Natepute Express
सर्व बातम्या
महाराष्ट्रNatepute Pratinidhi

सिद्धिविनायक'च्या देणग्यांत घोळ?:उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे विशेष ऑडिटचे आदेश

देशभरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या मुंबईतील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिरातील कथित देणगी घोटाळ्याची राज्य सरकारने अत्यंत गंभीर दखल घेतली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणाचे 'विशेष लेखापरीक्षण' करण्याचे अत्यंत महत्त्वाचे आदेश दिले आहेत. गेल्या 5 वर्षांत मंदिरात आलेल्या रोख देणग्या, सोने-चांदीचे दागिने आणि इतर मौल्यवान वस्तूंच्या हिशेबात मोठी अनियमितता असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे या सखोल चौकशीतून कोणते सत्य बाहेर येते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

सिद्धिविनायक'च्या देणग्यांत घोळ?:उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे विशेष ऑडिटचे आदेश

Eknath Shinde Orders Special Audit Into Siddhivinayak Temple Donation Scam देशभरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या मुंबईतील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिरातील कथित देणगी घोटाळ्याची राज्य सरकारने अत्यंत गंभीर दखल घेतली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणाचे 'विशेष लेखापरीक्षण' करण्याचे अत्यंत महत्त् सरवणकर-शिंदे यांच्यात 20 मिनिटे चर्चा; अतिरिक्त मुख्य सचिवांना दिले निर्देश श्री सिद्धिविनायक मंदिर न्यासाचे अध्यक्ष आणि आमदार सदा सरवणकर यांनी मंगळवारी (4 ऑगस्ट) मंत्रालयात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या दोन नेत्यांमध्ये तब्बल 20 मिनिटे चर्चा झाली. या बैठकीत मंदिरातील कथित आर्थिक अनियमितता आणि देणगी व्यवस्थापनावर सविस्तर खल झाला. यानंतर लगेचच ॲक्शन मोडमध्ये येत एकनाथ शिंदे यांनी अतिरिक्त मुख्य सचिव असीम गुप्ता यांना या प्रकरणाच्या सखोल चौकशीचे आणि विशेष लेखापरीक्षणाचे निर्देश दिले आहेत. 5 वर्षांतील देणग्या आणि दागिन्यांची होणार सखोल तपासणी या विशेष लेखापरीक्षणामध्ये प्रामुख्याने गेल्या 5 वर्षांच्या कालावधीवर लक्ष केंद्रित केले जाणार आहे.

या काळात मंदिरात जमा झालेली रोख रक्कम, सोन्या-चांदीचे दागिने, मौल्यवान वस्तू आणि इतर सर्व प्रकारच्या अर्पणांचा बारकाईने तपास केला जाईल. देणग्यांची नोंदवही आणि प्रत्यक्ष साठा यात काही तफावत आहे का? आर्थिक व्यवहारांमध्ये पारदर्शकता राखली गेली आहे का? दागिन्यांचे व्यवस्थापन योग्य प्रकारे झाले आहे का? या सर्व प्रश्नांची उत्तरे या चौकशीतून शोधली जाणार आहेत. संपूर्ण ऑडिट प्रक्रिया निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने पूर्ण करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. घोटाळा सिद्ध झाल्यास कठोर कारवाईचा बडगा सिद्धिविनायक मंदिर हे देशातील सर्वाधिक देणग्या मिळणाऱ्या आणि श्रीमंत देवस्थानांपैकी एक मानले जाते. त्यामुळे येथील आर्थिक व्यवहारात पारदर्शकता असणे अत्यंत गरजेचे आहे. या ऑडिट दरम्यान जर आर्थिक गैरव्यवहार, निधीचा अपहार किंवा नोंदींमध्ये कोणतीही तफावत आढळली, तर संबंधित दोषींवर अत्यंत कठोर कारवाई केली जाईल, असे सूत्रांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या या तडकाफडकी निर्णयामुळे आता मंदिर व्यवस्थापनाशी संबंधित वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, शासनाकडे सादर होणाऱ्या या अहवालात नेमके काय निष्पन्न होते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. काम सुधारा, नाहीतर विकेट पडणार!:एकनाथ शिंदेंचा 4 मंत्र्यांना सज्जड दम; मंत्रिमंडळात मोठ्या खांदेपालटाची शक्यता राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वी मंत्रालयात पार पडलेल्या शिवसेनेच्या स्वतंत्र बैठकीत मोठी राजकीय घडामोड पाहायला मिळाली. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षाच्या चार मंत्र्यांच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त करत त्यांना थेट पदावरून हटवण्याचा इशारा दिला आहे. जनतेची कामे आणि पक्षवाढीकडे दुर्लक्ष करणाऱ्या या मंत्र्यांना आता आपली कामगिरी सुधारण्यासाठी शेवटची संधी देण्यात आली आहे. 

Source: Maharashtra

ही बातमी उपयोगी वाटली?मित्र आणि कुटुंबासोबत WhatsAppवर share करा.
WhatsAppवर Share करा