला त्यांनी लगावला. जंतरमंतरवरील तरुणाईचे आंदोलन आणि या पराभवामुळे संसदेत 'डिलिमिटेशन बिल' पास होणार नाही, असा दावाही त्यांनी केला. दुसऱ्या पोस्टमध्ये 'SIR' मोहिमेवर गंभीर प्रश्न उपस्थित करत रोहित पवार म्हणाले, SIR च्या नावाखाली विरोधी विचारांच्या मतदारांची नावे वगळली जात असून, भाजपने आपल्या BLA मार्फत 'आपले, संदिग्ध आणि विरोधी' अशी मतदारांची वर्गवारी करण्यासाठी समांतर बेकायदेशीर यंत्रणा उभी केली आहे. या प्रकाराची निवडणूक आयोगाने गंभीर दखल घ्यावी आणि भाजपने उत्तर द्यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. रोहित पवारांची पोस्ट काय? रोहित पवार म्हणाले की, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांच्या पारंपरिक मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत मतदारांनी जनसुराज पक्षाचे प्रशांत किशोर यांना विजयी करुन भाजपाचं नाक कापलं. प्रत्येक गोष्टीला एक 'डेडलाईन' असते आणि भाजपाची ती डेडलाईन आता जवळ आली आहे, हेच या निकालाने दाखवून दिलं आहे.

रोहित पवार म्हणाले की, भाजपच्या गडात घुसून भाजपलाच पाणी पाजल्याबद्दल प्रशांत किशोर यांचं मनःपूर्वक अभिनंदन! आता पूर्वीसारखं ‘अपना टाईम आएगा’ असं नाही तर ‘अपना टाईम आ गया..’ त्यामुळं थोडा धीर धरा…. विजय आपलाच आहे..! आता मला वाटतंय डिलिमिटेशन बिल काही पास होणार नाही. दिल्लीत जंतरमंतरवर झालेलं तरुणाईचं आंदोलन आणि बांकीपूरमध्ये झालेला दारूण पराभव बघितला तर संसदेत डिलीमिटेशन बील मंजूर होणार नाही असंच दिसतंय… आणि निश्चितच हा लोकशाहीचा विजय असेल! असे रोहित पवारांनी सोशल मिडीयावर पोस्ट करत म्हटले आहे.

Source: Maharashtra

ही बातमी उपयोगी वाटली?मित्र आणि कुटुंबासोबत WhatsAppवर share करा.
WhatsAppवर Share करा