71 Lakh Compensation To The Heirs Of The Deceased Bus Driver, The Accident Victim's Family Got Relief In The Lok Adalat सांगोल्याच्या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या बस वाहक आनंदा माळी यांच्या परिवारास तब्बल 71 लाख रुपयांची नुकसान भरपाई मिळाली. सोलापूर जिल्हा न्यायालयात दाखल झालेल्या या प्रकरणाचा निकाल लागला असून, तो शनिवारच्या लोकन्यायालयातील सर्वात मोठ्या रकमेचा आणि विश बसडेपो प्लॅटफॉर्म क्र. 11 येथे बस लावून डेपोमधून मशीन घेऊन येत असताना, एका भरधाव स्विफ्ट कारने (एमएच 45 एएल 0382) त्यांना जोराची धडक दिली.
या अपघातात ते गंभीर जखमी होऊन मरण पावले. या घटनेनंतर त्यांच्या कुटुंबीयांनी ॲड. रूपेश महिंद्रकर यांच्यामार्फत जिल्हा न्यायालयात नुकसान भरपाईचा दावा दाखल केला होता. लोकन्यायालयात झालेल्या सुनावणीत सोलापूरचे प्रमुख जिल्हा न्यायाधीश एम. एस. शर्मा व अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश इंदलकर यांच्या हस्ते माळी परिवारास 71 लाखांचा धनादेश सुपूर्द केला. रस्ता ओलांडताना झालेल्या अपघातात अपंगत्व आलेल्या व्यक्तीला 40 लाखांची भरपाई दिली. रखडलेल्या खरेदीखताच्या वादात वकिलांच्या मध्यस्थीने 47 लाखांची मदत देऊन तडजोड केली. 140 भूखंडांच्या वाटपावरून 7 व्यावसायिक मित्रांमध्ये झालेला वादही मैत्री पूर्ववत ठेवून मिटवला.
कामगार न्यायालयात दिव्यांग कर्मचाऱ्यासाठी एन.. सी. बोरफळकर स्वतः पुढाकार मदत मिळवून दिली. बस वाहक आनंदा माळी यांच्या अपघाती मृत्यूनंतर त्यांच्या परिवाराने न्यायासाठी न्यायालयाची दारं ठोठावली. लोकन्यायालयाच्या माध्यमातून 71 लाख रुपयांची नुकसानभरपाई मिळाली आहे. हा निकाल पीडित कुटुंबांना जलद व प्रभावी न्याय मिळण्याचे उत्तम उदाहरण आहे. पीडित कुटुंबांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
ॲड. रूपेश महिंद्रकर, माळी परिवाराचे वकील